जांभूळ प्रक्रिया एक दुर्लक्षित पण पैसे कमवून देणारा बिझनेस

जांभूळ प्रक्रिया एक दुर्लक्षित पण पैसे कमवून देणारा बिझनेस
मागील काही दिवसांपूर्वी बरसलेल्या बिगर मोसमी पावसाने आंबा बागायतदार हवालदील झालेला असताना या बदललेल्या वातावरणाचा फटका जांभळानासुद्धा बसला आहे. सोसाटय़ाच्या वा-याने झाडावर पिकलेली जांभळे मातीमोल झाली आहेत.
जी काही थोडीफार जांभळे या संकटातून वाचली आहेत, त्यांचा दर गगनाला भिडला आहे. मे महिन्यात कुठल्याही गावाच्या बाजारात फेरफटका मारला असता दृष्टीस पडणारी भडक रंगाची जांभळे नजरेआड झाली आहेत. या पिकाकडे व्यापारी दृष्टीने पाहिले जात नसल्याने केवळ झाडांवरच लागलेली जांभळे मिळवण्याकडे शेतक-यांचा आणि व्यापारांचा कल राहिला आहे.
जांभूळ हे नाशवंत फळ असल्याने त्यापासून आरटीएस (सरबत),स्क्वॅश,सिरप,घट्ट रस (कॉन्सन्ट्रेट) तसेच जांभळाच्या लगद्यापासून टॉफी तसेच बियांपासून पावडर (भुकटी) इतकंच काय तर वाइन या सारखे विविध टिकावू पदार्थ प्रक्रिया करून बनवता येणे शक्य आहे.
चावडी चे Affiliate बना,सोशल मिडिया वर मेसेज शेयर करा,अधिकचे उत्पन्न कमवा.अधिक माहितीसाठी या लिंक वर क्लिक करा.
जांभळाचा रस काढण्यासाठी पूर्ण पिकलेल्या फळांचा वापर करावा. सर्वसाधारणपणे प्रती किलो रसास ७१० मिलीग्रॅम सोडियम बेंझोएट या रासायनिक परीरक्षकाचा वापर करून रस टिकवता येतो. जांभळाचे सरबत तयार करताना दहा टक्के रस घ्यावा. रसातील साखरेचे प्रमाण गृहीत धरून साखर टाकावी व सायट्रीक आम्लाच्या मदतीने त्याची आम्लता ०.२५ टक्के करावी.
सुरवातीला २-३ लाख रुपये गुंतवणूक करून हा व्यवसाय सुरु करता येईल .साधारण २-३ गुंठे जागा पुरेशी राहील…
प्रयत्न केल्यास पत पाहून बँक कर्ज पुरवठा देखील होणे शक्य आहे. आणि उपलब्ध असल्यास शासकीय अनुदान सुद्धा मिळू शकते..
या विषयाचे मार्गदर्शन चावडी मध्ये उपलब्ध आहे.अधिक माहितीसाठी 7249856425 या क्रमांकवर करावा.
धन्यवाद.
 

May 15, 2017

2 responses on "जांभूळ प्रक्रिया एक दुर्लक्षित पण पैसे कमवून देणारा बिझनेस"

  1. मिलिंद देऊस्करMay 17, 2017 at 3:55 pmReply

    मला कोरफड गर टिकवायचा आहे कशा पध्दती ने टिकवावा.कोणी सांगेल का?

  2. संतोष आगवणेJuly 31, 2017 at 2:41 pmReply

    मला डाळींबाचा नेचरल ज्युस तयार करावयाचा आहे व्यावसाइक स्वरुपात माहीत मिळावी.

Leave a Message

Your email address will not be published.

All Right Reserved.
Call Now ButtonCall Now
Translate »