शेडनेटगृह उभारताना घ्या काळजी……!!!

शेडनेटगृह उभारताना घ्या काळजी……!!!
भारतातील तसेच राज्यातील हवामानाचा विचार करता येथील समशीतोष्ण हवामानाचा विचार करता येथील समशीतोष्ण हवामान हरितगृहातील फुलशेतीस तसेच भाजीपाला व इतर फाळपिकांच्या उत्पादनास अतिशय उपयुक्त आहे. तसेच  या हवामानात हरितगृहा उभारणीसाठी येणारा खर्च देखील उपयुक्त आहे. तसेच या हवामानात हरितगृह उभारण्यासाठी येणारा खर्च देखील युरोपीय देशामध्ये येणाऱ्या खर्चाच्या तुलनेत फारच कमी आहे. युरोपीयन देशामध्ये हिवाळ्यात अतिशय कमी तापमानामुळे पिके चांगली येत नाहीत व जर फुले किंवा भाजीपाला पिके घेण्याच्या प्रयत्न केला तर उत्पादन खर्च भरमसाठ येतो. व हीच आपल्या देशाच्या दृष्टीने जमेची बाजू आहे. याउलट आपल्याकडील हवामानात विशेषत: हरितगृहाचे सर्व प्रकारच्या फळे, फुले भाजीपाल्याचे उत्पादन उत्कृष्ट होऊ शकते व त्यांना परदेशी बाजारपेठेत चांगली मागणी आहे. त्यादृष्टीने हरितगृहातील फुले, फळे व भाजीपाल्याना उत्पादनासा बाजारामध्ये भरपूर संधी आहे.
चावडी चे Affiliate बना,सोशल मिडिया वर मेसेज शेयर करा,अधिकचे उत्पन्न कमवा.अधिक माहितीसाठी या लिंक वर क्लिक करा.

शेडनेटमध्ये पिकांसाठी प्रकाशाची तीव्रता उष्णता प्रभावीपणे कमी करून पिकांच्या वाढीसाठी बऱ्याच अंशी पोषक वातावरण तयार केले जाते. शेडनेटगृह उभारताना खालील बाबींकडे काळजीपूर्वक लक्ष देणे आवश्यक आहे.
उन्हाची तीव्रता अधिक असताना पिकांना उत्तग धरणे कठीण होते. शिवाय उन्हाळ्यात पाण्याची उपलब्धताही कमी असते. कमी पाण्यात  व अती तापमानात पिकांच्या वाढीवर अनिष्ठ परिणाम होतो. उत्पादनात लक्षणीय घट होत. उत्पादनात लक्षणीय घट होते. अशा स्थितीत पिकांना शेडनेटच्या साहाय्याने सावली केली तर वातावरणातील तापमान तर कमी होतेच, शिवाय पिकांची पाण्याची गरजसुध्दा कमी होते. विविध पिकांसाठी गरजसुध्दा कमी होते. विविध पिकांसाठी शेडनेटगृहाचे क्षेत्र पाच गुंठ्यांपासून एक एकरपर्यंत असू शकते.
 

 • हरितगृहाप्रमाणे शेडनेटगृहामध्ये वातावरणातील तापमान, आद्रता, कर्बवायू, वारा, घटकांवर बऱ्याच प्रमाणात नियंत्रण ठेवता येते. शेडनेटगृहातील पीक लागवड ही पारंपरिक शेतातील पीक लागवडीपेक्षा आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत आहे.
 • शेडनेटगृह हे सांगाड्यावर म्हणजे फ्रेम असलेले घर असून, तेआय पाइप, लोखंडी अँगल्स, लाकूड किंवा बांबू यांपासून बनविलेले असते. ते निरनिराळ्या सावलीच्या गुणांकांच्या प्लॅस्टिकच्या जाळीने (शेडनेटस) झाकलेले असते. या जाळ्या विशिष्ट यूव्ही संस्कारित अशा १०० टक्के पॉलिईथिलिन धाग्यापासून तयार केलेल्या असतात. या शेडनेटया साहाय्याने दिवसा पिकांसाठी प्रकाशाची तीव्रता व प्रभावी उष्णता कमी करता येते.

 
शेडनेटगृहाचे छताच्या आकारानुसार प्रकार :-
अ). सपाट छताचे शेडनेटगृह (प्लॅट रूफ)  –
१ . कमी उंचीचे (३.२५ मी.) २. जास्त उंचीचे (४ मी.)
 

 
शेडनेटगृहासाठी जागेची निवड :- 
जागेची निवड करताना खालील बाबीकंड लक्षे द्यावे.

 • जमीन ही पाण्याचा निचरा होणारी असावी. निचरा होणारी जमीन नसेल तर शेडनेटगृहाभोवती चर अथवा दांड काढावा की त्यातून पाण्याचा निचरा होईल. शेडनेटगृहामध्ये जमिनीतील पाण्याची पातळी पिकांच्या मुळांच्या खाली राहील.
 • पाणथह जागा शेडनेटगृहासाठी निवडू नये. तसेच शेडनेटगृहांची जागा खोलगट ठिकाणी नसावी.
 • शेतात उंचसखल जमीन असल्यास किंवा जास्त उतार असल्यास जागेचे सपाटीकरण करून घ्यावे.
 • पाण्याचा सामू ५.५ ते ६:५ दरम्यान व क्षारतेचे प्रमाण कमी असावे.
 • पाणीपुरवठ्यांची सुविधा जवळपास असावी. तसेच विद्युतपुरवठ्याची सुविधा असावी.
 • इमाराती, मोठे वृक्ष, इ.ची सावली शेडनेटगृहावर पडणार नाही, अशी जागा निवडावी.
 • निवडलेल्या जागेत भरपूर सूर्यप्रकारश मिळणे आवश्यक असते.


शेडनेटगृहाची दिशा :-
शेडनेटगृह उभारताना गोलाकार छत असलेल्या शेडनेटगृहाची दिशा दक्षिणोत्तर (दक्षिण-उत्तर) अशी ठेवावी. मात्र सपाट शेडनेटगृहासाठी कुठलीही दिशा ठेवती तरी चालते.
 
शेडनेटगृहाची उभारणी :-
शेडनेटगृह उभारताना खालील बाबी तांत्रिकदृष्ट्या योग्य असणे आवश्यक असते.
 

 • शेडनेटगृहाचे फाउंडेशन (पाया)
 • शेटनेटगृहाची फ्रेम (सांगाडा)
 • सांगाडा जोडण्यासाठी नटबोल्ट व क्लॅम्प
 • शेडनेट (जाळी)
 • शेडनेट बसविणे
 • शेटनेटगृहात जामिनीलगत यूव्ही फिल्म लावणे.(स्कर्टिंग)


 

February 21, 2017

0 responses on "शेडनेटगृह उभारताना घ्या काळजी......!!!"

  Leave a Message

  Your email address will not be published.

  All Right Reserved.
  Call Now ButtonCall Now
  Translate »
  error: Content is protected !!