शेतीपुरक व्यवसाय – नर्सरी (रोपवाटिका)

       शेतीपुरक व्यवसाय – नर्सरी (रोपवाटिका)

   आपल्या देशातले शेतकरी शक्यतो नियोजित पद्धतीने शेती करीत नाहीत. कारण मुळात असे नियोजन करावे लागते याची त्यांना जाणीव नाही. त्याचबरोबर शेती नियोजनबद्धपणे करण्याचे ठरवले तरी त्यात अनेक अडथळे येतात. निसर्गाची अडचण असतेच, पण नियोजनबद्ध शेतीमध्ये पैशाची अडचण सुद्धा मोठ्या प्रमाणावर येते.   त्यामुळे कोणत्या हंगामात नेमकी कोणती पिके घ्यावीत याचे काटेकोर नियोजन करणे त्यांना जमत नाही. ज्या पिकांची लागवड करण्याआधी काही विशिष्ट दिवस पूर्वी रोपे टाकावी लागतात त्या पिकांची लागवड करण्यासाठी आवश्यक अशी रोपे टाकलेली नसतात. कोणत्याही पिकाचे किमान दीड महिना आधी  नियोजन केले तर स्वत:च स्वत:ची रोपे तयार करता येतात आणि तीच रोपे वापरून  पीक घेता येते. मिरची, टोमॅटो, कांदा यांची रोपे टाकावी लागतात. परंतु बहुसंख्य शेतकरी नियोजन करीत नसल्यामुळे ते दुसर्‍यांच्या रोपांवर अवलंबून राहतात. अशा शेतकर्‍यांना रोपे पुरविण्याच्या निमित्ताने काही शेतकरी नर्सरी किंवा रोपवाटिका हा व्यवसाय करू शकतात. या व्यवसायामध्ये  चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळते. कारण ऐनवेळी रोपांची मागणी करणारा शेतकरी वाट्टेल ती किंमत देऊन रोपे विकत घेत असतो.

नर्सरी (रोपवाटिका)

         आपणा सर्वांनाच झाडांचे, फुलापानाचे खूप आकर्षण असते. आपल्या घराच्या परसात व अंगणात फुला-फळांची झाडे लावणे सर्वांनाच आवडते. यासाठी योग्य व चांगल्या प्रतीची रोपे लावणे आवश्यक आहे. अशी रोपे नर्सरीमधून पुरविली जातात.  खऱ्या अर्थाने या व्यवसायास आवश्यकता आहे ती थोडसे साहस, चिकाटी व कष्ट करण्याची तयारी असावी लागते. हा व्यवसाय बेरोजगार व महिलांना करता येण्यासारख्या उदयोग आहे. जेवढ्या मोठया प्रमाणात व्यवसाय कराल तेवढा नफा अधिक जास्त प्रमाणत मिळू शकतो.

बाजारपेठे – 

हा व्यवसाय नावीन्यपूर्ण, मार्केटेबल, शासनाच्या भरपूर सवलतींनी युक्त व आरोग्याला लाभदायकही आहे. शासनाच्या कुठलाही परवाना काढावा लागत नाही. गुलाब, जुई, परिपक्व, झाल्यानंतर त्यांची विक्री करावी. शहरामध्ये याच व्यवसायाशी संबधित दुकानदार,तसेच हातगाडीवाले यांच्याशी संपर्क साधून विक्रीची व्यवस्था केल्यावर दैनंदिन उत्पत्र चालू होते. उत्तम प्रतीची पपई, आंबा, पेरू, चिकू, नारळ, जांभूळ, लिंबू आदी झांडाना विविध ठिकाणी मागणी आहे. स्थानिक परिसरातील सभा, कार्यक्रम, आदी ठिकाणी आपण संपर्क साधला तरी आपल्याला उत्तम प्रकारची बाजारपेठत तयार करता येते.

प्रकल्प विषयक –

या  व्यवसायासाठी ५० हजारापर्यंत खर्च अपेक्षित आहे. तसेच व्यवसाय सुरू करताना खर्च कमी जास्त होऊ शकतो. तर हा व्यवसाय सुरु करण्यासाठी शासकीय स्तरावर अनुदान देखील मिळते.

November 4, 2020

0 responses on "शेतीपुरक व्यवसाय - नर्सरी (रोपवाटिका)"

Leave a Message

All Right Reserved.