soyabin processing business

Soyabin Processing Business with Byproduct information आपण सोयाबीन पिकवतो; पण हे पीक किती गुणकारी आहे आणि त्यापासून किती प्रकारच्या पदार्थांची निर्मिती होते, याची आपणाला माहिती नाही… त्या पार्श्‍वभूमीवर, जगभरातील सोयाबीनवर आधारित प्रक्रिया उद्योग आणि भारतासाठी असलेल्या संधींबाबतची आपण आज माहिती घेणार आहोत…

सोयाबीन हे तेलबियावर्गीय धान्यपीक असून, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, आरोग्यास हितकारक असलेले फायटोकेमिकल्स यांचा प्रमुख स्रोत म्हणून त्याकडे पाहिले जाते. सोयाबीन हे पर्यावरणपूरक पीक असून, हवेतील नत्रयुक्त पदार्थ स्थिर करण्यास त्याची मदत होते, त्यामुळे जमिनीचे आरोग्य किंबहुना जमिनीची बहुतेक रासायनिक व जैविक सुपीकता राखण्यास मदत होते. जगामध्ये सोयाबीनला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होण्याची कारणे म्हणजे सोयाबीनमधील पोषक अन्नघटक, आरोग्यदायी व औषधी गुणधर्म आणि त्याचा औद्योगिक कारणांसाठी वाढता वापर.

आपल्या देशात सोयाबीनचा वापर मुख्यत्वेकरून खाद्यतेल निर्मितीसाठी केला जातो. यातून उत्पदित होणाऱ्या सोयामिलपैकी 65 ते 70 टक्के सोयामिल निर्यात केले जाते. आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या कंपन्यांनी दुग्धजन्य व मांसाहारी पदार्थांना पर्याय म्हणून सोयाआधारित 130 पदार्थ जगाच्या बाजारपेठेत आणलेले आहेत. सोयायुक्त व सोयाआधारित पदार्थांच्या माध्यमातून हजारो कोटींची बाजारपेठ वरील कंपन्यांनी काबीज केलेली आहे. सोयाआधारित पदार्थ तयार करण्यासाठी आपल्याकडे प्रचंड वाव आहे. प्रथिनयुक्त सोया प्रोटिन्स सोयामिलच्या दहापट जास्त किंमत देऊन आपण आयात करतो किंबहुना सोयामिलपासून सोया प्रोटिन्स करण्यास भरपूर वाव आहे.

अमेरिका, युरोप, चीन, रशिया व बाल्टीक देश इत्यादी ठिकाणी सोयायुक्त पदार्थांचा वापर आहारात मोठ्या प्रमाणात होत आहे. दूध व दुग्धजन्य पदार्थ, मांसाहारी पदार्थ यांस पर्याय म्हणून सोयायुक्त पदार्थांचा वापर केला जात आहे. दूध भुकटीचा वापर अनेक दुग्धजन्य पदार्थांत तसेच प्रथिनांचा स्रोत म्हणून केला जातो. अलीकडच्या काळात जगाच्या बाजारपेठेत दूध भुकटी महाग झाल्याने त्याची जागा सोया प्रोटिनने घेतलेली आहे.

सोया दूध व त्यावर आधारित विविध पदार्थ, पेय, सोया व फळे मिश्रणयुक्त पेये, सोया व तृणधान्ययुक्त पदार्थ, स्नॅक्‍स इ. पदार्थ सोयाबीनपासून तयार केले जातात. मे. सोली, ऍडम (यू.एस.ए.), कॅंपबेल, जनरल मिल्स, योप्लेट, डॅनोन, ट्रायबलाट – नॉयल (फ्रान्स), सोलबार (इस्राईल), हनान लोहे शाईनव (चीन), कारगिल इ. आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या कंपन्यांनी दुग्धजन्य व मांसाहारी पदार्थांना पर्याय म्हणून सोया आधारित 130 पदार्थ जगाच्या बाजारपेठेत आणलेले आहेत.सोयायुक्त पदार्थांच्या माध्यमातून हजारो कोटींची बाजारपेठ वरील कंपन्यांनी काबीज केलेली आहे.

