केळीपासून टिकाऊ प्रक्रियायुक्त पदार्थ……!!!

केळीपासून टिकाऊ प्रक्रियायुक्त पदार्थ……!!!
केळीपासून अनेक टिकाऊ पदार्थ व लगेच खाण्याचे पदार्थ व लगेच खाण्याचे पदार्थ तयार होऊ शकतात. विशेषत: ज्या वेळेस केळीला जास्त उत्पादनामुळे रास्त भाव मिळत नाही त्या वेळेस असे पदार्थ बनवून जास्तीत जास्त आर्थिक फायदा मिळविता येतो. त्यामुळे केळीचे विविध पदार्थ बनवून जास्तीत जास्त आर्थिक फायदा मिळविता येतो. त्यामुळेच केळीच विविध पदार्थ तयार करण्यास चांगला वाव आहे.
 

 
     केळीचे पीठ  :-
 

 • कच्च्या केळीचे साल काढून बारीक काप करावेत.
 • केळीचे साल काढल्यानंतर केळी थोडीशी काळी पडतात. याकरिता सर्व अवजारे स्टेनलेस स्टीलची वापरावीत.
 • कापलेले काप पोटॅशियम मेटाबाय सल्फाइडच्या द्रावणात बुडवून उन्हात वाळवून घ्यावेत.
 • वाळलेले कापकाप मिक्सरमध्ये किंवा ग्राइंडरमध्ये दळून त्याचे पीठ करावे.
 • कच्चा केळीमध्ये स्टार्चचे प्रमाण ७० ते ८० टक्के असते. त्यामुळे विविध पदार्थांत त्याचा फिलर म्हणून उपयोग करता येतो. त्याचप्रमाणे उपवासाचे पदार्थ उदा. शेव, चकली, गलाबजाम इ. पदार्थ तयार करता येतात.

 
   ज्युस   :-

 • पूर्ण पिकलेली केळी पाण्याने स्वच्छ धुऊन त्यावरील साल काढून टाकावी.
 • स्क्रू टाइप पल्परच्या साह्याने केळीचा पल्प काढावा. त्यात १०० पीपीएम पोटोशिअम मेटाबाय सल्फाइड व ०.२ टक्के पेक्टिनेन एन्झाइम मिसळून हे मिश्रण चार तासांपर्यत ३० अश सेल्सिअम तापमानला ठेवावे. हे मिश्रण सॉट्रिफ्यूज मशिनमध्ये चांगले मिसळून त्यातील घन पदार्थ काढून घ्यावेत म्हणजे खाली शुध्द रस राहील.

 • १५ टक्के साखर आणि २ टक्के अॅसेटिक अॅसिड मिसळावे.
 • रस पाश्चराइज करण्याकरिता ३० मिनिटांपर्यंत ८० अंश सेल्सिअम तापमानाला तापवावा. रस थंड करून निर्जंतुक बाटलीत भरावा.

 
  केळीची बिस्कीटे :-
केळीच्या पिठात ३०-४० टक्के मैदा, १५ टक्के साखर, ५ टक्के वनस्पती तूप, ५ टक्के तूप, ५ टक्के दूध पावडर, १०० ग्रॅमसाठी २  टक्के, २ ग्रॅम बेकिंग पावडर, इसेंस गरजेप्रमाणे मिसळून योग्य प्रमाणात पाणी टाकून त्याचा लागदा तयार करावा.
 

 • तयार झालेला लगदा बिस्किटांच्या साच्यामध्ये टाकून ओव्हनमध्ये  १७० ते १९० अंश सेल्सिअस तापमानाला ३० मिनिटे ठेवावेत.
 • साच्यातील बिस्किटे काढून थंड करावेत आणि प्लॅस्टिक पिशवी किंवा काचेच्या बाटलीत साठवावेत.

                        व्हिनेगर   :- 

 • टाकाऊ पिकलेल्या केळीपासून व्हिनेगर तयार करता येते.
 • केळीच्या गरामध्ये १६ टक्के साखर व २ टक्के स्टार्च असते. गरामध्ये पाणी व १० टक्के साखर मिसळून लापशी तयार करावी. त्यात २ ग्रॅम सॅक्रोमायसीस सर्व्हेसिया यीस्ट मिसळावे. ४८ तासानंतर ३० अंश सेल्सिअम तापनाला ही लापशी मस्लीन कापडातून गाळून घ्यावी. त्यात २ टक्के अल्कहोलिस रस मिसळावा. दोन आठवडा ते मिश्रण तसेच ठेवावे. २ आठवड्यांत व्हिनेगर तयार होते.

February 17, 2017

0 responses on "केळीपासून टिकाऊ प्रक्रियायुक्त पदार्थ......!!!"

  Leave a Message

  Your email address will not be published.

  All Right Reserved.
  Call Now ButtonCall Now
  Translate »
  error: Content is protected !!