Vegetabale Dehyadration

Vegetabale Dehyadration
नका फेकून देऊ रस्त्यावरती आपला शेतमाल करू त्यावर प्रक्रिया आणि होऊ मालामाल…
भाजीपाला प्रक्रिया उद्योग
प्रत्येक शेतकऱ्यांने वाचावा असा लेख…
काल-परवा पेपर मध्ये अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यातील एका शेतकऱ्याची बातमी वाचली सोबत फोटो सुद्धा होता आपल्या कोबीच्या उभ्या पिकावर त्या शेतकऱ्यांने ट्रॅक्टर फिरवला कारण एकच…..
कोबीचे भाव बाजारात खूप पडले होते विकून काहीही फायदा झाला नसता…. नक्कीच हे खूप त्रासदायक आणि क्लेशदायक आहे पण व्यापाऱ्यांची साखळी आणि मार्केटचा चढ-उतार ही नेहमीचीच अडचण शेतकऱ्यांसाठी होऊन बसली आहेत…
मग आता तुम्हाला आम्हाला मिळूनच यावरती पर्याय शोधायला हवा….
जेव्हा शेतकरी शेतमाल रस्त्यावर शेतकरी फेकून देतो किंवा उभ्या पिकावर नांगर चालवतो तेव्हा यातून या व्यापाऱ्यांचा, सिस्टीमचा कोणताही तोटा होत नाही…. तोटा होतो तो आपला… बळीराजा चा…..
तुम्ही म्हणताल मग अजून करायचं तरी काय?? फक्त आपलं होणारे नुकसान बघत बसायचं आणि बाजारात माल नेऊन फक्त आणि फक्त पदरी निराशाच घेऊन यायची का????
तर नाही याकरता एक पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे फक्त त्यासाठी थोडस आपल्याला अपग्रेड व्हावा लागेल अपग्रेड व्हायचं म्हणजे काय???
खूप सोपे आहे…. मी नेहमी शेतकऱ्यांना सांगतो जेव्हा आपल्या शेतमालाला भाव मिळत असतो तेव्हा जरूर आपला माल आहे तसेच बाजारात विका आणि पैसे मिळवा पण जेव्हा असं होतं की आपल्या शेतीमालाला भाव मिळत नाही तेव्हा कुठेतरी तो रस्त्यावर फेकून देण्यापेक्षा जर शेतावरती आपण काही सोप्या प्रक्रिया केल्या तर नक्कीच भविष्यात आपल्याला तो शेतमाल विक्रीसाठी उपलब्ध होईल आणि त्यातून चांगला मोबदला सुद्धा तुम्हाला मिळाला मदत होऊ शकेल…
चावडी चे Affiliate बना,सोशल मिडिया वर मेसेज शेयर करा,अधिकचे उत्पन्न कमवा.अधिक माहितीसाठी या लिंक वर क्लिक करा.
या प्रक्रियेचे नाव आहे भाजीपाला निर्जलीकरण म्हणजेच सोप्या भाषेत भाजीपाला सुकवणे..
आपल्याकडे भारतामध्ये काही लोकांनी मोठा व्यवसाय म्हणून सुद्धा सुरू केला आहे प्राथमिक तत्वावर शेतकरी उद्योग म्हणून सुरु न करता आपली गरज म्हणून सुरू करू शकतो. म्हणजे काय की जर आपल्या शेतीमालाला भाव मिळत नसेलच तर त्याला सुकवून किंवा त्याचं निर्जलीकरण करून हा माल आपल्याला सहा महिने ते तब्बल वर्षभर टिकवता येतो..
आम्ही गेल्या एक ते दीड वर्षापासून चावडीमध्ये अनेक शेतकरी बांधवांना या vegetable डीहायड्रेशन किंवा भाजीपाला निर्जलीकरण याविषयी माहिती देत आलो आहोत..
माझा प्रयत्न हाच आहे की सुरुवातीला फक्त वाया जाणारा शेतमाल प्रक्रिया करून सुकुन ठेवला आणि नंतर जर त्याला पण बाजार मिळू शकला तर ज्या गोष्टीची किंमत शून्य झालेली होती तिला याच प्रक्रिया केलेल्या बाजारपेठांमध्ये चांगल्यापैकी पैसे मिळू शकतील त्यात शेतकऱ्याचे नुकसान नाही तर फायदा आणि फक्त फायदाच होईल…
त्यामुळे आपल्याकडे टोमॅटो कांदा कोबी किंवा इतर शेतमाल जर भाव न मिळाल्याने फेकून दिला जात असेल तर नक्कीच त्या शेतकऱ्यांना भाजीपाला निर्जलीकरण याविषयी थोडक्यात माहिती जरूर द्या जर याविषयी अधिक माहिती तुम्हाला जर घ्यावीशी वाटली तर चावडी मधे या विषयाचा सविस्तर प्रशिक्षण दिले जाते तुम्हाला या आणि यासारख्या अनेक शेती पूरक उद्योगांची माहिती त्यात मिळू शकेल..
हा उद्योग सुरवातीला २-३ लाख इन्व्हेस्टमेंट करून सुरु करता येईल.
यासाठी पत पाहून बँक कर्ज पुरवठा करते तसेच शासकीय अनुदान सुद्धा उपलब्ध आहे.
अपेक्षा करतो की आजचा हा वेगळा विषय शेतकऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांच्या नवीन उद्योजक मुलांसाठी फायदेशीर ठरेल.
धन्यवाद

अधिक माहिती साठी खाली दिलेल्या call now या बटनावर क्लिक करा.

April 6, 2018

1 responses on "Vegetabale Dehyadration"

  1. Dehydration + instant poha business chalu karnebabtit

Leave a Message

Your email address will not be published.

All Right Reserved.
Call Now ButtonCall Now
Translate »