देशातील व राज्यातील सोयाबीन व त्यावर आधारित अन्नपदार्थ यांची बाजारपेठ वृद्धिंगत करण्याबाबत :
विशिष्ट चव (बीनी फ्लेवर) व त्यावर आवश्‍यक अशी प्राथमिक प्रक्रिया केल्याशिवाय सोयाबीनचा इतर कडधान्य / डाळीप्रमाणे दररोजच्या जेवणात वापर होत नाही. सोयाबीनवर प्रक्रिया करून विविध अन्नपदार्थ दैनंदिन आहारात आणणे हाच यावरचा रामबाण उपाय वाटतो.
सोयातेलाशिवाय सोयामिलचा वापर विविध अन्नपदार्थ तयार करण्यासाठी कसा करता येईल, तसेच सोयाबीन, तृणधान्ये व कडधान्ये यांचे योग्य प्रमाण वापरून परंपरागत पदार्थांबरोबरच एक्‍स्ट्रुडर कुकिंग तंत्रज्ञानाच्या माध्यमातून स्नॅक फूडचे अनेक अन्नप्रक्रिया लघु उद्योग उभारता येणे शक्‍य आहे. सोया दूध आधारित विविध उद्योग लोकप्रिय करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्‍यक आहे.

सोया आधारित अन्नपदार्थ आपल्या राज्यात लोकप्रिय करण्यासाठी विविध स्तरांवर पुढील धोरणे आखणे आवश्‍यक वाटते :
– सोयाबीन हे आरोग्यदायी, औषधी व गाईच्या दुधासारखे पूर्णान्न आहे, हा संदेश सामान्य जनतेपर्यंत पोचण्यासाठी वर्तमानपत्र, टीव्ही व रेडिओ या माध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणावर होणे आवश्‍यक आहे.
– मुलांना शाळेत सोयाअन्न आधारित आहार देणे, की ज्यामुळे त्यांना असे पदार्थ खाण्यासाठी आवड निर्माण होईल, त्यामुळे सोयाबीन प्रक्रिया लघुउद्योग कार्यरत राहू शकतील. शाळेत सोया अन्न आधारित आहार देण्याचा कार्यक्रम शासनाने अग्रक्रमाने घेणे अगत्याचे आहे.
– सोया आधारित अन्नपदार्थ निर्मिती व यंत्रसामग्री तयार करण्यासाठी इच्छुक उद्योजकांना अद्ययावत प्रशिक्षण देणे, सोया आधारित अन्नप्रक्रिया उद्योगांसाठी लागणारी मशिनरी विशेषतः एक्‍स्ट्रुडर यंत्रसामग्री परदेशात विकसित झालेली असल्याने ती मशिनरी आयात करण्यासाठी उद्योजकांना विशेष सवलत द्यावी.
– अन्नतंत्रज्ञानाशी संबंधित संस्थांनी सोयाप्रक्रिया आधारित उद्योगांशी सामंजस्य करार करणे / संबंध ठेवणे, की जेणेकरून सोया आधारित अन्नप्रक्रियांमध्ये सुधारणा होतील. नवनवीन पदार्थ बाजारात येतील. सोयाबीन अन्नप्रक्रियेबाबत संशोधन, प्रशिक्षण व विस्तार करणाऱ्या संस्थांना शासनाने विशेष आर्थिक साहाय्य द्यावे.

सोया आयसोफ्लेव्हान्स : सोया आयसोफ्लेव्हान्स हे औषधी गुणधर्म असलेले पॉलिफेनॉलयुक्त रासायनिक संयुग असून, वनस्पतिजन्य प्लेव्होनाइड्‌स या वर्गात मोडते. त्याचा प्रभावी वापर पुढील रोगांसाठी होतो : 1. कर्करोग – स्तनांचा / वीर्यग्रंथी / त्वचा / ओटीपोटाचा, तसेच आतड्याचा कर्करोग इ.साठी अत्यंत प्रभावी औषध म्हणून वापर. 2. स्त्रियांच्या अनियमित मासिक पाळीच्या कुटिल समस्या दूर करण्यासाठी. 3. छाती व फुप्फुसांचा रोगोपचार, विशेषतः हृदयरोग्यासाठी. 4. डोकेदुखी, अंगाचा दाह, मद्यपी रुग्णासाठी रामबाण उपाय म्हणून वापर.
आयसोफ्लेव्हान्सचे विपुल प्रमाण असलेला स्रोत म्हणून सोयाबीनकडे पाहिले जाते. सोयाबीनपासून प्रक्रिया केलेल्या विविध पदार्थांत म्हणजे सोया दूध, सोया टोफू, सोया पीठ, भाजके सोयानट्‌स, सोया जर्म, सोया प्रोटिन व आयसोलेट्‌स इ.च्या माध्यमातून आयसोफ्लेव्हान्स उपलब्ध होऊ शकतात.

