तयार भाज्याचे पॅकेजिंग करताना, हे लक्षात ठेवा…!!!

तयार भाज्याचे पॅकेजिंग करताना, हे लक्षात ठेवा…!!!           
                  खाण्यासाठी तयार (रेडी टू इट) अशा भाज्यांची मागणी बदलत्या जीवनशैलीमुळे वाढत आहे. यामध्ये शाकाहारी व मांसाहारी असे दोन्ही पदार्थ येऊ शकतात. शाकाहारी पदार्थांमध्ये विविध भाज्या व कडधान्यांपासून बनविलेले पदार्थ येतात, तर मांसाहारी पदार्थांमध्ये विविध प्रकारच्या मांसाचा समावेश असलेले पदार्थ येतात. या दोन्ही प्रकारांमध्ये मसालायुक्त रस्सा किंवा पेस्ट (घट्ट रस्सा) वापरलेला असतो.  हे सारे प्रक्रियायुक्त अन्नपदार्थ असून, ते त्वfरित खाता येतात. सध्या बाजारामध्ये विविध कंपन्यांची अनेक उत्पादने दिसून येतात. प्रक्रियायुक्त पदार्थ तयार केल्यानंतर त्यांच्या पॅकिंगविषयी काळजी घ्यावी लागते. त्याविषयी अधिक माहिती घेऊ.

पॅक करताना घेण्याची काळजी :-

 • आपण जो पदार्थ तयार करू, त्याची टिकवणक्षमता (शेल्फ लाइफ) जाणून घ्यावी. विशेषतः त्या पदार्थाची चव व त्याचा सुगंध कायम राहण्याचा कालावधी लक्षात घ्यावा.
 • आपल्या पदार्थाचे नैसर्गिक गुणधर्म आपणास माहित असणे आवश्‍यक आहे. ते झाकोळले जाता कामा नये.
 • तेलाचा वापर केला जात असल्याने त्यांच्या वासाचा(रॅन्सिडिटी)चा विचार करावा.
 • पॅकेजिंगची परस्पर क्रिया किंवा प्रतिक्रियाचा विचार करावा. विशेषतः पदार्थातून आत किंवा बाहेर जाणारे वायूविषयी जाणून घ्यावे.
 • पदार्थ खराब करण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या वायूंना अटकाव करणे.
 • पदार्थामुळे आतमध्ये तयार होणारे वायू (गॅस) व त्यांचे परिणाम पदार्थ व पॅकेजिंगवर काय होतात, हे माहित असले पाहिजे.
 • पदार्थामध्ये वापरलेल्या प्रिझर्व्हवेटिव्हचे परिणाम.
 • पॅकेजिंगसाठी वापरावयाची यंत्रसामग्री.
 • बाजारपेठ कोणती आहे व कशी आहे, यासह तेथील नेमक्‍या मागणीचा अंदाज घेणे आवश्‍यक आहे.
 • साठवणुकीसाठी सुविधा.
 • सूक्ष्मजीव, जंतू यांचा संसर्ग व त्यासंबंधीची पूर्ण माहिती असली पाहिजे.

पॅकिंगची वर्गवारी खालीलप्रमाणे :- 

१. पदार्थाच्या टिकावूपणाचा विचार करून खालीलपैकी एखाद्या पॅकेजिंगचा वापर करावा.
२.  लवचिक पाऊच (फ्लेक्‍झिबल) या प्रकारात अनेक वर्गवारी आहेत.
३.  प्रमाणित पाऊच (स्टॅण्डर्ड पाऊच) ब) असेप्टिक पाऊच क) रिट्रोर्ट पाऊच ड) उभे राहतील असे स्टॅण्डी पॅक ई) बॉईलिंग बॅग फ) मायक्रोमुव्हेबल बॅग
४.  फ्लेक्‍झिबल सॉल्ट कंटेनर थर्मोफॉर्मल शेपड (आकाराच्या) सॉल्ट पाऊच येतात.
५.  थर्मोफॉर्मड कंटेनर.
६.  साचा प्रकारचे प्लॅस्टिक (मोल्डेड) कंटेनर.
७.  धातूचे कंटेनर.

