• No products in the cart.

Sale!

Vegetable Dehydration Online Training Program (Premium)

8,450.00

Category:

Description

Vegetable Dehydration Training Programme

भारत हा देश भाजीपाला व फळांच्या उत्पादनात जगात दुस-या क्रमांकावरचा देश आहे. जगाच्या एकुण उत्पादनाच्या जवळ जवळ १५% भाजीपाल्याचे उत्पादन एकट्या भारत देशात घेतले जाते. हि आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. असे असले तरी, नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणानुसार एकुण उत्पादनाच्या १८% उत्पादनाची नासाडी ही उत्पादनाची योग्य हातळणी न केल्यामुळे झाली. फळे व भाजीपाल्याचा नाशवंत गुणधर्म असल्यामुळे भाजीपाल्याची नासाडी तर होतेच त्याचबरोबर शेतक-याचही तेवढच नुकसान होते. त्याचप्रमाणे भारतात एकुण भाजीपाला व फळे उत्पादनाच्या केवळ २% उत्पादनावर प्रक्रिया केली जाते. हा आकडा इतर उत्पादनांच्या तुलनेत अतिशय कमी आहे हे प्रमाण वाढवणे गरजेचे असुन यासाठी प्रक्रिया उद्योगाला चालना देण्याची गरज आहे. भाजीपाला व फळे टिकवण्यासाठी तसेच त्याचे मुल्यवर्धनासाठी त्याचे निर्जलीकरण (Dehydration) हा एक सोपा व फायदेशिर पर्याय आहे.

निर्जलीकरण म्हणजे काय ?

              भाजीपाला हा नाशवंत असतो कारण त्यातील अतिरिक्त नैसर्गिक जल आणि जीवाणू (ब्याक्ट्रियाज). सडण्याची प्रक्रिया त्यामुळे अत्यंत वेगाने सुरु होते आणि शेतमाल अखाद्य बनतो. चक्क फेकून द्यावा लागतो. जलांश जेवढा अधिक तेवढी सडण्याचा वेग अधिक. कोथींबीर, टोमॅटो ते सर्वच पालेभाज्या या सदरात येतात. काही फळभाज्यांचे नैसर्गिक आयुष्य थोडे अधिक असते पण बाजारभाव नसला कि त्याही वाया जातात. हे वाया जाणे थांबवणे. भाज्यांमधील अतिरिक्त जल अल्प प्रक्रिया करुन काढुन घेणे म्हणजे निर्जलीकरण.

त्यामुळे महाराष्ट्रातील तरुणांना हा उद्योग स्वतःच्या भागात सुरू करण्याची मोठी संधी आहे.

    • ऑनलाईन प्रीमियम ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये तुम्हाला या उद्योगाविषयी बऱ्याच प्रमाणात माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून तुम्हाला हा उद्योग सुरू करण्यासाठी तुमचा पाया पक्का करताना ह्या कोर्स चा मोठ्या प्रमाणात फायदा होईल.
    • प्रीमियम मॉडेल हे बेसिकली ऑनलाइन ऑफलाइन मॉडेल असून यामध्ये तुम्ही कोर्स सबस्क्राईब केल्यावर तुम्हाला घरी पुढील सात दिवसात कीट पाठवले जाणार आहे.
    • या किट मध्ये नोट्स, Assignment Sheet, Notebook, काही माहिती पुस्तिका, कागदपत्रांची यादी या सारख्या गोष्टी समाविष्ट असतील. तुमचे प्रशिक्षण पूर्ण झाले की पुन्हा तुम्हाला सर्टिफिकेट  कुरीयर द्वारे पाठवण्यात येईल.
    •  खरे तर प्रीमियम कोर्स  सर्विस हि चावडीची आतापर्यंतची सर्वात वेगळी आणि सर्वात चांगली कोर्स सर्विस तयार केली आहे. यामध्ये मुख्यतः चावडी तर्फे तुम्हाला संपूर्ण महिनाभर एक पर्सनल कन्सल्टंट दिला जाईल तो कन्सल्टंट तुमचा एक उद्योग मार्गदर्शक किंवा एक शिक्षक राहिल.  तो संपूर्ण महिनाभर तुमच्याकडून कोर्समध्ये दिलेल्या व्हिडिओज प्रमाणे तुम्हाला मार्गदर्शन करेल आणि तुमच्याकडून काही महत्वाचे असाइनमेंट आणि टास्क करून घेईल. त्यावर तुमच्याशी संवाद करेल. तुम्ही निवडलेल्या कोर्स बद्दल तुमचे नॉलेज वाढवविण्यात येईल आणि काही ऍक्टिव्हिटीज तुमच्या कडून करून घेतल्या जातील त्यामध्ये;
      • असाइनमेंट असतील
      • काही टास्क असतील
      • टाईम मॅनेजमेंट असेल
      • कुटुंबाशी संवाद असेल
      • मार्केट मध्ये थेट जावून तुम्हाला संवाद कसा साधायचा याबाबत माहिती दिली जाईल.
      • आपल्या उत्पादनाला मार्केट मिळवून देण्यासाठी कोण कोणत्या गोष्टी करायच्या याचे विशेष ज्ञान दिले जाईल.