सोया लेसिथीन : सोया तेलाच्या प्रक्रियेमधून फास्फोलिपिड म्हणून सोया लेसिथीन सोया तेलाच्या 1.8 टक्के (शुद्ध स्वरूपात) इतके प्राप्त होते. सोय लेसिथिनचे उपयोग पुढीलप्रमाणे आहेत :

अन्नप्रक्रिया उद्योग : इमल्सीफायर म्हणून मार्गारिन, चॉकलेट, कॅरामल, कोटिंग्स, च्युइंगगम्स, इन्स्टंट फूड्‌स, बेकरी पदार्थ, दुग्धोद्योगाशी संबंधित पदार्थ, मांस व पोल्ट्रीयुक्त पदार्थ इ.मध्ये लेसिथीनचा वापर.

रोगोपचारासाठी उपयोग : मज्जासंस्था व हृदयसंस्था य्‌ांशी संबंधित ोगांसाठी व रोगप्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी.
औद्योगिक : सौंदर्यप्रसाधने, औषधे, कोटिंग्ज, प्लॅस्टिक व रबर, ग्लास व सिरॅमिक, चिकट पदार्थ निर्मिती, वस्त्रोद्योग व कातडी कमावणे इ. साठी.
सोया सॅपोनिन्स : सोय सॅपोनिन्स हे स्टेरॉइड्‌सयुक्त ग्लायकोसाईड्‌स असून, त्यांचे सोयाबीनमध्ये प्रमाण दोन ते पाच ग्रॅम प्रति 100 ग्रॅम इतके आहे. पाण्यात विरघळविल्यास सॅपोनिन्सचा साबणासारखा फेस होतो, त्यामुळे त्याचा उपयोग फेस निर्माण करणारा पदार्थ व इमल्सिफायर म्हणून अन्नपदार्थांमध्ये केला जातो, त्याशिवाय सॅपोनिन्स फायटोस्टेरॉल संयुग असल्याने रोगप्रतिकार गुणधर्मांमुळे त्याचा औषध म्हणून उपयोग केला जातो.

सोयायुक्त पदार्थांचा परदेशातील वापर
जपान, चीन, इंडोनेशिया, अमेरिका, युरोप, रशिया व बाल्टिक देश इत्यादी ठिकाणी सोयायुक्त पदार्थांचा वापर दैनंदिन आहारात मोठ्या प्रमाणात होत आहे. अमेरिका व युरोप खंडात दूध व दुग्धजन्य पदार्थ, तसेच मांसाहारी पदार्थ यांस पर्याय म्हणून सोयायुक्त पदार्थांचा वापर केला जात आहे. दूध भुकटीचा वापर अनेक दुग्धजन्य पदार्थांत तसेच प्रथिनांचा स्रोत म्हणून वापर केला जातो.

अलीकडच्या काळात जगाच्या बाजारपेठेत दूध भुकटी महाग झाल्याने त्याची जागा सोया प्रोटिनने घेतलेली आहे. अमेरिका, युरोप इ. देश पूर्णतः मांसाहारी आहेत असे म्हटले तर वावगे होणार नाही; परंतु मांसाहारी पदार्थांचे सेवन केल्याने कोलेस्टेरॉल किंबहुना हृदयरोग, रक्तदाब इत्यादीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढल्याने प्रथिने उपलब्धतेसाठी सोया प्रोटिन व मांसाहारी पदार्थांसारखी चव प्राप्त होण्यासाठी दैनंदिन आहारात फ्लेवर्ड टेक्‍चर्ड सोया प्रोटिनचा वापर सर्रास होत आहे.

