रेशीम उद्योग……!!!

रेशीम उद्योग……!!!
भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारतात वेगवेगळ्या भागात भौगोलिक परिस्थीतीनुसार वेगवेगळी पिके घेतली जातात. भारतीय शेतकरी अजूनही मोठ्या प्रमाणात पारंपरिक पिके घेत असल्याचे दिसून येते. पावसाची अनियमितता, निसर्गाचा लहरीपणा, वेळेत उपलब्ध होवू न शकणारा मजूर वर्ग, बेभरवश्याची बाजारपेठ आणि कच्च्या मालाची अनिश्चितता यासर्व बाबीमुळे शेतीच्या उत्पादनावर जेवढा खर्च होतो, तेवढेही उत्पन्नही मिळत नाही. पर्यायाने शेतीवर अवलंबून राहणे दुरावास झालेले आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी शेतीवर आधारित पूरक उद्योग करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी रेशमी शेती हा एक चांगला मार्ग आहे. या रेशीम शेतीविषयी थोडक्यात माहिती.
रेशीम उद्योग हा शेतीला एक चांगला जोडधंदा आहे.   या उद्योगापासून आपणास मोठ्या प्रमाणात परकीय चलन प्राप्त होत आहे.   भारतात प्रामुख्याने रेशीम उद्योग हा दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात राबविला जात आहे. यामध्ये कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू या राज्यांचा पारंपरिक रेशीम उद्योग करणारी राज्य म्हणून उल्लेख केला जातो.  महाराष्ट्रात देखील रेशीम उद्योग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसून येत आहे. रेशीम उद्योग घेणाऱ्या अपारंपरिक राज्यामध्ये महाराष्ट्र हे प्रथम क्रमांकावर आहे.  राज्यामध्ये एकूण २०-२२ जिल्ह्यामध्ये रेशीम उद्योग शासनामार्फत राबविला जात आहे   एक हेक्टर बागायत तुती पासून वर्षात ६६६ मनुष्य दिवस रोजगार निर्मिती होते.

  रेशीम उद्योग हा प्रामुख्याने तीन विभागात विभागला गेला आहे.

 • तुती लागवड करुन तुती पाला निर्मिती करणे.
 • रेशीम अळीचे संगोपन करुन रेशीम कोष निर्मिती करणे.
 • कोष काढणे, रेशीम कोषापासून रेशीम धागा निर्मिती करणे.

संगोपन :-

रेशीम उद्योगातील महत्वाचा दुसरा भाग म्हणजे रेशीम अळीचे संगोपन करुन रेशीम कोष निर्मिती करणे हा होय.  रेशीम अळीचे जीवनचक्र हे अंडी, अळी , कोष व पतंग अशा अवस्था मधून (टप्प्यात) एकूण ४८ ते ५२ दिवसात पूर्ण होते. अंडी अवस्था १०  ते १२ दिवस, अळी २५ ते २६ दिवस, कोष अवस्था १० ते १२ दिवस व पतंग अवस्था ही फक्त ३ ते ४ दिवसाची असते.  अळी अवस्थेमध्येच फक्त तुतीचा पाला अळ्यांना खाऊ घातला जातो. रेशीम अळीचे संगोपन करण्यासाठी रेशीम किटक संगोपनगृह बांधणे आवश्यक आहे.  एक एकर तुती लागवड असल्यास कमीतकमी ५० फूट लांब व २० फूट रुंदीचे किटक संगोपनगृह (शेड) आवश्यक आहे. रेशीम अळीचे संगोपन हे मुख्यत्वे २२ ते २८ डिग्री सें.ग्रे. तापमान व ६० ते ८५ % आर्द्रता या वातावरणामध्ये केले जाते. रेशीम अळी लहान असतेवेळी तुती झाडाची कोवळी पाने बारीक चिरुन खाऊ घातली जातात. अळी मोठी झालेवर तुती झाडांच्या फांदया कापून आणून अळयांना खाऊ घातल्या जातात. २५  ते २६ दिवस तुती पाला खाल्यानंतर अळी स्वत:भोवती रेशीम कोष तयार करते. किटक संगोपन करतेवेळी किटक संगोपनगृहामध्ये स्वच्छतेला अत्यंत महत्व आहे. एक पिक घेतल्यानंतर शेड निरजंर्तुकीकरण करणे हे सुध्दा महत्वाचे आहे.  रेशीम कोषांचे जास्तीतजास्त उत्पादन घेण्याकरिता रेशीम अळींच्या वेगवेगळ्या जातींचा वापर केला जातो. सध्या जागतिक बाजारपेठेमध्ये दुबार जातीच्या रेशीम धाग्याला खूपच चांगली मागणी आहे. यासाठी भारतात सध्या दुबार जातीच्या वेगवेगळ्या हायब्रीडचा वापर करण्यात येतो.

