मधुपेटीची निर्मिती व रचना…….!!!!

मधुपेटीची निर्मिती व रचना…….!!!!
मधमाश्यांची किमान ओळख आत्ता पर्यंतच्या भागात आपल्याला झालीच आहे. आत आपण मधमाशी बरोबर घनिष्ठ मैत्री करू यात. पुढील काही भागांत पाळीव जातीच्या मधमाश्यांना आपल्या शेतात ठेवून त्यांचे संगोपन कसे करायचे आणि पीक उत्पादनात वाढ करण्यासाठी त्यांची मदत कशी घ्यायची याची माहिती घेऊ या, मधमाशीपालनाच्या इतिहासात आपण पाहिले, की मध माश्यांच्या काही जातींना मानवाने पाळण्याचे विविध प्रयत्न केले. मानवाच्या चौकस बुध्दीने काही मध माश्यांच्या मानसिकतेचा अभ्यास करून त्यांच्या पालनासाठी लागणाऱ्या साहित्यांची वा उपकरणीं माहिती आम्ही देणारा आहोत.

उपकरणे
वैज्ञानिक पध्दतीने पाळीव जातीच्या मधमाश्यांचे पालन करण्या योग्य अशा मधमाश्यांचे घर वा मधपेटी असणे गरजेचे आहे. मध काढण्यासाठी देखील योग्य यंत्राची गरज आहे.

मधपेटी :-
मधमाश्यांचे कुटुंब राहण्यासाठी मानवाने लाकडी पेटी विकसित केली. तिला मधुपेटी असे म्हणतात. आधुनिक मधमाशीपालनात मधुपेटी हे सर्वात महत्वाचे मूळ साहित्य आहे. बराच वेळा मधमाश्यांची ही पेटी आपण पाहातो. ती सहज बनवू शकतो. या हेतून आपण त्यासारखी पेटी तयार करतो. मात्र पेटी तयार झाल्यावर कळते, की या पेटीत माशा राहत नाहीत. त्या पेटी सोडून जातात. याची कारणे साधी सोपी आहेत. मधमाश्यांचा अभ्यास आणि त्यांची घराची गरज यांचा आपला अभ्यास नसतो. आणि आपण जे घर बांधतो ते तिला पटत नाही. मधमाश्यांच्या पेट्या बनवायच्या असतील तर त्यासाठी तांत्रिक शिक्षण घेणे गरजेचे आहे. अशा पेट्या बनवण्याचे प्रयोग याआधी अनेक वर्षे विविध वैज्ञानिकांनी केले आहेत. सन १८५१ मध्ये फादर लॅगस्ट्रॉथ यांनी लाकडी चौकटी असलेल्या मधपेटीचा शोध लावला. त्यापासून मधमाशीपालनाचा व्यवसाय खऱ्या अर्थांने सुरू झाला.

उपकरणांमागील वैज्ञानिक :-
याच काळात लॅगस्ट्रॉथ यांनी निर्माण केलेल्या लाकडी मधुचौकटीतून पोकडी न मोडता मध काढण्याच्या यंत्राचा शोध १८६५ मध्ये हृष्का यांनी लावला. मधुपेटीच्या चौकटीत मधमाश्यांच्या मेणापासून बनवलेले मेणपत्रे वापरण्याचा शोध जॉन मेहरिंग यांनी १८५७ मध्ये लावला. या मेणपत्रामुळे भक्क्मपणा वाढत असल्यामुळे मध काढण्याच्या यंत्रातून पोकड्या वेगाने फिरल्यानंतर त्या न मोडता त्या साठविलेल्या मध बाहेर फेकला जाई. या तीन शोधांमुळे पुढे मधमाशीपालनाच्या व्यवसायात क्रांती झाली.जगभरातील लोक

आधुनिक व्यवसाय करू लागले. लाकडी पेटीतून मधमाशी पाळणे, त्यांची  तपासणी करणे, मध काढणे त्यांचे निरनिराळ्या ठिकाणी स्थलांतर करणे नवीन वसाहती तयार करणे आदी कामे मधमाशीपालकास सतत करावी लागतात. या सर्व कामांसाठी योग्य, सुटसुटीत अवजारे पुढे हळूहळू निर्माण करण्यात आली.
मधपेटीची रचना :-

 • तळपाट :-

सर्वात खालच्या किंवा तळाचा भाग याला ताळपाट म्हणतात.

 • पिलाव्याची कोठी :

तळपाटावर ठेवली जाणारी चौरसकृती पेटी. या कोठीत ४,८ किंवा लाकडी चौकटी ठेवल्या जातात. प्रत्येक चौकटीत एक या प्रमाणे ४,८ किंवा १० पोकड्या या चौकटीत मधमाष्या बांधतात. सातेरी ही भारतीय मधमाशी ८ चौकडीवर आणि परदेशी मधमांशी  एपीस मेलीफेरा ही १० पोळ्यांची घरे बांधतो.

 • पिलाव्याची चौकट :-

मधमाश्या पिलावाच्या कोठीत आपला पिलावा वाढवण्यासाठी मेणाच्या पोकड्या तयार करतात.

 • खोट चौकट :-

पिलाव्याच्या कोठीत ठेवण्यासाठी पिलाव्याच्या चौकटीच्याच आकाराची एक फळी असते. वसाहतीतील पोकड्या व मधमाश्यांची संख्या जशी असेल त्याप्रमाणे ही खोट चौकट पुढे मागे सारून मधमाश्यांच्या वसाहतीला संरक्षण देता येते.

 • मधुकोठी :-

पिलावाच्या कोठीच्यावर त्याच लांबी-रूंदीची:, परंतु कमी उंचीची आणखी एक कोठी ठेवली जाते. परंतु कमी उंचीची आणखी एक कोठी ठेवली जाते. त्यास मधुकोठी म्हणतात. या मधुकोठीच्या चौकटीमध्ये फक्त मधच साठविला जातो. मधाचा हंगाम चांगला असल्यास पिलावा कोठीवरील मधुकोठ्यांची संख्या १,२,३ अशी वाढविता येते.

 • मधुचौकटी :-

पिलावाच्या कोठीप्रमाणे मधुकोठीत ८ ते १० मधुचौकटी ठेवल्या जातात. या चौकटीमध्ये मधमाश्या पोकड्या बांधतात. आणि त्यात केवळ मधाचाच साठा करतात.

 • अंतआच्छादन :-

मधुकोठोवर ठेवण्यासाठी अर्धा ते एक इंच जाडीची एक फळी असते. आच्छादनास मध्यभागी २वा ३ इंच व्यासाचे छिद्र असते. त्यातून वायू व्हिजन (व्हेंटिलेशन) होते व वसाहतीचे संरक्षण होते.

 • छप्पर किंवा झाकण :-

अंतर आच्छादनाच्या वर ठेवण्यासाठी झाकण असते. या झाकणाच्या वरील बाजूस पत्रा असतो. चारही बाजूंना व्हेंटिलेशनसाठी २.५ ते ३.० सें.मी. व्यासाची छिद्रे असतात. या छिद्रांना आंतून जाळी मारलेली असते

वाचा  :-  कोणत्याही उद्योगाशी स्पर्धा न करणारा उद्योग  –  मधमाशी पालन

http://wp.me/p6Y2eu-XR
 

March 1, 2017

0 responses on "मधुपेटीची निर्मिती व रचना.......!!!!"

  Leave a Message

  Your email address will not be published.

  All Right Reserved.
  Call Now ButtonCall Now
  Translate »