असा करा यशस्वी लघुउदयोग…लोणचे प्रक्रिया

     असा करा यशस्वी लघुउदयोग…लोणचे प्रक्रिया

व्यवसाय कोणता करावा, असा प्रश्‍न बर्‍याचदा विचारला जातो. परंतु आपल्या आसपास अनेक व्यवसाय असतात. आपल्या परिसरावर नजर फिरवली तर आपल्याला जी जी गोष्ट दिसते ती प्रत्येक गोष्ट एक व्यवसायच असते. पण आपण त्याकडे व्यवसाय म्हणून बघत नाही. ज्याची वृत्ती, प्रवृत्ती उद्योजकतेची असते त्याला मात्र प्रत्येक ठिकाणी व्यवसायच दिसतात आणि तो त्यातला कोणताही व्यवसाय करण्यास धजावतो.  त्यामधील एक उदयोग म्हणजे लोणचे उदयोग होय. हा असा उदयोग आहे की यासाठी कमी गुंतवणूक लागते.

 

    लोणचे उदयोग म्हणजे काय ???

     आहार हा आपल्या दैनंदिन जीवनातील सर्वधिक महत्वाच्या घटकांपैकी एक आहे. आहार आरोग्यदायक असावाच, पण त्याच बरोबर ते चवदार व स्वादिष्ट असावा, असे प्रत्येकालाच वाटते. आहार चवदार व स्वादिष्ट होण्यासाठी लोणच्याला पर्याय नाही. लोणची तयार करून विक्री  करणे. हा व्यवसाय एक सिजनेबल फायदेशीर व्यवसाय आहे. मार्च ते मे कैऱ्यांचा सिजन असतो. जनरली लोणचे आंबा, लिंबू, मिरची, आवळा या प्रकारच्या लोणच्याला खूप मागणी आहे.

     लोणचे हा एक स्वादिष्ट, गोड तसेच सहजासहजी बाजारपेठे मिळण्यासारख्या खाद्यापदार्थ आहे. या उत्पादनाचा काही काळात वेगाने विस्तार होणार आहे. महिलांना व महिलांच्या बचत गटांना अतिशय कमी भांडवलात करता येण्यासारखा उदयोग आहे. अनेक तरूण उदयोजकाना या व्यवसायिक संधीचा लाभ घेता येईल.

चावडी चे Affiliate बना,सोशल मिडिया वर मेसेज शेयर करा,अधिकचे उत्पन्न कमवा.अधिक माहितीसाठी या लिंक वर क्लिक करा.

लोणच्याचे प्रकार

       मिरचीचे लोणचे, कैरीचे लोणचे, लिंबू लोणचे, लिंबू-मिरचीचे लोणचे, आवळा लोनचे, करंवदे लोणचे, फणस लोणचे, हळदी लोणचे, आल्याचे लोणचे आदी उपलब्ध आहे. यात प्रमुख्याने प्रविण, मेघंनद,कामधेनू, केप्र, तृप्ती, आदीची लोणची बाजारामध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.

 

बाजारपेठ 

या लोणची निर्मिती प्रकल्पातील उत्पादनांची स्थानिक बाजारपेठेतील होलसेलर, वितरक, किरकोळ दुकानदार, हॉटेल्स, खानावळी, ढाबे, लंच होम्स,  बिअर बार, परमिट रूम्स, स्नॅक्स सेंटरर्समध्ये मोठी मागणी असते.

         हा प्रकल्प मध्यम स्वरूपाचा असून, या प्रकल्पात विविध प्रकारचे लोणचे आपल्याला तयार करता येते. हा व्यवसाय कोणत्याही ठिकाणी आपल्याला करता येतो. यासाठी साधारण ५०० ते १००० चौ.फूट जागे मध्ये हा व्यवसाय करता येतो.

 

प्रकल्प विषयक –  

हा उदयोग सुरू करण्यासाठी सुरूवातील अंदाजे 1 ते 1,50,000 एवढे खर्च येते. या उदयोगासाठी जिल्हा उदयोग केंद्रा मार्फत यासाठी अनुदान व सबसिडी मिळते. हा उदयोग केल्यास आपण एक यशस्वी उदयोजक बनू शकता.

 

अधिक माहितीसाठी- 7249856424 या क्रमांकावर संपर्क साधावा..

December 3, 2016

0 responses on "असा करा यशस्वी लघुउदयोग...लोणचे प्रक्रिया"

    Leave a Message

    Your email address will not be published.

    All Right Reserved.
    Call Now ButtonCall Now
    Translate »