धागा निर्मिती करणे :-

रेशीम उद्योगातील तिसरा टप्पा म्हणजे रेशीम अळीने कोष तयार केल्यानंतर कोष काढून घेणे व त्याची विक्री करणे होय.   अळीने कोष तयार केल्यानंतर ५ व्या किंवा ६ व्या दिवशी कोष काढून गोळा करावेत. कोषांची योग्य ती प्रतवारी करुन त्याची वेळेत विक्री होणे गरजेचे आहे. एक एकर तुती लागवडीपासून ४  ते ५  पिकामध्ये कमीतकमी १.०० लक्ष रुपये पर्यंत उत्पादन शेतकऱ्यास मिळते.  शेतकरी यांनी उत्पादित केलेले रेशीम कोष शासन हमी दराने कोषांच्या प्रत नुसार खरेदी करतो. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला रेशीम कोष हा कुठेही विकण्यात शासनाने मुभा दिलेली आहे. त्यामुळे बरेच शेतकरी आपला माल खुल्याबाजारात विकतात. रेशीम कोषापासून मशीनव्दारे रेशीम धागा काढला जातो व त्यापासून रेशीमचे कापड तयार केले जाते.

रेशीम उद्योगातून इतर फायदे :-
१. रेशीम अळयांची विष्ठा दुभत्या जनावरांना सुग्रास प्रमाणे खाद्य म्हणून वापरता येते. यातून १ ते दीड लिटर दूध वाढते.
२. वाळलेला पाला व विष्ठेचा गोबरगॅस मध्ये उपयोग करुन उत्तम प्रकारे गॅस मिळतो.
३. तुतीच्या वाळलेल्या इंधन म्हणून वापरता येतात. तसेच खत म्हणून सुध्दा वापरता येते.
४. संगोपनाक वापरलेल्या चोथा करुन त्यावर अळींबीची लागवड करता येते व त्यानंतर चोथ्यापासून गांडूळ खत करता येते.
५. रेशीम उद्योगापासून देशाला परकीय चलन मिळते व देशाच्या विकासात हातभार लागतो.

६. तुतीची दरवर्षी तळ छाटणी करावी लागते .या छाटणी पासून मिळणारी तुती कोश शासना मार्फत खरेदी केली जातात. त्यामुळे एकरी रु ३५००/- ते ४५००/- जास्तीचे उत्पन्न प्रतीवर्षी मिळते.
७. तुतीच्या पानांमध्ये व ये जीवनसत्वाचे प्रमाण बरेच आढळते. त्यामुळे तुतीचा पाला व रेशीम कोश प्युपा आयुर्वेदिक दृष्टया महत्वाचा आहे.
८. विदेशात तुतीच्या पानांचा चहा मलबेरी टी करतात. शिवाय वाईन करतात.
९. कोश मेलेल्या प्युपाचा आयुर्वेदीक औषधे व सौंदर्य प्रसाधनात उपयोग करता येतो.

आधिक माहितीसाठी :- 7249856424

February 24, 2017

0 responses on "रेशीम उद्योग......!!!"

  Leave a Message

  Your email address will not be published.

  All Right Reserved.
  Call Now ButtonCall Now
  Translate »
  error: Content is protected !!