शेवाळ शेतीतून पर्यायी इंधानाकडे ….!!!!

शेवाळ शेतीतून पर्यायी इंधानाकडे ….!!!!

शेवाळांच्या शेतीतून जैवइंधनाच्या निर्मितीला चालना मिळू शकते. अशा व्यावसायिकदृष्ट्या महत्वाच्या ठरू शकणाऱ्या शेवाळांच्या प्रजातींवर अमेरिकेतील सॅडिया नॅशनल लॉबोरेटरी येथील संशोधक अभ्यास करत आहेत. त्यामुळे खनिज इंधनासाठी पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

शेवाळांपासून जैवइंधन निर्मितीचा खर्च कमी झाल्यास ती खनिज पेट्रोलियम पदार्थांना पर्याय ठरू शकतात. या उद्देशाने सँडिया नॅशनल लॅबोरेटरीमध्ये विविध कीडी व रोगांसाठी प्रतिकारक  असलेल्या प्रजातींच्या चाचण्या घेण्यात येत आहेत. त्यासाठी खास प्रकलपाची निर्मिती केली असून, सुमारे ६ दशलक्ष डॉलरचा निधी संशोधनासाठी दिला आहे.

चावडी चे Affiliate बना,सोशल मिडिया वर मेसेज शेयर करा,अधिकचे उत्पन्न कमवा.अधिक माहितीसाठी या लिंक वर क्लिक करा.

 समस्या व उपाययोजना :-

  • जैवइंधन पिकांसाठी जी जमिन वापरली जाते, त्यावरील भार कमी होईल. शेवाळांची शेतीही खराब जमिन नद्या किंवा समुद्रांमध्ये करता येईल.
  • सध्या उत्पादित होत असलेले नैसर्गिक शेवाळ उत्पादन हे दरवर्षी केवळ तलाव भरून वाहणे किंवा फुटण्यामुळे वाहून जाते.
  • शेवाळ हे पाण्यातील अनेक सूक्ष्मजीवांचे खाद्य आहे. त्यांच्यामुळेही शेवाळांचे मोठे (३०टक्कपर्यंत) नुकसान होते. अशा घटकांमुळे व्यावसायिक शेवाळ उत्पादकांनाही फटका बसतो. त्यामुळे अशा घटकांवर १००० लिटरच्या टाकीमध्ये खास प्रयोग करण्यात येत आहेत.
  • जीवशास्त्रज्ञ टोड लेन आणि त्यांचे सहकारी १५ प्रजातीच्या शेवाळावरील परजिवी बुरशी, जिवाणू आणि रोगांचा अभ्यासही करत आहेत. हे भक्ष्यक सूक्ष्मजीव प्रतिमिनिट दोनशे शेवाळ पेशी खाऊ शकतात. अगदी १,३२००० गॅलन क्षमतेच्या व्यावसायिक तळ्यातील आरोग्यपूर्ण शेवाळांचाही केवळ ४८ तासांमध्ये संपूर्ण नुकसान करू शकतात.
  • तलावातील अशा घटकांचा वेगाने शोध घेण्यासाठी विश्लेषण रसायनतज्ज्ञ जेरी टिमलीन यांनी स्पेक्ट्रो-रेडिओमेट्रिक तंत्राचा वापर केला आहे. यामध्ये तंत्रामध्ये सूक्ष्मजीवांवरून परावर्तित होणाऱ्या प्रकाशांच्या वारंवारीतेवरून शोध घेतला जातो.

                                                 चावडी :- 72 49 85 64 24

1 thought on “शेवाळ शेतीतून पर्यायी इंधानाकडे ….!!!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Customer Care