Soyabean Oil Processing Business

सध्या भारतात सुमारे ११८ लाख हेक्टर क्षेत्रावर या  सोयाबीन पिकाची लागवड केली जाते. एकूण तेलबियांच्या उत्पादना पैकी सोयाबीनचा वाटा ४२ टक्के आहे, तर खाद्यतेलाचा विंचार केला तर सोयाबीन तेलाचा वाटा २९ टक्के आहे. भारतात मुख्यत्वे मध्य प्रदेश, महाराष्ट्र सह विविध राज्यात या पिंकाची लागवड केली जाते. तसेच त्यापासून मोठ्या प्रमाणात तेलाची निर्मिती केली जाते.   आपल्या देशात सोयाबीनचा वापर मुख्यत्वेकरून मोठ्याप्रमाणात खाद्यतेल निर्मितीसाठी केला जातो. यातून उत्पादित होणाऱ्या सोयामील पैकी  ६५ ते ७०  टक्के सोयामील निर्यात केले जाते. सोयाबीनवर आधारित पदार्थ तयार करण्यासाठी आपल्याकडे प्रचंड वाव आहे.
सोयाबीनचा उपयोग प्रामुख्याने  खाद्य तेल निर्मितीसाठी केला जातो. सोयाबीन तेल आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरते. हा उदयोग आपण लघु किंवा मध्यम स्वरूपात उभारता येतो. सोयाबीन पासून तेल निर्मिती करताना १०० टक्के तेलाची निर्मिती होते. त्यात प्रमुख्याने २० टक्के तेल हे त्यावर विविध प्रक्रिया करताना. (उदा: रिफाईन करणे, स्वच्छ करणे, रंग काढणे) खराब होते. मात्र ८० टक्के तेल हे खाद्यासाठी वापरले जाते. सोयाबीन मधून तेल काढल्यानंतर जो चौथा दिसते, त्यापासून विविध आकाराच्या सोयाबीन वड्या तयार करता येतात. त्या वड्या  विविध खाद्या पदार्थांमध्ये वापरल्या जातात. सोयाबीन वड्यांना बाजारात चांगली मागणी आहे. तसेच सोयाबीन पासून तेलाची निर्मिती केल्यास आपल्याला चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो.
 

सोयाबीन तेलाचे फायदे :-

  • हृदयासाठी फायदेशीर :-

सोयाबीन तेलामध्ये फैटी एसिड्स चे चांगले प्रमाण दिसून येते. शरीरला लागणारे महत्वपूर्ण फैटी एसिड्स या तेला मधून मिळते. ओमेगा-.३  फैटी एसिड्स मुळे  शरीरामधील कॉलेस्ट्रेरॉलचे प्रमाण कमी करण्यासाठी सोयाबीन तेल शरीरासाठी उपयुक्त ठरते. नियमित सोयाबीन खाल्लाने सोयाबीन तेल ह्दय संबधीत उदा. हार्ट अटैक, स्ट्रोक, ह्दय विकार  हे आजार दूर ठेवण्यासाठी मदत करते.
 

  • अल्झाइमर रोगपासून मुक्ती :-

सोयाबीन तेलामध्ये विटामिन ‘ के ’ चे प्रमाण आढळून येते. अल्झाइमर सारखे आजार जर लांब ठेवायचे असेल तर सोयाबीन तेल उपयुक्त ठरते. विटामिन ‘ के ’ हे एखाद्या एंटीऑक्सीडंट सारखे काम करते. त्यामुळे सायोबीन तेल हे उपयुक्त ठरते.
 

  • शरीरातील हाडांचा विकास :-

सोयीबीन तेला मध्ये मिळणारे विटामिन ‘ के ’ हा महत्वाचा भाग असून तो शरीरामध्ये महत्वपूर्ण कार्य करतो.  शरीरातील हाडांचा पूर्ण विकास करण्यासाठी तो महत्वपूर्ण कार्य करतो. सोयाबीन तेला मध्ये महत्वपूर्ण कैल्शियम दिसून येते. काण शरीरामधील हाडांचा विकास हा एका सकारात्मक स्वरूपात होत असल्यामुळे सोयाबीन तेल खाण्यास फायदेशीर आहे.
 