    या आणि अशा बऱ्याच ऍक्टिव्हिटीज या प्रिमिअम कोर्समध्ये असतील जेणेकरून तुम्हाला जो उद्योग सुरू करायचा आहे त्यामध्ये तुम्ही तुम्हाला येणाऱ्या शंका, अडचणी, चांगले अनुभव, वाईट अनुभव, तुम्हाला मिळालेले ज्ञान यामध्ये नक्कीच वाढ होईल. तुमचा उद्योग उभारणीसाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव या कोर्सच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच  मिळेल .

   या कोर्समध्ये साधारणत: एक महिन्याचा कालावधी असेल या संपूर्ण कालावधीमध्ये तुम्हाला तुमचा काही ठराविक वेळ हा उद्योग उभारणीसाठी लागणाऱ्या कोर्ससाठी द्यावा लागेल.

  दिवसभरामध्ये तुम्हाला काही वेळ आमच्या Counselor आणि काही वेळ उद्योगा संबंधित ऍक्टिव्हिटीज करण्यासाठी द्यावा लागेल.

   सोप्या भाषेत सांगायचे झाले तर तुम्हाला एक क्रॅश कोर्स देऊन तुमची उद्योगासंबंधीचे एक विद्यालयीन शिक्षणच देण्यात येणार आहे.

 

  • या कोर्स मध्ये काय काय शिकवले जाते त्याची माहिती तुम्हाला curriculum section  मध्ये दिली आहे कोर्स घेण्यापूर्वी अगदी ती सगळी बघून घ्या.
  • शक्यतो मराठी भाषेमध्ये संपूर्ण कोर्स असून सोप्या आणि सहज भाषेमध्ये यामध्ये माहिती दिलेली आहे.
  • कोर्स हा व्हिडीओ फॉरमॅटमध्ये असून तुम्हाला विषयानुसार वेगवेगळ्या व्हिडिओ curriculum section मध्ये दिसतील.
  • या उद्योगाला जागा किती लागते ? शेड कसे बांधावे लागते तसेच मशिनरी कुठून घ्याव्यात साधारण इन्वेस्टमेंट किती लागते याविषयी सुद्धा कोर्समध्ये माहिती देण्यात आली आहे.
  • याप्रमाणेच उद्योग उभा करण्यासाठी नक्की अगोदर काय तयारी करावी लागते ? तुमची मानसिक स्थिती ? कुटुंबाचा सपोर्ट यासारख्या विषयांवर तीसुद्धा मार्गदर्शन करण्यात आले आहे.
  • सोबतच लोन मिळवण्यासाठी नक्की काय करावे लागते ? प्रकल्प अहवाल म्हणजे काय ? सध्या शासकीय योजना कोणत्या सुरू आहेत त्या विषयी माहिती सुद्धा कोर्समध्ये देण्यात आली आहे.
  • जर तुम्हाला काही अडचण आली व्हिडीओ पाहताना काही प्रश्न उभे राहिले तर ते प्रत्येक वेळी लिहून ठेवा आणि नंतर आमच्या counselor ( तज्ञ सल्लागार ) टीमशी चर्चा करून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी सहजरीत्या मिळवा.
  • लक्षात घ्या counselor ( तज्ञ सल्लागार ) टीमशी तुम्हाला एकदा चर्चा करता येईल त्यामुळे सगळे प्रश्न वेळोवेळी लिहून ठेवल्या नंतर फोनवर बोलते वेळी तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांचे निरसन करून घेता येईल.

 

हा कोर्से नक्की किती वेळ ( Total Duration ) असणार आहे ?  यामध्ये किती व्हिडियो ( Number Of Units ) आहेत तसेच हा कोर्से घेतल्यावर नक्की किती दिवस तुम्हाला पाहता येईल याविषयी वरती माहिती देण्यात आली आहे ती नक्की पाहून घ्या .

हा प्रोग्राम कोण करू शकतो ?

      • शेतकरी
      •  स्वताचा  नवीन उद्योग सुरू करू इच्छिणार्‍या कोणताही तरुण
      • ग्रामीण भागात स्वतःचा उद्योग सुरू करणाऱ्या ची इच्छा असणारी कोणतीही संस्था किंवा कंपनी
      • बचत गट किंवा शेतकरी गट किंवा फार्मर प्रोड्यूसर कंपनी

हा प्रोग्राम केल्यावर काय फायदा होईल?

    • तुम्हाला उद्योगाविषयी मनात जेवढ्या शंका असतील त्या संपूर्ण निरसन झाले असेल.
    • एक कोर्समधील दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्हाला स्वतःचा उद्योग कसा सुरु करायचा हे समजू शकेल.

Sucess Story

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

All Right Reserved.