खास उन्हाळ्यात दुधापासून पासून बनविण्यात येणारी उत्पादने …..!!!!

खास उन्हाळ्यात दुधापासून पासून बनविण्यात येणारी उत्पादने …..!!!!
लस्सी, कुल्फी व  कँडी हे सर्वानाच आवडणारे खाद्यापदार्थ आहेत.  ग्रामीण व शहरी भागात या पदार्थांना खूप मागणी आहे. हा उद्योग फारच फायदेशीर आहे आणि तो थोड्या भांडवलात चालू केला जाऊ शकतो. यामध्ये पहिल्याच वर्षी आपले भांडवल वसूल होते व काही नफा पण शिल्लक राहतो. आहार शास्त्राच्या दृष्टीने मानवाला प्रतिदिनी प्रत्येकी ३०० मि.लि. दुधाची गरज असते.
भारतात अनेक ठिकाणी पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी दूध, ताक, लस्सी, देण्याची पध्दत प्रचलित आहे. भारतीय संस्कृतीमध्ये मुलांचे जन्म, वाढदिवस, लग्नकार्य धार्मिक सण, परीक्षेतील यश अशा प्रसंगी लस्सी, कुल्फी व आईस कँडी देण्याची प्रथा मोठ्या प्रमाणावर चालू झाली आहे. त्यामुळे दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस येत आहे. तसेच आपल्याला दुधावर प्रक्रिया करून आपल्याला त्यापासून लस्सी, आईस्क्रीम आदी प्रक्रिया युक्त पदार्थ तयार केले जातात. त्यापासून आपल्याला चांगले उत्पत्र मिळू शकते.
आंबवलेल्या दुग्धजन्य पारंपरिक पदार्थांपैकी लस्सी हे एक उन्हाळ्यात मागणी असणारे थंड पेय आहे. छास ताक व मठ्ठा या नावांनी देखील लस्सी ओळखली जाते. व्यवसायिक लस्सी हा एक वैशिष्टेयपूर्ण असा आल्हाददायक मधुर स्वाद,आंबूस गोड चवीचा व सुंगध असणारा आंबवलेला घट्ट द्रव्यपदार्थ असतो. लस्सीला स्वाद येण्यासाठी मीठ किंवा साख्र आणि विविध प्रकारचे मसाल्याचें पदार्थ वापरतात.
 

उद्योग  :-
दुधाची लस्सी कुल्फी करताना दूध, खवा, साखर व कोको यांचे मिश्रण घट्ट होईपर्यंत उकळावे. हे मिश्रण थंड करून साच्यांत भरावे. दही कँडी करताना दही, साखर फळांचा स्वाद यांचे मिश्रण साच्यात भरावे. ऑरेंज कँडी करताना फळांचा स्वाद, साखर व पाणी यांचे मिश्रणी तयार करावे लागते. त्यावर योग्य ती प्रक्रिया करून त्यापासून लस्सी तयार करता येते. तसेच साधी कुल्फी करताना दुधात व पाणी मिसळून तापवावे. एक किंवा दोन उकळ्या आल्यानंतर साखर मिसळून आणि चांगल्या प्रकारे हलवावे व आपल्या आवडीनुसार स्वाद मिसळवा. (उदा. ऑरेज, पिस्ता, बदाम इत्यादी) अशा प्रकारे आईस्क्रीम गोठ्याचे मिश्रण तयार केली जाते.

लस्सी निर्मिती :-
उत्तम प्रतीची लस्सी तयार करायाची असल्यास उत्तम प्रतीचे दूध घेऊन ९.१० टक्के स्निग्धेतर घनघटक व ०.५ ते १.० टक्के स्निग्धांशासाठी प्रमाणित करावे. दुधास उष्णता देऊन ८५ अंश सेल्सिअस तापमानास ३० मिनिटे किंवा ९१ अंश सेल्सिअस तापमानास २.५ ते ५.० मिनिटे पाश्चरीकरण करावे. पाश्चरीकृत दूध त्वरित थंड करून त्यामध्ये ३१ अंश सेल्सिअस तापमानास उत्तम प्रतीचे जीवाणू संवर्धन (लॅक्टोकोकस लॅक्टिस) १ ते २ टक्के प्रमाणात एकजीव मिसळावे. दही तयार होण्यासाठी २२ अंश सेल्सिअम तापमानास ठेवावे. तयार झालेल्या दह्याचा सामू ४.५ असताना ते लस्सी तयार करण्यासाठी घ्यावे. दळी ढवळणीच्या साह्याने ढवळत असतानाच त्यामध्ये ३० टक्के साखरेचे द्रावण अशा प्रमाणात मिसळावे की तयार होणाऱ्या लस्सीमध्ये साखरेचे प्रमाण ८ ते १२ टक्के असेल. तयार झालेल्या लस्सीचे २००० पीएसआयला होमोजिनायझेशन करून आवश्यकतेनुसार वेष्टनात सीलबंद करून ५ अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानास साठवून ठेवावे.

 
अन्नद्रव्यांचे शेकडा प्रमाण (टक्के)  :-
एकूण दुग्ध घन घटक – दुग्ध स्निग्धांश – शर्करा – आम्लता (किमान)
९.० – १.५ ते ३.८ – १३ ते २० – ०.७

बाजारपेठ :-
समाजातील वेगवेगळ्या स्तरांतून या उत्पादनाला चांगली मागणी असते. अनेक उत्पादक आपले स्वत:च्या उत्पादनाचा ब्रँन्ड तयार करून बाजारात, विक्रीस ठेवता येऊ शकतात. आपण तयार केलेले उत्पादन हे आईस्क्रिम पार्लर, लस्सी सेंटर तसेच विविध स्वीट होम, डेअर फार्म, हॉटेल, रेस्टोरेंट  आदी ठिकाणी आपल्याला मालाची विक्री करता येते.

प्रकल्पविषयक :-
हा प्रकल्प सुरु करण्यासाठी १.५० ते २  लाख रूपये खर्च येतो. उद्योग सुरु झाल्यावर खर्च कमी जास्त प्रमाणात होऊ शकतो. तसेच या उद्योगासाठी विविध शासकीय योजना उपलब्ध आहे. तसेच बँक सुध्दा आपली पत पाहून कर्ज पुरवठा करते.
मार्गदर्शन  :-
चावडी तर्फे दुग्ध प्रक्रिया उद्योग या विषयासाठी प्रात्यक्षिकांसह संपूर्ण माहिती देणारे, प्रशिक्षण आयोजित केले आहे. अधिक माहितीसाठी  7249856424 या नंबरवर संपर्क साधावा.
 

March 7, 2017

1 responses on "खास उन्हाळ्यात दुधापासून पासून बनविण्यात येणारी उत्पादने .....!!!!"

  1. I want do a any business..im interesting!

Leave a Message

Your email address will not be published.

All Right Reserved.
Call Now ButtonCall Now
Translate »
error: Content is protected !!