असे काय केले या शेतकर्यांनी की उन्हाळ्यात सुद्धा महिना १०-१५ हजार कमवीत आहेत.?

असे काय केले या शेतकर्यांनी की उन्हाळ्यात सुद्धा महिना १०-१५ हजार कमवीत आहेत.?
स्पिरुलीना उद्योग 
अहमदनगर चे श्री  प्रकाश घनवट टाकळी चे  श्री खिलारी ,सांगली चा युवा उद्योजक सिद्धनाथ यासारखे अनेक शेतकरी    यांनी पारंपारिक शेती ला कंटाळून काही तरी नवे करावे या अनुषंगाने नवीन उद्योग “स्पिरुलीना उत्पादन प्रकल्प”सुरु केला.
स्पिरुलीना हे एक प्रकारचे हिरवे निळे शेवाळ असून याचा सर्वात जास्त वापर पूरक अन्न म्हणून केला जातो . वेळोवेळी सुधारणा करून आपले स्वताचे मार्केट शोधले. आणि या शेवाळापासून पावडर , गोळ्या असे विविध प्रोडक्ट्स तयार केले .आज तब्बल ६ हजार रुपये किलो दराने हे प्रोडक्ट्स मार्केट मध्ये विकले जातात तर याचा उत्पादन खर्च साधारण १ – १.५ हजार प्रती किलो येतो.सर्व खर्च वजा जाता महिना कमीत कमी १५-२० हजार रुपये निव्वळ नफा मिळतो.
हा प्रकल्प उभारणी ला सुद्धा फार कमी खर्च येतो आणि विशेष म्हणजे पाणी एकदाच लागते रोज पाणी सुद्धा लागत नाही.
आज त्यांच्या युनिट मध्ये दर महिन्याला साधारण १-४० किलो उत्पादन तयार होते.तयार झालेल्या उत्पादनची हातोहात विक्री होत असल्याने त्यांना चांगला नफा मिळतो. मधल्या काळात त्यांना कृषी विभागाच्या योजनेतून अनुदान सुद्धा मिळाले.
चावडी चे Affiliate बना,सोशल मिडिया वर मेसेज शेयर करा,अधिकचे उत्पन्न कमवा.अधिक माहितीसाठी या लिंक वर क्लिक करा.
फक्त महाराष्ट्रात अनेक शेतकरी हा उद्योग आता यशस्वीरित्या करीत आहेत…शेतकरी मित्रांनी नवीन तंत्र आत्मसात करून स्पिरुलीना सारखे प्रकल्प सुरु केल्यास नक्कीच आर्थीक फायदा मोठ्या प्रमाणात होवू शकेल असे ते सांगतात.
आज उन्हाळ्यात पाणी हि मोठी अडचण आहे त्यामुळे कमी भांडवलात हा व्यवसाय सुरु करता येईल.आणि गरजेनुसार त्यात हळूहळू वाढ करता येईल .अजून एक विशेष कि या प्रकल्पाला मनुष्य बळ मोठ्या प्रमाणात लागत नाही .त्यामुळे घरातील प्रशिक्षित व्यक्ती अगदी सहजरित्या पूर्ण युनिट चालवू शकते. याचे संपूर्ण माहिती घेवून आणि थोडा अभ्यास करून जर महाराष्ट्र मध्ये दुष्काळी भागात हा व्यवसाय सुरु केल्यास नक्कीच शेतकरी आत्महत्या सारख्या विचारपासून परावृत्त होण्यास मदत होईल. पुणे येथे याविषयी माहिती देणारा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला असून त्यासाठी 7249856425 या क्रमांकावर संपर्क साधावा…
 

May 5, 2017

2 responses on "असे काय केले या शेतकर्यांनी की उन्हाळ्यात सुद्धा महिना १०-१५ हजार कमवीत आहेत.?"

  1. anil vikram SawantMay 6, 2017 at 12:45 pmReply

    Super shali palan karayche ahe

  2. Chanfrakant Shivamurtiya Kslameshvrmath.May 7, 2017 at 3:29 pmReply

    I AM WORKING ON MISSION ” SAVE THE MOTHER EARTH WITH FARMER “THROUGH ORGANIC FERTILIZER WHY TO USE AND HOW TO USE TO GET MORE QUALITY AND QUANTITY CROPS IN MINIMUM COST, CAN YOU JOIN WITH ME.?

Leave a Message

Your email address will not be published.

All Right Reserved.
Call Now ButtonCall Now
Translate »
error: Content is protected !!