पॅकेजिंगचे महत्व……!-

पॅकेजिंगचे महत्व……!-
मार्केटिंग आणि जाहिरातीच्या युगात पॅकिंगला मोठे महत्व आहे. पॅकिंगपासून शेतमालाला संरक्षण तर मिळतेच, शिवाय किफायतशीर भाव सुध्दा चांगला मिळतो. पॅकिंगचा प्रकार व प्रत वाहतुकीचा प्रकार, अंतर, फळाची किंमत आणि बाजाराची गरज यावर अवलंबून असते. प्रत्येक प्रकारच्या फळाला वेगवेगळे पॅकिंग असल्याने त्यानुसार विचार करणे गरजचे आहे. बाजारातील पॅकिंग केलेली कुठलीही वस्तू ही सुरक्षित असते. यावर लोकांचा विश्वास आहे आणि काही प्रमाणात लोक ती खरेदी सुध्दा करतात. आता  लोकांचा आकर्षक पॅकिंग केलेल्या वस्तूकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत आहे.  आधुनिक काळात ‘पॅकेजिंग ही बाब ’  न टाळता येण्याइतकी महत्वाची बनली आहे. वस्तूवर कोणते वेष्टण असावे, ते कशा प्रकारचे असावे याचे शास्त्र  विकसित झाले आहे. शेतमालाचा दर्जा जास्तीत जास्त वेळ टिकवून ठेवणारे, सरक्षित पण हल्क्या वजानाचे पॅकेजिंग कमीत कमी खर्चात देणे, हे मोठे कठीण काम झाले आहे. एवढेच नव्हे तर तो शेतमाला बाजारात उठून दिसवा यासाठी आकर्षक, कलात्मक जोडसुध्दा द्यावी पॅकिंजिंगला द्यावी लागते. एकोणिसाव्या शतकात युरोपात झालेल्या औद्योगिक क्रांतीनंतर पॅकेजिंगला खऱ्या अर्थांने महत्व प्राप्त झाले आहे.
पॅकेजिंगचे प्रकार :-
कृषीमालावर प्रक्रिया करून तो ग्राहकांपर्यंत सुस्थितीत पोचवण्याकरिता पॅकेजिंगला महत्व प्राप्त झालेले आहे. पॅकेजिंगचे खालील तीन प्रकारात वर्गीकरण करण्यात येते.

