पॅकेजिंगचे यंत्र घेताना घ्यावयाची काळजी…

पॅकेजिंगचे यंत्र घेताना घ्यावयाची काळजी…
व्यवसाया मध्ये  आकर्षक व नीटनेटक्या पॅकेजिंगसाठी यंत्राचा वापर वाढला आहे. आपल्या उत्पादनानुसार यंत्रांची खरेदी करताना योग्य ती काळजी घेतल्यास पुढे येणाऱ्या अडचणी टाळता येतात.
हल्लीच्या युगात आकर्षक पॅकिंग हे विक्रीसाठी अत्यंत फायदेशीर ठरते. हाताने केलेल्या पॅकिंगपेक्षा यंत्राने केलेले पॅकिंग हे अधिक नीटनेटके, एकसारखे व सुबक होते, त्यामुळे त्याला ग्राहकाकडून प्राधान्य दिले जात असल्याचे दिसून  सर्वत्र दिसून येते. मात्र आपल्या उत्पादनानुसार पॅकेजिंग यंत्रणा निवडणे  फार आवश्यक असते. त्या वेळी योग्य ती सावधगिरी बाळगल्यास आपल्या खर्चात बचत साध्य  होण्यासोबतच पुढील काळात उद्‌भवणाऱ्या अडचणी टाळता येतो.
१. दाणेदार पदार्थासाठी :-
आपले उत्पादन व वस्तू नेमके कसे आहे,  त्याचे सरासरी किती ग्रॅम किंवा किलो आकारमानाचे पॅक आपल्याला आवश्यक आहेत,  याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. ग्राहकाची मागणी व बाजारपेठेतील आपले स्पर्धक यांच्या पॅकेजिंगचाही विचार करावा लागते.  उत्पादनाचे प्रकार साधारणपणे खालीलप्रमाणे आपणांसा पाहवयास मिळतात.
आकारमानानुसार  सामान्यत :-
घनता सारखी असलेल्या पदार्थांसाठी वजनाच्या आकाराचे ट्रे बनवून घेतले जातात. त्यात पदार्थ भरले जातात. नंतर पॅकेजिंग केले जाते. उदा. धान्य किंवा कडधान्य प्रकारच्या दाणेदार स्वरूपातील घटकांचे पॅकेजिंग.

गुरुत्वाकर्षणावर आधारित  पॅकेजिंगचे यंत्र  :
घनता सापेक्ष नसल्यास प्रामुख्याने ग्रॅव्हिमेट्रिक फिडिंग या यंत्रणेचा वापर करता येतो. या यंत्रणेत वजनकाट्याचा उपयोग केला जातो. योग्य वजन खाली पडताच फिडर यांत्रिकपणे बंद होतात. सहजतेने प्रवाहित होणाऱ्या घटकांचे पॅकेजिंग  या घटकांचे प्रवाहीपणातील सुरळीतपणा अत्यंत उपयुक्त ठरतो. त्यासाठी वजनकाट्याप्रमाणे यंत्रे कामे करतात. यांत्रिकपणे बंदही होतात.

 

२. द्रवरूप पदार्थांचे पॅकिंग  :-
द्रवरूप पदार्थांच्या पॅकिंगसाठी त्यांच्या घनतेनुसार मापकांची (मेजर डिस्पेन्सर)  निवड करावी लागते. या प्रकारात किती पॅक करायचे आहेत व किती वेगात करायचे, यावर किती डिस्पेन्सरचे युनिट बनवायचे ते अवलंबून असते. सध्या भारतात बऱ्याच प्रकारचे डिस्पेन्सर फिडर उपलब्ध आहेत. दोन वेगळ्या घनता असणाऱ्या पदार्थांचे डिस्पेन्सर फिडर हे वेगळे असतील. म्हणजेच आपल्याला जे पदार्थ पॅक करायचे आहेत, त्याची घनता या वेळी महत्त्वाची असते.



     भुकटी, पूड किंवा चूर्ण स्वरूपातील पदार्थांसाठी    :-
आपले उत्पादन हे भुकटी, पूड, चूर्ण अशा स्वरूपातील असले, तर त्यासाठी आकारामानावर आधारित फीडर (व्हॉल्युमेट्रिक फीडर) चा वापर करणे अपरिहार्य आहे. यातून अधिक अचुकता मिळते.  पॅकेजिंगच्या प्रकारानुसार आपल्याला डिस्पेन्सिंग फीडर निवडावे लागतात. म्हणजेच धान्य, क्रीम, पेस्ट, सरबते, अर्क, रस, श्रीखंड, वेगवेगळी पेये, लोणची अशा वेगवेगळ्या उत्पादनाकरीता वेगवेगळ्या फीडर्सची आवश्‍यकता भासते. हे फीडर्स दुसऱ्या उत्पादनासाठी वापरता येत नाहीत.

