• No products in the cart.

CMEGP scheme

[google-translator]

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP)

“मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम” (CMEGP)  ही योजना राज्यस्तरीय योजना व स्कीम म्हणुन  अंमलबजावणी करण्यात येते. हि योजना उत्पादन, सेवा उद्योग, कृषी पूरक व्यवसाय, कृषीवर आधारित उद्योग, ई-वाहतूक व त्यावर आधारित व्यवसाय, विक्री केंद्र/ खाद्ययान्न केंद्र इ. व्यसायासाठी उपलब्ध करून दिली जाते. 

 

प्रकल्पाची किंमत (Project Cost) : 

सेवा उद्योग : मर्यादा १० लाख

उत्पादन उद्योग : मर्यादा ५० लाख  

प्रात्र व्यवसायाचा प्रकार  :  फक्त  प्रोप्राईटरशीप उद्योगासाठी उपलब्ध आहे. 

 

प्रकल्प खर्चाचे वर्गीकरण :

इमारत खर्च = २०% पेक्षा कमी, मशिनरी खर्च = ५०% पेक्षा जास्त व खेळते भांडवल = ३०% पेक्षा कमी असावे

CMEGP योजनेची वैशिष्ट्ये

१. ५० लाखापर्यंत कर्ज

२. ३५% पर्यंत अनुदान मिळते

३. कमीत कमी कागदपत्रे

४. बँकाकडून प्राधान्याने कर्जवाटप

५. कमीत कमी मार्जिन मनी

६. उद्योजकता प्रशिक्षण

७. रोजगार निर्मिती

८. ग्रामीण भागाला प्राधान्य

 

CMEGP योजनेसाठी पात्रता निकष (CMEGP Scheme Eligibility)

१. महाराष्ट्रातील रहिवाशी असावा .ज्याचे वय १८ ते ४५ वर्ष आहे. विशेष प्रवर्गासाठी पाच वर्ष वयोमर्यादा शिथील आहे म्हणजेच त्यांच्यासाठी वय वर्ष ५० पर्यंत या योजनेअंतर्गत पात्र आहेत.

२. CMEGP Scheme हि रोजगार निर्मिती योजना आहे त्यामुळे यासाठी कुठलीही उत्पन्नाची अट नाही.

३. वैयक्तिक लाभार्थी, प्रोपरायटरशिप, पार्टनरशिप किंवा बचत गट या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

४. रु. १० लाखांपर्यंतच्या प्रकल्पासाठी शिक्षणाची कोणतीही अट नाही परंतु रु १० लाख ते रु २५ लाख पर्यंतच्या प्रकल्पासाठी लाभार्थी किमान सातवी पास असावा आणि रु. २५ लाख रुपयांपेक्षा अधिकच्या प्रकल्पासाठी लाभार्थी किमान दहावी पास असावा.

५. कुटुंबामधील फक्त एकाच व्यक्ती या योजनेसाठी पात्र असेल.

६. तसेच इतर कुठल्याही योजनेअंतर्गत जर आपण अगोदर अनुदानाचा लाभ घेतला असेल तरीही आपण या योजनेसह पात्र नाहीत. 

 

CMEGP Scheme | योजनेची अंमलबजावणी करणारे शासकीय विभाग

महाराष्ट्रात CMEGP Yojana दोन विभागामार्फत राबवली जाते:

१. जिल्हा उद्योग केंद्र

२. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग महामंडळ

 

कर्ज देणाऱ्या बँका

१. सर्व सरकारी बँका

२. सर्व ग्रामीण बँका

३. सर्व प्रायव्हेट बँक

 

CMEGP Scheme अंतर्गत मिळणाऱ्या बँक कर्जासंबंधी :

१. कर्ज रक्कम : या योजनेमध्ये बँक सामान्य प्रवर्गातील अर्जदाराची ९०% पर्यंत कर्ज देते तर राखीव प्रवर्गातील अर्जदाराची ९५% पर्यंत कर्ज पुरवठा करते.

२. कर्ज प्रकार : या योजनेअंतर्गत मुदत कर्ज व कॅश क्रेडिट या दोन्ही प्रकारात कर्ज पुरवठा केला जातो. अनुदान रक्कम प्रकल्पाच्या एकूण रकमेवर दिले जाते. परंतु कॅश क्रेडिट चा वापर पूर्णपणे झाला असेल तरच हि रक्कम अनुदानाला पात्र ठरवता येईल.

३. व्याज दर : व्याज दर हे बँकेच्या नियमानुसार आकारले जातील.

४. परतफेड कालावधी : परतफेड कालावधी सामान्यतः ३ ते ७ वर्षापर्यंत दिला जातो.

५. लॉक इन कालावधी : आपले कर्ज कमीत कमी अनुदानाच्या लॉक इन कालावधी पर्यंत तरी सुरु ठेवने बंधनकारक असते.

 

CMEGP कागदपत्रे यादी (CMEGP documents list)

१. उद्योग आधार ( उद्योग आधार ५ मिनिटात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा )

२. पासपोर्ट साईझ फोटो

३. आधार कार्ड

४.. रहिवाशी प्रमाणपत्र

५. शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र

६. हमी पत्र (Undertaking Form for CMEGP Scheme)

७. प्रोजेक्ट रिपोर्ट

८. जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)

९. ट्रैनिंग प्रमाणपत्र (EDP Training Certificate)

१०. स्पेशल प्रवर्ग प्रमाणपत्र (दिव्यांग प्रमाणपत्र)

 

व्यवसाय नोंदणी (Business Registration)

या CMEGP Scheme अंतर्गत कर्ज प्रकरण करण्यासाठी आपला व्यवसाय उद्योग आधार नंबर काढून घेणे बंधनकारक आहे,

 

कर्जाच्या अटी:

  • कर्जाची रक्कम: या योजनेअंतर्गत प्रदान केलेली कमाल कर्जाची रक्कम राज्यानुसार बदलू शकते.
  • व्याजदर : कर्जावरील व्याजदरही राज्य सरकार ठरवते.
  • कर्जाची परतफेड: कर्जाची परतफेड करण्यासाठी एक निश्चित कालमर्यादा निश्चित केली आहे.
  • हमी: काही प्रकरणांमध्ये, कर्जासाठी हमी आवश्यक असू शकते.
  • वापर: कर्जाचा वापर केवळ स्वयंरोजगारासाठी केला जाऊ शकतो.
September 30, 2025

0 responses on "CMEGP scheme"

Leave a Message

All Right Reserved.
×

Please Login to Continue Process

To access this feature, please login or create your account.