 • अक्रियाशील पॅकेजिंग
 • क्रियाशिल पॅकेजिंग
 • बुध्दिमान पॅकेजिंग

                                   १. अक्रियाशिल (पॅकेजिंग पॅसिव्ह पॅकेजिंग)  :-
या पॅकेजिंगमुळे हवा आणि बाष्प यासारख्या गोष्टी पासून संरक्षण मिळते. हे पारंपारिक पॅकेजिंग असून यातील आच्छादक द्रव्यामध्ये अंगभूत रोधक, संरक्षक आणि हाताळण्यातील सुलाता असे गुणधर्म असतात. या प्रकारच्या पॅकेजिंगचे सर्वात साधे उदाहरण म्हणजे प्लॅस्टिकची पिशवी. या प्रकारच्या पॅकेजिंगची प्रत्येकाला चांगली ओळख आहे.
        २. क्रियाशील  ( पॅकेजिंग ऑक्टिव्ह पॅकेजिंग) :-
क्रियाशील पॅकेजिंग सक्रियपणे हवा बंद स्थितीत बदल घडवून आयुष्य वाढते किंवा सुरक्षा आणि संवेदन गुणधर्म सुधारते. आणि त्याच वेळी अन्नाची गुणवत्ताही कायम राखली जाते.
३.  बुध्दिमान  (पॅकेजिंग इंटेलिजंट पॅकेजिंग) :-
या प्रकारमध्ये अन्नाच्या गुणवत्तेवर देखरेख ठेवली जाते आणि वाहणातून,  तसेच साठवण्याच्या वेळी पॅकिंग केलेल्या अन्नच्या दर्जाविषयी माहिती दिली जाते. कार्याच्या पध्दतीनुसार ऑक्टिव्ह आणि इंटेलिजंट पॅकेजिंगचे तीन गट केले जातात.
१.  शोषक (स्कॅव्हेजर्स किंवा ऑब्सॉबर्स – ऑक्टिव्ह पॅकेजिंग)
                                  २.  उत्सर्जक (ऑक्टिव्ह पॅकेजिंग)
                                  ३.  निदर्शक (इंटोलिजंट पॅकेजिंग)
                        शोषक  :-
या गटातील ऑक्टिव्ह पॅकेजिंग मध्ये असलेली घटक द्रव्य अन्नाच्या आतल्या भागातील ऑक्सिजन, एशिलीन, बाष्प वगैरे पदार्थ शोषून घेऊन दूर करतात. त्याचा हेतू अन्नावर परिणाम करण्याचा नसून वापरापूर्वी अन्नाचे आयुष्य वाढवण्याचा  असतो. ऑक्सिजन निवारकाचा वापर अविशिष्ट ऑक्सिजन दूर करण्यासाठी आणि एरोबिक फ्लोरा किंवा बुरशीची वाढ होऊन नये म्हणून केला जातो. एथिलीन निवारकाचा वापर एथिलीन दूर करण्यासाठी व  त्या योग्या फळे पिकणे लांबणीवर टाकण्यासाठी होतो.
   उत्सर्जक  :- 
ऑक्टिव्ह पॅकेजिंगच्या या गटामध्ये असे पदार्थ निर्माण केले जातात, की जे अन्नाच्या पॅकेजमध्ये मधल्या जागेमध्ये  किंवा अन्नपदार्थ मध्ये शिरून तेथील वातावरणावर तांत्रिक परिणम घडवतात. अशा बाबतीत ग्राहक अन्नाबरोबरच या घटकापदार्थांचेही सेवन करतात.
निर्देशक   :-
थेट अन्नत्पादन व  गुणवत्तेविषयी किंवा पॅकेजवरील अथवा मधल्या जागेतील वायुविषयी किंवा पॅकेच्या साठवण स्थिती विषयी पॅकेजिंगवरील अथवा पॅकेजिंगमधील निदर्शक माहिती देतात. या निदर्शकांना ‘इंटोलिजंट  पॅकेजिंग’ असे म्हटले जाते.
                 पॅकिंगसाठी हवे दर्जेदार मटेरियल :-
पॅकिंगसाठी वापरावयाच्या खोक्याची भौतिक प्रत उच्च दर्जाची आवश्यक आहे. जेथे हवेतील आर्द्रता जास्त आहे, अशा परिस्थितीत देखील तो दबाव, धक्का, अयोग्य हाताळणी व कंपने यापासून टिकाव धरू शकला पाहिजे. त्याचा आकार फळाच्या प्रकारावर ,बाजाराच्या गरजेला आणि वाहतुकीच्या प्रकारला अनरूप पाहिजे. संपूर्ण जगात अनेक प्रकारची पॅकेजिंग मेटरिअल फळांच्या पॅकजिंगसाठी वापरतात.जसे लाकूड बांबू, रिजी- फोम प्लॅस्टिक, सॉलिड कार्ड बोर्ड व कोरोगेटेड फायबर बोर्ड बॉक्सेस, पॅकिंगचा प्रकार व पत ही वाहतुकीचा प्रकार, अंतर फळाची किंमत आणि बाजाराची गरज यावर अवलंबून असते.
प्रत्येक प्रकारच्या फळाला वेगवेगळे पॅकिंग असल्याने त्याचाही विचार करणे गरजेचे आहे. कोरोगेटेड फायबर बोर्ड हे जगात सर्वत्र वापरले जाणारे मटेरिअल आहे. ते वजनाने हलके, आवश्यक तेवढे मजबूत वेगवेगळ्या आकारांत बनवायला सोपे, साठवणुकीला वापरायला सोपे आहे. कारोगेटेड बॉक्सवर प्रिंटिंग चांगल्या प्रकारे करता येते. आकर्षक मांडणी करिता त्याचा उपयोग होतो. आज जगभर फळांच्या पॅकिंगसाठी कारोगेटेउ बॉक्स वापरतात.
पारदर्शक बॉक्स पॅकिंगची गरज
पूर्वी पॅकिंग होत नसल्यामुळे फळे एकमेकांला घसली जात, त्यामुळी ती काळी पडते त्यांना कमी भाव मिळत असतो. तसेच अधर्वट पिकलेले फळ जर त्यात असल तर त्यामुळे इतर फळे खराब होत. परंतु आता कॅरेटमध्ये फळे लांबवर पाठविता येतात. फळांची नासाडी होत नाही. उत्तम पॅकेजिंग करून खाद्यापदार्थ आहे. त्या परिस्थितीत जास्तीत जास्त दिवस टिकवत येतो. त्यामुळे पॅकेजिंगला फार महत्व आहे.
                पॅकेजिंग कसे असावे ?