सोया दूध व त्यावर आधारित टोफू (पनीर), योगर्ट इत्यादी विविध आरोग्यदायी पदार्थ, सोया पेये, सोया व फळे मिश्रणयुक्त पेये, सोया व तृणधान्यमिश्रित एक्‍स्ट्रुटेड पदार्थ, स्नॅक्‍स, सोयाबार इ. सोयायुक्त पदार्थ परदेशी बाजारपेठेत उपलब्ध आहेत. चीनमध्ये 144 हून जास्त कंपन्या सोयाफ्लेक्‍स, सोयासॉस, सोया प्रोटिन कॉन्सन्ट्रेट्‌स व आयसोलेट्‌स, सोया लेसिथीन, सोया आयसोफ्लेव्हान, सोय स्टेरॉल, सोय टोफू व योगर्ट, विविध सोया पेये इ. पदार्थ तयार करून ते स्वतःच्या, तसेच जगाच्या बाजारपेठेत विकत आहे. वर निर्देशित केलेल्या जागतिक स्तरावरील अनेक कंपन्या सोयायुक्त व सोयाआधारित पदार्थांच्या माध्यमातून हजारो कोटींची बाजारपेठ काबीज करीत आहेत.

युनिसेफच्या आकडेवारीनुसार जगाच्या तुलनेत जन्मतः कमी वजन असलेली 35 टक्के बालके (2.5 किलोपेक्षा कमी वजन) भारतात आहेत. सन 2008 च्या आकडेवारीनुसार देशात पाच वर्षांखालील कुपोषित बालके 55 दशलक्ष असून, ती ऑस्ट्रेलिया खंडाच्या लोकसंख्येच्या 2.5 पट आहेत. कुपोषित बालकांच्याबाबत आपला जगात दुसरा नंबर लागतो. कुपोषित बालकांना आवश्‍यक प्रथिने, ऊर्जा व सूक्ष्म अन्नद्रव्ये यांचा पुरवठा योग्य होत नाही असा याचा अर्थ होतो. एखाद्या दशकापेक्षा जास्त काळापासून कडधान्यांच्या उत्पादनात 14 दशलक्ष टनांपेक्षा जास्त वाढ झालेली नाही. कडधान्य शरीरास प्रथिने पुरवितात हे लक्षात घ्यावयास हवे.

भारतात दारिद्य्ररेषेखालील जनता भरपूर असून त्यांच्याकडे मांस, दूध, कडधान्य इत्यादी प्रथिनयुक्त अन्नधान्य विकत घेण्याची ऐपत नाही. वरील सर्व बाबींचा विचार करता, तसेच सोयाबीनच्या सध्याच्या किमतींचा व त्यातील अन्नघटकांचा (प्रथिने 36 टक्के, खाद्यतेल 20 टक्के, पिष्टमय पदार्थ 28 टक्के तसेच क्षार इ.) विचार करता सोयाबीन हेच गरिबांच्या खिशाला परवडणारे व प्रथिनांचा पुरवठा करणारे एकमेव अन्नधान्य आहे, असे म्हटले तर वावगे होणार नाही. आपल्या देशाचा विचार करता प्रत्येकाने 25 ग्रॅमपर्यंत सोयाबीन व त्यावर आधारित प्रक्रियायुक्त अन्नाचा दैनंदिन आहारात वापर केल्यास 121 कोटी लोकसंख्या विचार घेता आपली सोयाबीनची वार्षिक गरज 9.94 दशलक्ष टन इतकी आहे.

माहिती आहे…
सोयाबीनपासून होणारी प्रक्रिया
– सोया तेल, सोया नट्‌स
– सोया पीठ, सोया प्रोटिन्स
– सोय दूध, सोया फ्लेक्‍स
– सोया सॉस, सोया नगेट्‌स

सोयापीठ आधारित पदार्थ
– पौष्टिक आटा
– बेकरी पदार्थ – सोयामिश्रित बन, केक, बिस्कीट, पाव
– इतर पदार्थ – सोयामिश्रित चकली, शेव, लाडू, पापड, फरसाण, पकोडा, बासुंदी, कढी इ.

