Sell On Chawadi Store

आता विका तुमचे प्रोडक्ट्स चावडी सोबत.

हो …अगदी तुमचे कोणतेही प्रोडक्ट्स ची विक्री करण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही.

चावडी चा सर्वात महत्वकांशी प्रोजेक्ट ची सुरवात आम्ही करीत आहोत .

Chawadi online E Store.

तब्बल १-१.५ वर्ष या प्रोजेक्ट वर आम्ही काम करीत होतो..असंख्य अडचणी , अनेक प्रश्न ….आणि फायनली त्या सर्वांवर मात करीत आज हे Store तुमच्या हातात सुपूर्त करताना आनंद होतोय…

हे store तुमचे आमचे सर्वांचे असणार आहे !!!!

कारण या store वरती थेट तुम्हाला तुमचे प्रोडक्ट्स चे store थेट उघडता येणार असून ,तुम्हाला हवे ते प्रोडक्ट्स ,हव्या त्या वेळी add किंवा Delete  करण्याची संधी..असणार आहे. तुमचे स्वताचे प्रमोशन कॅपैग्न करण्याची संधी ,तुम्ही डिस्काऊंट कुपन तयार करून आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्याची संधी असणार आहे.

store वर प्रोडक्ट्स add करण्यासाठी कोणतेही शुल्क नसून हि सेवा संपूर्ण मोफत उपलब्ध आहे.

फक्त तुम्हाला चावडी store च्या माध्यमातून order मिळाल्यावर कमिशन द्यावे लागेल.

तुम्ही दिलेल्या category मधील सर्व प्रॉडक्ट store वर विक्री साठी ठेवू शकता..

चावडी store च्या माध्यमातून तुम्हाला order आलेली तुमच्या मेल वरती दिसेल किंवा आपल्या चावडी च्या dashboard वरती सुद्धा दिसू शकेल. किंवा तसा फोन आमचे प्रतिनिधी तुम्हाला करतील.

यात ३ प्रकार असतील.

  1. नियमित प्रकार – कस्टमर ने ऑर्डर दिली आणि चावडी कडे advance पेमेंट जमा झाले कि चावडी ती ऑर्डर थेट तुम्हाला पाठवेल त्या ऑर्डर नुसार तुम्ही प्रॉडक्ट pack करून ठेवावे . आमचे शिपिंग पार्टनर ते प्रॉडक्ट तुमच्याइथून स्वत pick up करतील. कस्टमर ला प्रोडक्ट व्यवस्थित पोहोच झाल्याची खात्री झाल्यावर तुमच्या खात्यावर पैसे जमा होतील.
  2.  ज्या उत्पादनांना सातत्याने मागणी आहे अशा प्रॉडक्ट साठी –    तुम्ही प्रॉडक्ट pack करून चावडी च्या गोडावून ला पाठवून द्यावे आणि ऑर्डर आली कि चावडी स्वत ते प्रॉडक्ट कस्टमर ला पोहोच करेल.त्याकडून पैसे मिळाले कि त्यावर फक्त मार्केटप्लस शुल्क आकारले जाईल.आणि उर्वरित रक्कम तुमच्या खात्यात जमा केली जाईल.
  3. जे उत्पादने किंवा माल  जड वस्तू (उदा. 5  किलो पेक्षा जास्त)–  कस्टमर ने chawadi.com वर ऑर्डर place करून पेमेंट केले कि ऑर्डर details चावडी तुम्हाला पाठवेल…तुम्ही प्रोडक्ट्स pack करून त्या कस्टमर ला पाठवून द्यायचे ..त्याला ते प्रॉडक्ट खात्रीशीर मिळाले त्याने तसा रिपोर्ट दिला कि तुमच्या खात्यावर  त्या ऑर्डर चे पैसे जमा केले जातील.

पेमेंट ७-१० दिवसात तुमच्या खात्यावर NEFT द्वारे जमा केले जाईल.

या store ची मोठ्या प्रमाणात मार्केटिंग केली जात  असून त्यामुळे राज्यातील ग्राहकांचा ओघ इकडे कायम असतो.

ज्या उद्योजकांचे  प्रोडक्ट्स ऑनलाईन विकण्याचे स्वप्न होते पण मोठमोठ्या ऑनलाईन store च्या किचकट नियम व अटी मुळे तसेच स्वताची E –Store वेबसाईट बनवणे सुद्धा शक्य होत नव्हते. अशा उद्योजकांसाठी हि पर्वणीच असणार आहे.

या store द्वारे कोणकोणती उत्पादने विकता येतील असा प्रश्न पडतोय का ?

अगदी कोणतीही ..

जसे शेतकऱ्यांना धान्य,कडधान्य,मिरची,हळद,जवस,तीळ,मोहरी,बेसनपिठ,काजू,मनुके  ,सर्व प्रकारच्या डाळ असा शेतकरी उत्पादित कोणताही माल विकायला ठेवता येईल.

(फक्त सध्या भाजीपाला ,दुग्धजन्य पदार्थ , किंवा कोणतीही १५ दिवसाच्या आत खराब होणारे नाशवंत पदार्थ आत्ता चावडी वर विकायला ठेवता येणार नाहीत.) 

शेतीविषयक काम करणाऱ्या कंपन्यांना   – कृषी पूरक अवजारे,  खते-बी बियाणे,औषधे, पशु खाद्य ,शेतीला लागणाऱ्या पूरक वस्तू  , ट्रकटर आणि त्याची अवजारे सुद्धा विकायला ठेवता येतील.

नव उद्योजकांना किंवा महिला बचत गटांना  त्यांच्या उत्पादित  अगदी सर्व प्रकारचे फूड प्रोडक्ट्स ( चटण्या,  लोणचे ,मसाले ई.)  हर्बल & आयुर्वेदिक प्रोडक्ट्स ,विविध प्रकारचे ज्वेलरी  ,सौंदर्य प्रसाधने ,कपडे ,मशिनरी , विविध शोपीस आणि शोभेच्या वस्तू यासारखे  अगदी काहीही…विकायला ठेवता येईल.

पण हे प्रॉडक्ट तुमच्या स्व निर्मित असावेत बरका ..किंवा त्या प्रोडक्ट्स ची डीलरशिप वेगेरे तुमच्याकडे असणे गरजेचे आहे.

फक्त या chawadi.com वर कोणत्याही व्यक्तीला अथवा कंपनीला प्रोडक्ट्स विकायला ठेवताना एक महत्वाची अट आहे ती म्हणजे तुम्हाला वाटत असेल कि आपले प्रोडक्ट्स chawadi.com च्या माध्यमातून कुणीतरी विकत घ्यावे तर तुम्हाला सुद्धा इतर उद्योजकांनी तयार केलेले प्रोडक्ट्स घेण्याची तयारी ठेवावी लागेल.याविषयी तुम्हाला आमचे प्रतिनिधी रजिस्टर झाल्यावर माहिती देतील. 

चला तर मग आजच chawadi.com वर आपले account रजिस्टर करा आणि आपले प्रॉडक्ट विकणे सुरु करा.

रजिस्ट्रेशन साठी सोबत बटन वर क्लिक करा.


अधिक माहितीसाठी  खाली दिसणार्या कस्टमर केअर वर संपर्क साधा..

धन्यवाद.

All Right Reserved.
Call Now ButtonCall Now
Translate »
error: Content is protected !!