 • पॅकेजिंगचा आकार आकर्षक व हाताळण्यास सोपा व पुर्नवापर योग्य असावा.
 • त्यावर पदार्थासंबंधी संपर्ण माहिती छापलेली असावी.
 • पदार्थाला पॅकिंग केलेले वेष्टण इतके मोठे हवे, की पदार्थ किंवा वस्तू त्यात पूर्णपणे सामावली गेली पाहिजे. हाताळण्यास वाहतुकीस सापे व न गळणारे असावे.
 • उष्णता, प्रकाश आर्द्रता, ऑक्सिजन यांमुळे पदार्थांमध्ये रासायनिक प्रक्रिया होऊन पदार्थांत त्याचा अंश उतरणार नाही व पदार्थांला त्याचा वाय येणार नाही याचीं काळाजी घ्यावी

          
पॅकिंग न केल्याणने होणारी हानी
साठवणूक व वाहतुकीमध्ये बऱ्याच वेळा पॅकच्या (बॉक्सच्या) क्षमतेपेक्षा जास्त फळे  भरणे किंवा एकमेकांवर उंच असे पॅकेजेचे थर लावल्याने फळ ठेचकाळणे किंवा फुटणे असा प्रकार घडतो एकाच खोक्यात अधिक फळे भरल्याने ती एकमेकांना घसून खराब होतात. एकाच पॅकमध्ये उंच फळे रचल्याने अथवा त्यावरील रचलेल्या पॅकेजेस चा  वजनाच्या दाबाने हे घडते. सर्व साधारणत सारख्याच आकाराची फळे निवडून घेतल्याने भार सर्व फळांवर सारख्याच प्रमाणात आल्याने हानी कमी होऊ शकते.  अशा पॅकेजेसचे उंच थर लावल्याने तळातील खोक्यांवर अधिक दाब आल्याने तो भार सहन करू शकत नाहीत आणि तो सर्व रत आतील फळांवर आल्याने अतिभाराने अशी सर्व फळे खराब होण्याची शक्याता असते. उंच थप्पतीतून खोके पडल्याने, रचणाऱ्याच्या हातातून निसटल्याने किंवा फेकल्याने किंवा असा फेकलेला खोका दुसऱ्या खोक्याला लागाल्याने सर्वच फळे खराब होतात.
फळांवर किंवा बॉक्सवर फळ घासल्याने तपकिरी रंगाचे डाग दिसून येतात. यामुळ फळावंर आणि  फळाभोवती संरक्षक आवरण घालणे आवश्यक आहे. फळांचे थरावर थर रचले जातात. वाहतुकीतील हेलकाव्यामुळे फळे एकमेकांजवळ येतात. त्यांनी खोक्यात बाजूला पोकळी निर्माण हसेते. पोकळीमुळे पुन्हा वरील बाजूस बॉक्स वाकणे, थर कोसळणे वगैरे अनेक धोके संभवतात. म्हणून खोवयांचे कमीत-कमी थर रचावेत.
अधिक माहितीसाठी  :- 7249856424

January 11, 2017

0 responses on "पॅकेजिंगचे महत्व......!-"

  Leave a Message

  Your email address will not be published.

  All Right Reserved.
  Call Now ButtonCall Now
  Translate »
  error: Content is protected !!