  • डोळ्यांसाठी फायदेशीर :-

ओमेगा – ३  फैटी एसिड्स हे डोळ्यासाठी फायदेशीर आहे. एसिड्स एक एंटीऑक्सीडंट हे डोळ्यासाठी चांगले कार्य करते. त्यामुळे डोळ्यांचे स्वास्थ चांगले राहते. ओमेगा-.३ फैटी एसिड्स मुळे डोळ्यामधील मांसपेशिया चांगल्या राहतात. तसेच मोतीबिंद होण्याचे प्रमाण कमी होते.
 

  • त्वचेसाठी फायदेशीर :-

सोयाबीन तेल मध्ये विटामिन ‘ ई ’ हे अधिक प्रमाणात असते. सोयाबीन तेलामुळे त्ववाच्या ही सूर्याच्या तापमानामुळे त्वचेवर होणाऱ्या आग थांबविण्यासाठी हे तेल मदत करते. तसेच या तेला मुळे त्वचेच्या विकासाठी सोयाबीन तेल प्रयत्न करत असते.  तसेच शरीरातील रोगप्रतिकारशक्ती कमी करण्यासाठी मदत करते. मानवाला होणारे आजार  थांबविण्यासाठी हे तेल मदत करते.
 

  • डायबिटीस :–

हा आजार असलेल्या लोकांन सोयाबीन तेल हे फायदेशीर आहे. सोयाबीन तेल खाल्यामुळे डायबिटीज नियंत्रणात ठेवण्यास सोयाबीन तेल मदत करते.
 

बाजारपेठ :-

विविध बाजारपेठे मध्ये वेगवेगळ्या खाद्या तेलाला मागणी मोठी असते. मात्र बाजारात सर्वात जास्त मागणी सोयाबीन तेलाला असल्याचे दिसून येते. काही विक्रते ब्रॅडेड, वेगळे नामांकन करून तेलाची विक्री करत असतात. मात्र तेल नामांकि असल्यामुळे उत्पादनाची किंमत ग्राहकांकडून जास्त वसूली केली जाते. याचाच फायदा स्थानिक उद्योजकांना होतो. तेलाचा वापर हा प्रत्येकांच्या जीवनात मोठ्या प्रमाणत होतो. आपण तयार केलेल्या सोयाबीन तेलाचा बाजारामध्ये एक चांगला ब्रँन्ड तयार करता येते. सोयाबीन तेल आपल्याला ठोक विक्रेते, किरकोळ दुकानदार, खाद्यातेल पुरवठा करणारी दुकाने, हॉटेल, नामकीन पुरवठादार, केटरर्स, हॉटेल व्यवसायिक आदी सह विविध ठिकाणी सोयाबीन तेलाचा पुरवठा करू शकतो. तसेच विविध आकराच्या तेलाच्या बॉटल विविध दुकानात विक्रीसाठी ठेवू शकतो. म्हणून या उद्योगास सहज पणे बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते.
 

प्रकल्प  विषयक :–

हा प्रकल्प आपल्या किती क्षमतेनुसार सुरु करायाचा आहे. त्यावरून या प्रकल्पाची किंमत आपल्याला ठरवता येते.  तसेच त्यांच्या गुंतवणुकीचा अदांज  आपल्याला बांधता येतो.  हा प्रकल्प सुरु झाल्यावर खर्च कमी जास्त प्रमाणात होऊ शकतो. बँक आपली पत पाहून या उद्योगासाठी कर्ज पुरवठा करू शकते. तसेच आपल्याला विविध योजनेचा लाभ घेता येतो.
याच अनुषंगाने चावडी मध्ये याचे संपूर्ण माहिती देणारे प्रशिक्षण आयोजित केले असून त्यासाठी खालील दिसणाऱ्या Call Now या बटनवर क्लिक करा….
 

August 29, 2017

4 responses on "Soyabean Oil Processing Business"

  1. next prashikshankadhi ahe .

Leave a Message

Your email address will not be published.

All Right Reserved.
Call Now ButtonCall Now
Translate »