लिंबू प्रक्रिया उद्योग- भाव नसल्याने वाया जाणाऱ्या लिंबावर प्रक्रिया करा आणि फायदा वाढवा…

भाव नसल्याने वाया जाणाऱ्या लिंबावर प्रक्रिया करा आणि फायदा वाढवा… लिंबू प्रक्रिया उद्योग

Lemon Processing Business – आज महाराष्ट्रात अनेक भागात लिंबाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते विशेष करून जळगाव ,अहमदनगर ,पुणे या भागात तर अनेकांचे अर्थकारण या लिंबावर अवलंबून आहे.
तुम्ही जर वर्षभर लिंबाला मिळणाऱ्या भावाचे दर पहिले तर काही ठरविक काळ या लिंबाला बाजारभाव मिळतो.नाहीतर वर्षातील अनेक काळ या फळाला चांगला भाव मिळत नाही.असा वेळेस जर यावर प्रक्रिया करून त्याची मूल्यवृद्धी करून जर बायप्रोडक्ट्स जर तयार केले तर मग निश्चितच या फळाचे चांगले पैसे शेतकऱ्यास मिळू शकतील.
बाजारभाव नसलेल्या काळात शेतकऱ्यांना फायदा मिळवून देण्यासाठी “लिंबू प्रक्रिया उद्योग’ हाच सर्वोत्तम पर्याय आहे. लिंबू फळातील डी-लिमोनीन, अ-टर्पिनिओल, 4-टर्पिनिओल यांसारख्या घटकांमुळे फळाला विशिष्ट असा स्वाद येतो. लिंबाचा रस आणि त्यातील तैलजन्य घटकांमुळे या फळाला खाद्य प्रक्रिया आणि शीतपेय उद्योगात मागणी आहे. सौंदर्यप्रसाधन कंपन्यांकडून या फळातील तेलाला वाढती मागणी आहे. “प्रक्रियेतून उपपदार्थ म्हणून निर्माण होणारे पेक्‍टीन, सायट्रिक ऍसिड आणि लिंबाच्या सालीत असणारे उपयुक्त तेल आणि अंश यांचा उपयोग औषधी- सुगंधी द्रव्ये आणि सौंदर्य प्रसाधने तसेच साबण निर्मितीकरिता होतो.

चावडी चे Affiliate बना,सोशल मिडिया वर मेसेज शेयर करा,अधिकचे उत्पन्न कमवा.अधिक माहितीसाठी या लिंक वर क्लिक करा.

लिंबातील औषधी गुणधर्मांचा विचार करता त्यापासून लेमन ज्यूस, लेमन ऑइल, लेमन पावडर अशा प्रक्रियायुक्त उत्पादनांची निर्मिती करून त्यांची निर्यात करणे शक्‍य आहे. सौंदर्य प्रसाधने, फार्मास्युटिकल, न्युट्रासिटुकल, औषधी उद्योगातही लिंबाचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. त्याचबरोबर कृत्रिम सायट्रिक ऍसिडपेक्षा नैसर्गिक सायट्रिक ऍसिड वापराकडे कल वाढला आहे. त्यादृष्टीने लिंबावर आधारित प्रक्रिया उद्योगांच्या उभारणीकडे  डोळेझाक करून चालणार नाही. प्रक्रिया उद्योगांची सुविधा उपलब्ध करून दिल्यास लिंबाच्या मूल्यवर्धनातून शेतकऱ्यांचा फायदा होऊ शकतो.

या साठीचा सर्व  बायप्रोडक्ट्स बनविता येईल अशा प्रकल्पाची किंमत साधारण प्रकल्पापेक्षा थोडी जास्त आहे.पण शेतकरी गट किंवा फार्मर प्रोड्युसर कंपनी च्या माध्यमातून जर हा प्रकल्प उभा केल्यास नक्कीच एक चांगला प्रकल्प उभा राहून सर्वांना त्याचा आर्थिक फायदा होवू शकेल. या बरोबर आपणास कोल्ड स्टोरेज सुद्धा उभे करावे लागेल.भांडवली खर्च जसेकी माल खरेदी करण्यासाठी सुद्धा काही रक्कम वेगळी लागेल.
या प्रकल्पास प्रयत्न केल्यास शासकीय अनुदान तसेच पत पाहून बँक कर्ज सुद्धा सहज उपलब्ध होवू शकते.
या लिंबू प्रक्रिया उद्योग प्रकल्प बाबत सर्व प्रकारचे मार्गदर्शन चावडी तर्फे केले जाते.

अधिक माहिती साठी खाली दिलेल्या call now या बटनावर क्लिक करा.

Stay Updated…
Other Blogs
Follow Us On Facebook And Instagram
For More Information Please Call Us On 7272971971

Share this:
March 30, 2021

1 responses on "लिंबू प्रक्रिया उद्योग- भाव नसल्याने वाया जाणाऱ्या लिंबावर प्रक्रिया करा आणि फायदा वाढवा..."

  1. खूपच उत्तम माहिती मिळाली , खरं तर मी या उद्योगाच्याच शोधात आहे . यासाठी प्रशिक्षण आहे का ? असल्यास कोठे मिळू शकते ? याची माहिती मिळणेस विनंती .

Leave a Message

All Right Reserved.