जागेची आवश्यकता  :-
उत्पादन निर्मितीसाठी आवश्यक कच्चा माल साठवण, उत्पादन निर्मितीसाठीच्या जागेचाही विचार करावा. या वेळी होत असलेल्या पदार्थांच्या हाताळणी व वाहतुकीनुसार त्याची रचना करावी लागते. सर्वांत शेवटी पॅकेजिंगचा विभाग येतो. त्यासाठी आपल्या उत्पादनानुसार योग्य त्या क्षमतेची यंत्रणा उभारणीसाठी नेमकी किती जागा लागणार आहे, याचा अंदाज घ्यावा. या जागेवर यंत्रणा चालविण्यासाठी आवश्यक तितका विद्युत भार उपलब्ध आहे का, नसल्यास उपलब्ध होऊ शकेल काय, याचाही विचार करावा. खाद्य पदार्थांसाठी ही सर्व प्रक्रिया अत्यंत स्वच्छ वातावरणामध्ये करावी लागते. स्वच्छतेसाठी आवश्यक तितके पाणी उपलब्धताही विचारात घ्यावी.

खाण्यायोग्य तयार भाज्यांच्या पॅकेजिंगसाठी   :-
खाण्यासाठी तयार (रेडी टू इट) अशा भाज्यांची मागणी बदलत्या जीवनशैलीमुळे वाढत आहे. यामध्ये शाकाहारी व मांसाहारी असे दोन्ही पदार्थ येऊ शकतात. शाकाहारी पदार्थांमध्ये विविध भाज्या व कडधान्यांपासून बनविलेले पदार्थ येतात,  तर मांसाहारी पदार्थांमध्ये विविध प्रकारच्या मांसाचा समावेश असलेले पदार्थ येतात. या दोन्ही प्रकारांमध्ये मसालायुक्त रस्सा किंवा पेस्ट (घट्ट रस्सा) वापरलेला असतो.

हे सारे प्रक्रियायुक्त अन्नपदार्थ असून, ते त्वरित खाता येतात. सध्या बाजारामध्ये विविध कंपन्यांची अनेक उत्पादने दिसून येतात. प्रक्रियायुक्त पदार्थ तयार केल्यानंतर त्यांच्या पॅकिंगविषयी काळजी घ्यावी लागते.  त्याविषयी अधिक माहिती घेऊ.


पॅक करताना घेण्याची काळजी :-

  • आपण जो पदार्थ तयार करू, त्याची टिकवणक्षमता (शेल्फ लाइफ) जाणून घ्यावी. विशेषतः त्या पदार्थाची चव व त्याचा सुगंध कायम राहण्याचा कालावधी लक्षात घ्यावा.
  • आपल्या पदार्थाचे नैसर्गिक गुणधर्म आपणास माहित असणे आवश्‍यक आहे. ते झाकोळले जाता कामा नये.
  • तेलाचा वापर केला जात असल्याने त्यांच्या वासाचा(रॅन्सिडिटी)चा विचार करावा.
  • पॅकेजिंगची परस्पर क्रिया किंवा प्रतिक्रियाचा विचार करावा. विशेषतः पदार्थातून आत किंवा बाहेर जाणारे वायूविषयी जाणून घ्यावे.
  • पदार्थ खराब करण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या वायूंना अटकाव करणे.

  • पदार्थामुळे आतमध्ये तयार होणारे वायू (गॅस) व त्यांचे परिणाम पदार्थ व पॅकेजिंगवर काय होतात, हे माहित असले पाहिजे.
  • पदार्थामध्ये वापरलेल्या प्रिझर्व्हवेटिव्हचे परिणाम.
  • पॅकेजिंगसाठी वापरावयाची यंत्रसामग्री.
  • बाजारपेठ कोणती आहे व कशी आहे, यासह तेथील नेमक्‍या मागणीचा अंदाज घेणे आवश्‍यक आहे.
  • साठवणुकीसाठी सुविधा.
  • सूक्ष्मजीव, जंतू यांचा संसर्ग व त्यासंबंधीची पूर्ण माहिती असली पाहिजे.

