फळे पिकविण्यासाठी इथिलिनचा वापर………..

फळे पिकविण्यासाठी इथिलिनचा वापर………..
इथिलीन हे संजीवक फळे पिकविण्यासाठी उपयुक्त आहे असे अभ्यासात आढळून आले आहे. मात्र त्याचा वापर करण्यापूर्वी इथिलीनचे गुणधर्म, फळ पिकवणी कक्षाचे व्यवस्थापन, घ्यावयाची काळजी आदी गोष्टींची सखोल माहिती असणे आवश्‍यक असते.
इथिलिनचा वापर फळे पिकविण्यासाठी फार पूर्वीपासून केला जात होता. प्रामुख्याने इटलीमध्ये सफरचंद पिकविण्यासाठी काही पिकलेली फळे सफरचंदाच्या आढीत ठेवली जात. काही देशांत लिंबू पिकविणारे शेतकरी हिरवे लिंबू पिवळे होईपर्यंत केरोसीनने गरम केलेल्या शेडमध्ये ठेवत. संशोधनाअंती आढळून आले, की केरोसीन जाळल्यानंतर तयार होणाऱ्या गॅसमध्ये इथिलीन वायू असतो. इजिप्तमध्ये अंजीर पिकविण्यासाठी गॅसचा वापर केला जात असे, तर चीनमध्ये बंद खोलीमध्ये सुवासिक काड्या जाळून पियर पिकवली जात असत. तर भारतामध्ये बंद खोलीमध्ये आंब्याची आढी घालून गवत जाळले जात असे. या दोन्ही गोष्टींत इथिलीन गॅस तयार होत असे आणि फळे पिकत असत. सन 1970 नंतर इथिलीन हे संजीवक फळे पिकविण्यासाठी उपयुक्त आहे असे आढळून आले.
सर्वसाधारणपणे फळे पिकविण्यासाठी नैसर्गिक इथिलीनची मात्रा 0.1 ते 1.0 पीपीएम एवढी पुरेशी असते असे अभ्यासात आढळून आले आहे; परंतु बाह्य स्वरूपात 100 ते 200 पीपीएमची मात्रा कमीत कमी 12 तास देणे आवश्‍यक आहे. मात्र इथिलीन गॅसचे प्रमाण तीन टक्के ते 32 टक्के असल्यास ज्वालाग्राही असते.
तापमानाची आवश्‍यकता ः
सर्वसाधारणपणे फळ पिकविताना तापमान 18 ते 25 अंश सेल्सिअस असावे. 18 अंशांपेक्षा कमी तापमान असल्यास पिकविण्याची क्रिया मंद होत जाते. तर 25 अंशाच्या पुढे तापमान असल्यास बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. 30 अंशांच्या पुढे तापमान झाल्यास फळ पिकण्याची क्रिया थांबते.

चावडी चे Affiliate बना,सोशल मिडिया वर मेसेज शेयर करा,अधिकचे उत्पन्न कमवा.अधिक माहितीसाठी या लिंक वर क्लिक करा.

आर्द्रता ः

फळ पिकवणी कक्षात आर्द्रतेचे प्रमाण 85 ते 95 टक्के ठेवले जाते; परंतु काही व्यावसायिक फळ पिकवणी कक्षामध्ये आर्द्रता 80 टक्के ठेवली जाते.
फळ पिकवणी कक्षात इथिलीन देण्याच्या पद्धती ः
1) —–शॉट—— सिस्टिम ः या पद्धतीमध्ये इथिलीन गॅस मोजून ठराविक अंतराने दोन ते तीन वेळेत दिला जातो. यामध्ये वायुविजनाची सोय केली जाते. जेणेकरून तयार झालेला कार्बन- डाय- ऑक्‍साइड बाहेर काढला जातो. ज्यामुळे फळ पिकविण्याची क्रिया व्यवस्थित होत जाते.
2) ट्रिकल सिस्टिम ः या पद्धतीत इथिलीन गॅस हा फळ पिकवणी कक्षात सातत्याने सोडला जातो; परंतु यामध्ये इथिलिनचा प्रवाह कमी असतो व त्याचे नियमित नियंत्रण केले जाते. या फळ पिकवणी कक्षात कार्बन- डाय- ऑक्‍साईडचे प्रमाण कमी करण्यासाठी दर सहा तासांनी बाहेरची हवा —–एक्‍झॉस्ट—— पंख्याचा वापर करून आत घेतली जाते व कार्बन- डाय- ऑक्‍साइड बाहेर काढला जातो. बऱ्याच वेळे इथिलीन ज्वालाग्राही असल्याने त्यामध्ये इतर गॅस मिसळून इथिलीनची ज्वालाग्राहीची तीव्रता कमी केली जाते.
3) इथिलीन जनरेटर ः यामध्ये इथिलीन तयार होण्यासाठी द्रव पदार्थ वापरला जातो. त्यास उष्णता दिल्यानंतर त्यामधून इथिलीन गॅस बाहेर पडतो. या इथिलीन जनरेटरमध्ये इथेनॉल या द्रव पदार्थाचा वापर केला जातो आणि यामध्ये कॅटॅलिस्ट वापरून इथिलीनचे प्रमाण नियंत्रित केले जाते. बहुतांश फळ पिकवणी कक्षात इथिलीन जनरेटरचा वापर केला जातो.
इथिलीन हा नैसर्गिक गॅस असल्याने बाहेरील सालीचा रंग बदलण्याबरोबरच आतील पिष्टमय पदार्थांचे साखरेमध्ये रूपांतर होऊन जाते. अशा फळांना त्या फळांचा विशिष्ट स्वाद व चव प्राप्त होते.
इथेफॉनचा वापर
हे द्रावण पाण्यामध्ये आम्लधर्मीय आहे; परंतु जेव्हा सामू अल्कली होतो तेव्हा त्यामधून इथिलीन गॅस तयार होतो. हे रसायन वापरण्यामध्ये महत्त्वाचा तोटा म्हणजे फळे ही इथेफॉन मिश्रित पाण्यात बुडवावी लागतात आणि हाताळणीमध्ये फळ पिकताना बुरशीचे प्रमाण वाढते. त्यामुळे इथेफॉनचे द्रावण तयार केल्यानंतर पुन्हा फळांना बुरशीनाशकाची मात्रा द्यावी लागते; परंतु सामान्य शेतकऱ्यांसाठी ही पद्धत कमी खर्चाची असल्याने उपयुक्त ठरते.
ज्या लोकांना कमी प्रमाणात आंबे पिकवायचे आहेत त्यासाठी बंद खोलीत आंबे ठेवल्यानंतर इथेफॉनमध्ये कॉस्टिक सोड्याच्या गोळ्या टाकल्यास त्यामधून इथिलीन गॅस तयार होऊ शकतो; परंतु त्यासाठी खोलीच्या क्षेत्रफळानुसार ही मात्रा द्यावी लागते.

टीप ः इथिलीनचा वापर करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

 
May 26, 2017

0 responses on "फळे पिकविण्यासाठी इथिलिनचा वापर..........."

    Leave a Message

    Your email address will not be published.

    All Right Reserved.
    Call Now ButtonCall Now
    Translate »