गांडूळखत निर्मिती

 गांडूळखत निर्मिती

प्रकल्पाची ओळख :    

रासायनिक खतांच्या अतिरेकामुळे  जमिनीची सुपीकता कमी होते हे लक्षात आल्यामुळे शेतकरी आता नैसर्गिक खतांकडे वळू लागले आहेत. गांडूळ खत वापरल्यास पिकांचे उत्पन्न वाढते, जमीन भुसभुसित होते, नांगरटिचा खर्च कमी होतो. गांडुळाचा विष्ठेमुळे जमीन सकस होते, भुसभुसित जमीनिमुळे मुळांना चांगली हवा मिळते, पाण्याचा ओलावा टिकून धरला जातो व निचराही चांगला होतो.
गांडूळ २ वर्षे जगतात. पूर्ण वाढ झालेले गांडूळ वाळवून पशूखाद्य म्हणून विकता येतात. यात ७० टक्के प्रथिने असतात .
चावडी चे Affiliate बना,सोशल मिडिया वर मेसेज शेयर करा,अधिकचे उत्पन्न कमवा.अधिक माहितीसाठी या लिंक वर क्लिक करा.

प्रकल्प आराखडा :

 • उत्पादन प्रक्रिया /कार्यप्रक्रिया :

गांडूळ खत तयार करण्यासाठी आयसोनिया फेटिडा, युड्रिलस युजिनि या गांडूळांच्या जाती चांगल्या आहेत. खतासाठी पेंढा, तुस, झाडांचा पालापाचोळा, शेण, कोंबडीची विष्ठा, भाजीपल्याचे अवशेष, उसाचे पाचट, शेतातील काडीकचरा यांचा वापर करतात.
फळे भाजीपाला यांचा कचरा यंत्रातून बारीक करावा. शेण, मंडईतील फळे, भाजीपल्याचा कचरा एकत्र करून त्याचा जमिनीवर गादीवाफा तयार करावा. हा वाफा १.५ मीटर रुंद व ०.९ मी उंचीचा असावा .प्रत्येक घनमीटरसाठी  ३५० गांडूळ या प्रमाणे या गादीवाफ्यात गांडूळ सोडावेत. या वाफ्यात पाणी शिंपडून ४० ते ५० टक्के आद्रता ठेवावी व २० ते ३० डिग्री सेल्सिअस तापमान ठेवावे. पाण्याचे बाष्पीभवन होऊ नये म्हणून बांबू व लकड्याच्या सहाय्याने मांडव घालावेत. १५ मीटर लंबी व ५.४ मीटर रुंदीच्या जमिनीवर ८ मांडव घालून ६० गादीवाफे तयार करता येतात.
गादीवाफे अधूनमधून सैल करावेत म्हणजे त्यात हवा खेळती राहील. गादीवाफ्यात घातलेला कचरा गांडूळ खातात व त्यांनी टाकलेली विष्ठा म्हणजे उत्तम दर्जाचे खत. होय सर्व कचरा खाऊन झाल्यावर गांडूळ तळाशी जातात . काळ्या रंगाचे ,भुसभुसित खत तयार झाल्यावर पुढील ३-४ दिवस पाणी शिंपडू नये .चौथ्या दिवशी कोरडे झालेले खत ओंजळीने आलगद पाटीत टाकावे .
गांडूळ प्रकाशात राहत नसल्याने ते पुन्हा खताच्या तळाशी जात राहतात व वरील खत अलगद काढणे शक्य होते .तळाशी फक्त गांडूळचराहतील ,त्यानंतर पुन्हा कचरा ,शेण टाकून दूसरा गादी वाफा तयार करावा ,खत काढताना कोणत्याही उपकरणाचा किवा हत्याराचा वापर करू नये .
७० दिवसाचे एक पीक अशी वर्षात ५ वेळा पिके घेता येतात .तयार खत वाळवून प्लॅस्टिकच्या पिशव्यात पॅक करून विक्रीला पाठवावे .

 • प्रकल्प क्षमता :

       हा प्रकल्प मध्यम स्वरूपाचा असून या प्रकल्पात वार्षिक सरासरी २१६ मे.टन  खत इतके गांडूळखताचे उत्पादन अपेक्षित आहे.
 

 • बाजारपेठ /संभाव्य ग्राहक वर्ग :

       सर्व शेतकर्‍यांना उपयुक्त असणारे गांडूळखत गावातल्या व तालुक्यातील शेतकर्‍यांना प्रत्यक्ष विकत घेता येईल किंवा शेतीला लागणार्‍या वस्तु विकणार्‍या सहकारी किंवा खासगी दुकानांच्या माध्यमातून विकता येईल.
 

 • उपलब्ध जागा :

१००० चौ.फुट आच्छादित /मोकळी जागा.
 