पॅकेजिंगच्या निवडीपूर्वी काही चाचण्या आवश्‍यक :- 

१.  वायूंच्या आवकजावक जाणण्यासाठी (पर्मियाबिलीटी ऑफ गॅसेस) ही चाचणी बहुतेक सर्व पॅकेजिंगला लागू होते.
२.  हवाबंद होण्याची क्षमता (सील स्ट्रेन्थ) ही चाचणी फ्लेक्‍झिबल पाऊच व रिजिड कंटेनरच्या सीलसाठी लागू होते.
३.  डिलॅमिनेशन ही चाचणी पाऊचला लागू होते.
४.  दबाव चाचणी (कॉम्प्रेशन सेट) ही बहुतेक सर्व प्रकारच्या पॅकेजिंगला लागू पडते.
५.  पॅकेजिंग पदार्थासह खाली पडल्यानंतर त्याची टिकण्याची क्षमता ड्रॉप टेस्टमध्ये तपासली जाते. ती सर्व प्रकारच्या उत्पादनांच्या पॅकेजिंगसाठी लागू पडते.
६. अतिनील किरणांचा परिणाम (यू.व्ही. इफेक्‍ट) ही चाचणी सर्व प्रकारच्या पॅकेजिंगसाठी लागू पडते.
७. धातूच्या कंटनेरमधील आवरणाकरिता असलेली लॅक्वर टेस्ट ही चाचणी आहे.
प्रक्रियायुक्त अन्नाच्या पॅकिंग/पॅकेजिंगची रचना करताना घ्यावयाची काळजी 

१. आपले उत्पादन कोणते, कसे असेल, त्याचे आकारमान कसे असेल, याचा विचार करून, त्यानुसार पॅकेजिंगची रचना करणे योग्य ठरते.
२. वजनुसार ठरवा पॅकेजिंगची रचना. उदा. १०० ग्रॅम, २०० ग्रॅम, ५०० ग्रॅम किंवा त्याहून जास्त अशा पॅकेजिंगची रचना भिन्न असू शकते.
३. अटकाव क्षमता पॅकेजिंगची रचना करताना कुठल्या वायूंना मज्जाव करावयाचा, याचा विचार करणे अत्यंत आवश्‍यक आहे.
४. वाहतूक व हाताळणीच्या पद्धतीनुसार प्राथमिक किंवा दुय्यम पॅकेजिंग ठरविता येईल.
५. पॅकेजिंग साधनांची उपलब्धताही अनेक वेळा महत्त्वाची ठरते.
६.  सर्वात महत्त्वाचे म्हणजे आर्थिक क्षमता विचारात घ्यावी.
पॅकेजिंगसाठी विविध पर्याय   :-
१. फ्लेक्‍झिबल पाऊच – पॉली किंवा ऍल्युफॉइल किंवा पेट-बीओपीपी फिल्म किंवा रिटॉर्ट पाऊच. या करिता खास पद्धतीने रचना केलेली विविध कॉम्बिनेशन्स बाजारात उपलब्ध आहेत.
२.  मोल्डेड कंटेनर/थर्मोफॉर्मड कंटेनर – यात शक्‍यतो पॉलिप्रोफीलिनचे कंटेनर उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे काही प्रमाणात एचडीपीईचे कंटेनरसुद्धा वापरले जातात.
३.  धातूचे कंटेनर – या प्रकारात टीन प्लेट कंटेनर व ऍल्युमिनियमचे कंटेनर वापरता येतात.

पॅकेजिंगची यंत्रणा :– 
१. अन्नपदार्थांच्या सर्व प्रकारच्या पॅकेजिंगकरिता यंत्रे व अन्य सामग्री उपलब्ध आहेत. त्यामध्ये जंतुविरहित गुणधर्म (ऍम्बियन्स) असणे अत्यंत आवश्‍यक आहे. या गुणधर्मामुळे सूक्ष्म जीवाणूंची वाढ होत नाही.
२. सर्वसाधारणपणे प्रक्रियायुक्त पदार्थांचा टिकाऊपणा ३ ते ६ महिने असू शकतो.

[wcps id=”5510″]

चावडी   :- 72 49 85 64 23/24

 

March 25, 2017

0 responses on "तयार भाज्याचे पॅकेजिंग करताना, हे लक्षात ठेवा...!!!"

  Leave a Message

  Your email address will not be published.

  All Right Reserved.
  Call Now ButtonCall Now
  Translate »