Tomato Processing Business

Tomato Processing Business
टोमॅटोतील अ, ब, व क सत्वामुळे त्याचे आहारात अनन्यसाधरण महत्व आहे. टोमॅटो फळाच्या उपयोगामुळे शरीरात नवचैतत्य निर्माण होत असते. डोळ्यातील तेजज्योतीत वाढ करीत असते.  टोमॅटो हे शरीरातील अन्नाची पचनक्रिया वाढवते. व विषावक्त घटकांचे शरीरातून बाहेर काढते. शरीराची प्रतिकारक्षमता वाढविण्याचे काम करते. जसे अतिसार, देवीचा रोग, आदी तसेच पेशीतील प्राणवायची मात्रा वाढवित असते.  या बहुगुणी टोमॅटोची नेहमी उपलब्धता व्हावी म्हणून टिकाऊ पदार्थ करीत असतात.  तसेच चवदारपणा वाढविण्याकरिता वेगवेगळ्या पाककृतीतून विविध उदयोग करता येतात.
  उद्योग  :-
भारतात टोमॅटो केचप/सॉस सारखे पदार्थ निर्माण करणाऱ्या, टोमॅटोवर प्रक्रिया करणारे उद्योग रोज तयार होत आहे. टोमॅटोची पीक हे मोठ्या प्रमाणावर येत असल्यामुळे व त्यापासून बनविल्या जाणाऱ्या अत्रपदार्थांना भारतात व परदेशात सतत मागणी असते.  सध्या टोमॅटोवर आधरित अनेक लघुउद्योग तयार होत आहे. टोमॅटोपासून रस, टोमॅटो प्युरी, पेस्ट, टोमॅटो कॉकटेल, टोमॅटो केचप, सॉस, सूप, ज्युस, वेफर्स, चटणी टोमॅटो पावडर अशी उत्पादन तयार करता येतात.  तसेच या पदार्थांना सुध्दा बाजारात अधिक मागणी असते.
 बाजारपेठ  :-   
टोमॅटो उद्योगला सर्वत्र मोठया प्रमाणात बाजारपेठ उपलब्ध असल्याचे दिसून येते. किराण दुकान, हॉटेल, विविध प्रकारची खाद्य दुकाने आदी ठिकाणी टोमॅटो पासून तयार केलेल्या पदार्थांना मागणी असते व हे पदार्थ आपणासं विक्रीसाठी ठेवता येतात. तसेच टोमॅटोपासून बनविलेल्या सॉसला सुध्दा चांगली मागणी आहे. त्यामुळे टोमॅटो पासून बनविलेल्या पदार्थांना सर्वत्र चांगली बाजारपेठ उपलब्ध आहे.
प्रकल्पविषय  :- 
हा उद्योग सुरु करण्यासाठी साधारण २ ते ३ लाखरुपये खर्च येतो.  उद्योग सुरु झाल्यावर खर्च कमी अधिक प्रमाणात होऊ शकतो. तसेच बॅक सुध्दा आपली पत पाहून कर्ज पुरवठा करते.  हा उद्योग सुरु झाल्यावर आपणांस चांगला फायदा होऊ शकतो.
 
अधिक माहितीसाठी खाली दिसणाऱ्या Call now बटनवर क्लिक करा….

December 26, 2016

0 responses on "Tomato Processing Business"

    Leave a Message

    Your email address will not be published.

    All Right Reserved.
    Translate »