 • उपयुक्तके /मूलभूत सुविधा :

सिंगल फेजचे वीज कनेक्शन, पाणी गरजेनुसार.
 

 • मनुष्यबळ /कर्मचारी वर्ग आवश्यकता :

उद्योजक स्वत: उत्पादनप्रक्रियेत सहभागी होणार असून, गरजेनुसार हंगामी कामगारांकडून काम करून घेता येईल,असे गृहीत धरले आहे.
 

७. भांडवलाचा तपशील :

७.१ स्थिर भांडवल :(१महिन्यासाठी ):

अ.क्रतपशीलनगदरएकूण किंमत
१.
 
 
 
 
 
 
 
२.
 
यंत्रसामग्री व साहित्य :
१.       विजेवरचे भुसा कापणी यंत्र
२.       पाण्याचा पंप व पाणी फवारणी नळयांचा संच
३.       सपाट वजन काटा
४.       इतर साधने व हत्यारे
५.       सीलिंग मशीन
पूर्व –उत्पादन खर्च
 

 

 
 
१८,०००

२,५००

१,५००
 
१८,०००

३,०००
२,५००
१,०००
१,५००
१०,०००
 
एकूण३६,०००

७.२ खेळते भांडवल ( १महिन्यासाठी ) :

अ) प्रमुख बाबी :

१) कच्चा माल व साहित्य :

अ.क्रतपशीलप्रमाणदर (रु .)एकूण किंमत
१.
२.
३.
जैव विघटन होणारा कचरा
वर्मी कास्टिंग्स
शेण
१,५००
१००
८००
एकूण२,४००

 
२) मनुष्यबळ /कर्मचारीवर्गावरील खर्च :

अ.क्रतपशीलसंख्याप्रत्येकी दरदिवशी वेतन (रु )एकूण कामाचे दिवसएकूण किंमत (रु )
१.अकुशल हंगामी मजूर२००१२,००
एकूण१२,०००

 

ब) एकूण खेळते भांडवल (१ महिन्यासाठी ) :

अ.क्रतपशीलनगदरएकूण किंमत
१.
२.
३.
४.
 
 
५.
६.
७.
कच्चा माल व साहित्य
मजुरी
देखभाल –दुरूस्ती
मूलभूत सुविधा
१.       वीज
२.       पाणी
प्रशासकीय खर्च
जागा भाडे
इतर खर्च 
100 यूनिट


 
६ रु. /यूनिट२,४००
१,२००
१,०००
 
६००
४००
१०००
२०००
१०००
९,६००

 
८. भांडवलाची उभारणी :

अ.क्रतपशीलरक्कम (रु .)अ.क्रतपशीलरक्कम (रु .)
१.
२.
 
स्थिर भांडवल
खेळते भांडवल
 
 
 
एकूण
३६,०००
९,६००
१.
 
 
२.
 
स्वत:चे भाग भांडवल
(खेळते भांडवल +२५ % स्थिर भांडवल )
अपेक्षित बँक कर्ज
(७५ %)
 
एकूण
१८,६००
 
 
२७,०००
 
४५,६००४५,६००

 
९. नफा –तोता पत्रक (वार्षिक ) :
अ ) एकूण उत्पन्न :

अ.क्रउत्पन्नाच्या बाबीवार्षिक उत्पन्नाचा तपशीलएकूण उत्पन्न
१.
 
 
गांडूळखत विक्री .१,५०० रु /प्रती मे.टन . दराने दरमहा १८ मे.टन =२७,००० रुदरमहा २७,००० रु X १२ महीने३,२४,०००
एकूण३,२४,०००

 

ब ) एकूण खर्च रुपये (वार्षिक ) :

अ.क्रतपशीलखर्च (रु )
१.
२.
 
३.
४.
खेळते भांडवल
घसरा :
१.       यंत्र सामग्री व साहित्य (२० %)
उधारी ( २ %)
बँक कर्जावरील व्याज
१,१५,२००
 
५,२००
६,४८०
२,७००
 
एकूण१,२९,०६०

 
८. निव्वळ उत्पन्न रुपये :
= स्थूल उत्पन्न –एकूण खर्च-मुद्दल हप्ता
= ३,२४,०००- १,२९,५८० – ९,०००
= १,८५,४२० रु.
९. ना नफा ना तोता बिन्दु :
 
निश्चित खर्च X १००           १,२९,५८० X १००
————————————-  = ——————————–    =    ४१ %
निश्चित खर्च + निव्वळ नफा       १,२९,५८० + १,८५,४२०
 
 
 
 
 
 
 
 
 
 

January 11, 2018

0 responses on " गांडूळखत निर्मिती"

  Leave a Message

  Your email address will not be published.

  All Right Reserved.
  Call Now ButtonCall Now
  Translate »