सोयादूध आधारित पदार्थ
– सुगंधी दूध
(व्हॅनिला, क्रीम, चॉकलेट, इलायची स्वाद)
– दही, श्रीखंड, आम्रखंड, लस्सी
– योगर्ट, आइस्क्रीम
– पनीर / टोफू – पराठा, पुलाव,
पनीर पकोडा, कटलेट,
सॅंडविच, पॅटीस, ब्रेडरोल,
मटार पनीर, पालक पनीर
सोया दूध प्रक्रियेनंतर उरणाऱ्या
सोयापल्पपासूनचे पदार्थ असे
– बर्फी, गुलाबजामून,
हलवा, पीठ पकोडा,
पशुखाद्य, बिस्कीट,
शेव, डोसा,
इडली, ढोकळा.

वेचक-वेधक
सोयाबीनमुळे टळतो हृदयरोग
अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाचा (एफ.डी.ए.) हेल्थक्‍लेम : मागील 30 वर्षांत सोयाबीनवर झालेल्या संशोधनावर आधारित सोया प्रथिनांबाबत अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासन (एफ.डी.ए.) विभागाने ऑक्‍टोबर 1999 मध्ये हेल्थक्‍लेमविषयक माहिती प्रसिद्ध केली. त्यानुसार आपण दैनंदिन आहारात सोया प्रथिनांचा 25 ग्रॅम इतका वापर केल्यास हृदयरोग होण्याचे टाळू शकतो.

हाडांनाही मिळते बळकटी
पाव लिटर सोया दूध अथवा योगर्ट / 50 ग्रॅम सोयापीठ / 50 ग्रॅम शिजविलेले सोयाबीन इ.पासून 50 मिलिग्रॅम आयसोफ्लेव्स्‌ा उपलब्ध होऊ शकतात. उत्तर अमेरिकन मेनोपॉज संस्थेने एक शास्त्रीय अहवाल प्रसिद्ध केला आहे. 50 मिलिग्रॅम प्रति दिन आयसोफ्लेव्हान्स सेवन केल्यास कोलेस्टेरॉल कमी होणे व हाडांस बळकटी येणे, 40 ते 80 मिलिग्रॅम प्रति दिन आयसोफ्लेव्हान्स सेवनाने रक्तवाहिन्यांस बळकटी येणे व रक्तदाब उत्तम राहणे हे निष्कर्ष या अहवालात नमूद केलेले आहेत.

आयुष्यही वाढतेय
जपानी पुरुष व स्त्रीचे सरासरी आयुर्मान अनुक्रमे 78 वर्षे व 85 वर्षे आहे. जास्त आयुर्मान का, याबाबत जगभर विशेषतः अमेरिकेत यावर भरपूर संशोधन झाले असून, याचे कारण म्हणजे जपानी माणसाच्या दररोजच्या आहारात टोफू, सोयासॉस, नॅटो, सोया प्रोटिन इत्यादी सोयाप्रक्रिया पदार्थांचा सर्रास वापर होत आहे. सकाळची न्याहारी, दुपारचे तसेच रात्रीचे जेवण या सर्वांमध्ये सोयाबीनचा वापर प्रति माणसी 670 ते 120 ग्रॅम प्रति दिन होत आहे.

अनेक संधी असलेल्या सोयाबीन प्रक्रिया उद्योगाविषयी तज्ज्ञांकडून सविस्तर मार्गदर्शन करणारे “सोयाबीन प्रक्रिया उद्योगातील संधी‘ विषयाचे दोन  दिवसांचे प्रगत प्रशिक्षण  पुणे येथे आयोजित केले असून प्रशिक्षणात सोयाबीन प्रक्रियेतील संधी, सोयाबीनपासून बनविता येणारे विविध पदार्थ, कृती, व्यवसाय आराखडा, सोयाबीन प्रक्रिया उद्योग कसा सुरू करावा, प्रकल्प अहवाल, प्रक्रिया युनिटसाठी लागणारी आवश्‍यक यंत्रसामग्री, भांडवल, बॅंकेकडून मिळणारे अर्थसाह्य, शासकीय योजना, व्यवसायाची दिशा, प्रॉडक्‍ट मार्केटिंग, ब्रॅंडिंग आदी विषयांचा समावेश आहे.

प्रति व्यक्ती फी 3750/-  प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी आगाऊ नावनोंदणी आवश्‍यक आहे.

नावनोंदणीसाठी संपर्क ः 7249856423

September 28, 2017

1 responses on "soyabin processing business"

Leave a Message

Your email address will not be published.

All Right Reserved.
Call Now ButtonCall Now
Translate »