नियम व अटी
–आम्हाला लीड कोणत्या भागातून मिळणार ?
-तुमच्या पॅकेज नुसार ज्या भागासाठी तुम्ही जाहिरात करणार आहात त्या भागातून तुम्हाला मेजरली लीड मिळतील exceptionally कदाचित इतर भागातून सुद्धा तुम्हाला काही लीड येऊ शकतात.
–तुम्ही म्हणता फिल्टर लीड देणार म्हणजे नेमके काय समजून सांगा ?
–जेव्हा चावडीची जाहिरात वेगवेगळ्या माध्यमातून कोणतीही व्यक्ती बघते तेव्हा ती त्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट असल्यास स्वतःहून कॉल सेंटरला फोन करते त्यामुळे या सेगमेंटला आम्ही फिल्टर लीड म्हणतो. कारण ग्राहकाने स्वतःहून आपल्याला फोन केलेला असतो. किंवा जेव्हा सोशल मीडिया वरती आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून जाहिरात करतो तेव्हा एक लिंक द्वारे आपले प्रमोशन केले जाते जेव्हा ग्राहक लिंक वर जाऊन तुमच्या कंपनी विषयी माहिती वाचून मग खाली स्वतःहून फॉर्म भरतो तेव्हा आम्ही त्याला फिल्टर लीड असे म्हणतो
– लीड्स आम्हाला कुठे आणि कशा स्वरूपात मिळणार ?
-तुम्हाला तुमच्या उद्योगासाठी येणाऱ्या सर्व लीड ई-मेल वरती मिळतील ज्यामध्ये इच्छुक व्यक्तीचे नाव , मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि इतर माहिती असेल.
–नक्की ही जाहिरात ची प्रक्रिया कशी असणार आहे ?
-चावडी वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या कॉल सेंटर ची जाहिरात करते.स्वतचा नवीन बिझनेस सुरू करण्यापेक्षा थेट डीलरशिप घेण्यास इच्छुक व्यक्ति कॉल सेंटर ला फोन करून माहिती घेतात.प्रतींनिधी इच्छुकांची माहिती वेबसाइट वरील वेब फॉर्म भरून कंपनी ला मेल वर पाठवतात.कंपनी मग इच्छुकांना नंतर संपर्क करून त्यांना कंपनी सोबत जोडून घेतात.
–जाहिरात केल्यावर आम्हाला किती Lead मिळतील आणि किती दिवस ?
-आम्ही फिल्टर लीड्स देण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे नेमक्या किती लीड्स मिळतील असे सांगता येत नाही.तुम्ही पॅकेज घेतल्यावर लगेच दुसर्या दिवशी पासून तुम्हाला लीड्स सुरू होतील असेही नाही.पॅकेज वर्षभराचे आहे.तुम्हाला वर्षभरात कधीही लीड्स येवू शकतात.मात्र तुम्ही घेतलेल्या पॅकेज नुसार तुम्हाला वर्षभर लीड्स मिळत राहतील हे नक्की.अगदी पॅकेज च्या शेवटच्या दिवशी सुद्धा तुम्हाला एखादी महत्वाची लीड् मिळू शकते जिथून तुमचा बिझनेस वाढेल.
–समजा दिवाळी च्या अगोदर माझा माल संपण्यासाठी मी काही ऑफर काढली असेल तर ती मी चावडीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचू शकतो का?
-हो. निश्चित अशा वेळी वर्षभरातून एकदा तुम्हाला चावडीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून तुम्ही काढलेल्या ऑफर विषयी तुम्हाला मोफत माहिती देता येईल व पेड सुविधा उपलब्ध आहे तसेच तुम्हाला तुमच्या लोकल भागातील चावडी कडील उपलब्ध डेटाला सुद्धा पेड स्वरूपात जाहिरात करता येईल. मात्र लक्षात घ्या ही सुविधा सुद्धा चार्जेबल असेल.
–तुमच्याकडे जाहिरात केल्यावर जर मला एखादा डीलर डिस्ट्रीब्यूटर मिळाला आणि त्यांनी माझी फसवणूक केली तर याला चावडी जबाबदार राहणार का?
-नाही.आम्ही फक्त तुम्हाला एकमेकासोबत जोडून देत आहोत त्यानंतर तुमच्या कोणत्याही व्यवहारात (आर्थिक किवा इतर) आमचा प्रत्यक्षं किंवा अप्र्यत्यक्ष रित्या संबंध असणार नाही.
–डीलर डिस्ट्रीब्यूटर चा लोकल भागात बिजनेस व्हावा यासाठी चावडी काही मदत करणार का त्याचे जाहिरात किंवा प्रसिद्धी करून देणार का?
-हो, पण अर्थात ही सर्विस चार्जेबल असेल.
–चावडी कडे कुठल्याही सर्विसेस साठी भरलेली फी किंवा पैसे परत मिळणार का (Money Refund Policy) ?
-नाही.
–पोस्ट पेमेंट/पार्ट पेमेंट वेळेवर जमा नाही झाले तर सर्विस चालू राहील का?
–अश्यावेळी campaign थांबवण्याचे अधिकार चावडी कडे अबाधित राहील.
–लीड्स मिळाल्या पण कन्व्हर्ट नाही झाल्या तर?
-अश्या वेळेस चावडी जबाबदार राहणार नाही.
–जर माहिती घेणारे व्यक्तीने फसवले तर चावडी जबाबदार राहणार का?
-अश्या वेळेस चावडी जबाबदार राहणार नाही.
–चावडीच्या कार्यक्रमांमध्ये आम्हाला थेट जाहिरात करता येईल का?
–हो. त्यासाठी अतिरिक्त शुल्क आकारले जाईल.
कोणत्याही पूर्वपरवानगीशिवाय किंवा सूचने शिवाय कोणताही नियम व अटी बदलण्याचा रद्द करण्याचा किंवा नव्याने तयार करण्याचा अधिकार कंपनी स्वतःकडे राखून ठेवत आहे.
कोणताही कायदेशीर वाद अहमदनगर न्यायालयीन कक्षेत असेल.
वरील सर्व माहिती आम्ही वाचली असून आम्हाला सर्व नियम व अटी मान्य आहेत.
तारीख- जाहिरात करणाऱ्या कंपनी तर्फे प्रतिनिधीचे
ठिकाण- नाव व सही