वडील म्हणायचे- कुली हो, त्याने उभी केली 200 कोटींची कंपनी

वडील म्हणायचे- कुली हो, त्याने उभी केली 200 कोटींची कंपनी

नवी दिल्ली-

या तरुणाने गरीबीवर मात करुन दाखवली. त्याने स्वतःला सिद्ध करुन दाखवले. त्याचे वडील कुलीचे काम करायचे. आपला मुलगा कुलीच व्हावा असे त्यांना वाटायचे. पण मुलाच्या डोळ्यांत अनेक स्वप्न होते. त्याला मोठे व्हायचे होते. त्याने गरीबीवर मात करुन भविष्य घडवले. आज त्याच्यासोबत संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य बदलून गेले आहे.
आम्ही आज तुम्हाला माहिती देणार आहोत आयडी फ्रेश फुड्स प्रायव्हेट लिमिटेडचे मालक पी. सी. मुस्तफा यांची. केवळ 8 वर्षांमध्ये या कंपनीची वार्षिक उलाढाल 200 कोटी रुपये झाली आहे. आता तो दुबई, मुंबई आणि बंगळुरु येथे अत्याधुनिक प्लांट लावतोय. त्यातून त्याची उलाढाल 600 कोटी होण्याची शक्यता आहे. ही कंपनी रेडी टू कुक आणि रेडी टू युज मील सेल करते.

वडील म्हणायचे, कुली हो

पी. सी. मुस्तफा याचा जन्म केरळच्या वयनाड गावचा. त्याचे वडीलांचे नाव अहमद आहे. कॉफीच्या बगीच्यात ते कुली म्हणून काम करायचे. मुस्तफा सहाव्या वर्गात फेल झाला होता. त्यानंतर तो जवळपास कुणी होणार हे सिद्ध झाले होते.

कुली व्हायचे नव्हते

मुस्तफा अभ्यासात हुशार नव्हता. पण त्याला गणितात विशेष रस होता. त्याला कोणत्याही परिस्थितीत कुली व्हायचे नव्हते. त्याने शिक्षणाचे महत्त्व ओळखले. तो १२ वी पर्यंत मेहनतीने शिकला. त्यानंतर इंजिनिअरिंगची सीईटी दिली. एका कॉलेजमध्ये अॅडमिशन घेतले.

विदेशातून भारतात परतला

इंजिनिअरिंग केल्यावर पहिली नोकरी बंगळुरुला लागली. दुसरी नोकरी त्याने दुबईला केली. त्याने सिटी बॅंक जॉईन केली. पण त्याला स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा होता. त्यामुळे तो नोकरी सोडून भारतात परतला.

मिळाली खास आय़डीया

दुबईतून आल्यावर मुस्तफाने एमबीए केले. एकदा तो एका दुकानात गेला. तेव्हा त्याला दिसले की काही महिला इडलीचे बॅटर तयार करण्यासाठी धान्य विकत घेत होत्या. येथूनच त्याच्या डोक्यात पॅक फुडची कल्पना आली.

असे बदलले नशिब

मुस्तफाने २००५ मध्ये केमिकल नसलेले बॅटर तयार करुन विकण्यास सुरवात केली. यात त्याने नोकरीतून मिळालेले २५ हजार रुपये गुंतवले. यासाठी त्याने काही सॅम्पल तयार करुन काही दुकानांमध्ये वितरित केले. त्याला यश मिळत गेले. २००८ मध्ये त्याने भाड्यात घरात बेस्ट फुड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची सुरवात केली. नंतर कंपनीचे नाव बदलून आयडी स्पेशल फुड्स प्रायव्हेट लिमिटेड असे ठेवले.
idli making |chawadi

२०० कोटींची कंपनी

२०१४ पर्यंत त्याच्या कंपनीत ६०० लोक नोकरी करायचे. कंपनीची ग्रोथ बघून हेलियन वेंचर पार्टनर्सने त्यात ३५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली. त्यानंतर कंपनीचे मुल्य ६२ कोटी झाले. आता त्याच्या कंपनीत ११०० लोक काम करतात.

१६ शहरांमध्ये व्याप

म्हैसूर, मंगळुरु, चेन्नई, मुंबई, हैदराबाद आणि पुणे येथे त्याचे ऑफिसेस आहेत. ऑक्टोबर २०१७ च्या मिडिया रिपोर्टनुसार त्याची उलाढाला आता २०० कोटी रुपयांवर गेली आहे.

पुढील टार्गेट १००० कोटी

त्याचे आता पुढील टार्गेट १००० कोटी रुपये आहे. त्याला आता ३० शहरांमध्ये हा व्यवसाय पसरवायचा आहे. त्याच्या कंपनीच्या ग्रोथने प्रभावित होऊन तीन विदेशी गुंतवणुकदार त्याच्या कंपनीत गुंतवणूक करण्यास उत्सूक आहेत. आता त्याची उलाढाल ६०० कोटी रुपये होण्याची शक्यता आहे.
ref: Divyamarathi
November 15, 2017

0 responses on "वडील म्हणायचे- कुली हो, त्याने उभी केली 200 कोटींची कंपनी"

  Leave a Message

  Your email address will not be published.

  All Right Reserved.
  Call Now ButtonCall Now
  Translate »
  error: Content is protected !!