   पॅकिंगची वर्गवारी खालीलप्रमाणे : 
पदार्थाच्या टिकावूपणाचा विचार करून खालीलपैकी एखाद्या पॅकेजिंगचा वापर करावा.
लवचिक पाऊच (फ्लेक्‍झिबल) या प्रकारात अनेक वर्गवारी आहेत.
अ) प्रमाणित पाऊच (स्टॅण्डर्ड पाऊच)
ब) असेप्टिक पाऊच
क) रिट्रोर्ट पाऊच
ड) उभे राहतील असे स्टॅण्डी पॅक
ई) बॉईलिंग बॅग
फ) मायक्रोमुव्हेबल बॅग

  • फ्लेक्‍झिबल सॉल्ट कंटेनर थर्मोफॉर्मल शेपड (आकाराच्या) सॉल्ट पाऊच येतात.
    थर्मोफॉर्मड कंटेनर.
  • साचा प्रकारचे प्लॅस्टिक (मोल्डेड) कंटेनर.
  • धातूचे कंटेनर.

 
           पॅकेजिंगच्या निवडीपूर्वी काही चाचण्या आवश्‍यक :
1) वायूंच्या आवकजावक जाणण्यासाठी (पर्मियाबिलीटी ऑफ गॅसेस) ही चाचणी बहुतेक सर्व पॅकेजिंगला लागू होते.
2) हवाबंद होण्याची क्षमता (सील स्ट्रेन्थ) ही चाचणी फ्लेक्‍झिबल पाऊच व रिजिड कंटेनरच्या सीलसाठी लागू होते.
3) डिलॅमिनेशन ही चाचणी पाऊचला लागू होते.
4) दबाव चाचणी (कॉम्प्रेशन सेट) ही बहुतेक सर्व प्रकारच्या पॅकेजिंगला लागू पडते.
5) पॅकेजिंग पदार्थासह खाली पडल्यानंतर त्याची टिकण्याची क्षमता ड्रॉप टेस्टमध्ये तपासली जाते.ती सर्व प्रकारच्या उत्पादनांच्या         पॅकेजिंगसाठी लागू पडते.
6) अतिनील किरणांचा परिणाम (यू.व्ही. इफेक्‍ट) ही चाचणी सर्व प्रकारच्या पॅकेजिंगसाठी लागू पडते.
7) धातूच्या कंटनेरमधील आवरणाकरिता असलेली लॅक्वर टेस्ट ही चाचणी आहे.
प्रक्रियायुक्त अन्नाच्या पॅकिंग/पॅकेजिंगची रचना करताना घ्यावयाची काळजी

  1. आपले उत्पादन कोणते, कसे असेल, त्याचे आकारमान कसे असेल, याचा विचार करून, त्यानुसार पॅकेजिंगची रचना करणे योग्य ठरते.
  2. वजनानुसार ठरवा पॅकेजिंगची
  3. रचना. उदा. 100 ग्रॅम, 200 ग्रॅम, 500 ग्रॅम किंवा त्याहून जास्त अशा पॅकेजिंगची रचना भिन्न असू शकते.
  4. अटकाव क्षमता पॅकेजिंगची रचना करताना कुठल्या वायूंना मज्जाव करावयाचा, याचा विचार करणे अत्यंत आवश्‍यक आहे.
    वाहतूक व हाताळणीच्या पद्धतीनुसार प्राथमिक किंवा दुय्यम पॅकेजिंग ठरविता येईल.
  5. पॅकेजिंग साधनांची उपलब्धताही अनेक वेळा महत्त्वाची ठरते.
  6. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आर्थिक क्षमता विचारात घ्यावी.पॅकेजिंगसाठी विविध पर्याय

1) फ्लेक्‍झिबल पाऊच – पॉली किंवा ऍल्युफॉइल किंवा पेट-बीओपीपी फिल्म किंवा रिटॉर्ट पाऊच. या करिता खास पद्धतीने रचना केलेली विविध कॉम्बिनेशन्स बाजारात उपलब्ध आहेत.
2) मोल्डेड कंटेनर/थर्मोफॉर्मड कंटेनर – यात शक्‍यतो पॉलिप्रोफीलिनचे कंटेनर उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे काही प्रमाणात एचडीपीईचे कंटेनरसुद्धा वापरले जातात.

  1. 3) धातूचे कंटेनर – या प्रकारात टीन प्लेट कंटेनर व ऍल्युमिनियमचे कंटेनर वापरता येतात
November 4, 2020

0 responses on "पॅकेजिंगचे यंत्र घेताना घ्यावयाची काळजी…"

Leave a Message

All Right Reserved.