शेडनेटमधील बीजोत्पादनाने दिली आर्थिक बळकटी

लोणी (ता. रिसोड जि.वाशीम) येथील रामकृष्ण सानप यांनी काळानुरुप पीक पद्धतीत बदल केला. सन २०१० पर्यंत नेहमी अार्थिक चणचणीला सामोरे जाणारे हे कुटुंब आज लाखांचे व्यवहार सहज करू शकेल इतपत आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले आहे. शेडनेटमध्ये संकरीत भाजीपाला उत्पादनाच्या माध्यमातून सानप आता प्रगतशील व तज्ज्ञ शेतकरी झाले आहेत.वातावरणातील बदल, बेरभवशाचा मॉन्सून यामुळे पारंपरिक शेतीचे गणित दरवर्षी बिघडत चालले आहे. मात्र प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत, त्यावर विविध प्रयोगांवर मात करीत रामकृष्ण सानप यांनी नियंत्रित शेतीत पाऊल टाकले.

*शेतीत घडवलेल्या सुधारणा*

संकरीत भाजीपाला बिजोत्पादन हे अत्यंत क्लिष्ट, मजुरांची गरज असलेले व तांत्रिक दृष्ट्या कुशल काम आहे. परपरागीभवनाची क्रिया देखील यात महत्वाची असून त्यावरच बियाची प्रत व बियाणे पास-नापास या बाबी अवलंबून असतात. ही सर्व जोखीम पत्करून सानप अाज दीड ते पावणे दोन एकरांत संकरीत भाजीपाला बीजोत्पादन करतात.

*शेडनेटमधील शेती फायदेशीर*

सन २०१२ मध्ये सानप यांनी शेडनेटमध्ये कंपन्यांसाठी बीजोत्पादन सुरू केले. बियाणे, तांत्रिक माहिती, वेळोवेळी मार्गदर्शन कंपनीकडून दिले जाते.शेतकरी जे बीजोत्पादन करतो त्याचा दर कंपनीकडून आधीच निश्चित केलेला असतो. त्यामुळे दरांची चिंता राहात नाही.

*संपूर्ण कुटुंब राबते नियंत्रित शेतीत*

*स्वतः पारंगत झाले; कुशल कामगार घडविले*

” कृषी समृद्धी प्रकल्पाअंतर्गत व कृषी विज्ञान केंद्र, करडा यांच्या माध्यमातून संकरीत भाजीपाला बिजोत्पादन कार्यक्रमाचा जिल्हयात प्रसार करण्यात अाला. अाज शेतकरी संकरीत बिजोत्पादन कार्यक्रम यशस्वी राबवित अाहेत”

साभार : अॅग्रोवन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Customer Care