Description
पोहा उत्पादन प्रशिक्षण कार्यक्रम
पोहा मॅन्युफॅक्चरिंग ट्रेनिंग प्रोग्राम – अनुकूल कृषी परिस्थिती आणि समृद्ध नैसर्गिक संसाधनाच्या आधारामुळे विविध पोहा उत्पादनांमध्ये भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा उत्पादक आहे. पोहा किंवा राईस फ्लेक्स ही भातापासून तयार केलेली खाद्य पदार्थ आहेत . हे बर्याचदा न्याहारी साठी खाल्ले जाते आणि पचनास हलके आणि पौष्टिक असते.त्यामुळे पोहा हे पारंपारिकपणे भारतात आवडत्या नाश्त्यामध्ये समाविष्ट आहे.
पोहा प्रामुख्याने भारताच्या पश्चिम प्रदेशात म्हणजेच महाराष्ट्र, गुजरात आणि उत्तर प्रदेशातील काही भागात वापरले जाते.
- ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये तुम्हाला या उद्योगातील उत्पादन प्रक्रियेविषयी माहिती देण्यात आली आहे. तुम्हाला हा उद्योग सुरू करण्यासाठी तुमचा पाया पक्का करताना ह्या कोर्सचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल.
- पोहा निर्मिती कोर्समध्ये काय शिकवले जाते त्याची माहिती तुम्हाला curriculum section मध्ये दिली आहे कोर्स घेण्यापूर्वी ती सगळी बघून घ्या.
- शक्यतो मराठी भाषेमध्ये संपूर्ण कोर्स असून सोप्या आणि सहज भाषेमध्ये माहिती दिलेली आहे.
- कोर्स हा व्हिडीओ फॉरमॅटमध्ये असून तुम्हाला विषयानुसार वेगवेगळ्या व्हिडिओ curriculum section मध्ये दिसतील.
- पोहा निर्मिती उद्योगाला जागा किती लागते ? शेड कसे बांधावे लागते तसेच मशिनरी कुठून घ्याव्यात साधारण इन्वेस्टमेंट किती लागते याविषयी कोर्समध्ये माहिती देण्यात आली आहे.
- याप्रमाणेच उद्योग उभा करण्यासाठी नक्की अगोदर काय तयारी करावी लागते ? तुमची मानसिक स्थिती ? कुटुंबाचा सपोर्ट यासारख्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले आहे.
- सोबतच लोन मिळवण्यासाठी नक्की काय करावे लागते ? प्रकल्प अहवाल म्हणजे काय ? सध्या शासकीय योजना कोणत्या सुरू आहेत त्या विषयी माहिती सुद्धा कोर्समध्ये देण्यात आली आहे.
- कच्चा माल, मशिनरी कुठे मिळतील यासाठी काही संपर्क क्रमांक सोबत देण्यात आले आहेत.
- जर तुम्हाला काही अडचण आली व्हिडीओ पाहताना काही प्रश्न निर्माण झाले तर ते प्रत्येक वेळी लिहून ठेवा आणि नंतर आमच्या counselor ( तज्ञ सल्लागार ) टीमशी चर्चा करून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी सहजरित्या मिळवा.
- लक्षात घ्या counselor ( तज्ञ सल्लागार ) टीमशी तुम्हाला तीनदा चर्चा करता येईल त्यामुळे सगळे प्रश्न वेळोवेळी लिहून ठेवल्यानंतर फोनवर बोलते वेळी तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांचे निरसन करून घेता येईल.
पोहा निर्मिती व्यवसाय कोण करू शकतो ?
- पोहा निर्मिती व्यवसाय शेतकरी करू शकतात.
- ज्या तरूणाला स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे असे प्रत्येक तरूण हा व्यवसाय करू शकतात.
- ग्रामीण भागात स्वतःचा उद्योग सुरू करण्याची इच्छा असणारी प्रत्येक व्यक्ती, कोणतीही संस्था किंवा कंपनी हा व्यवसाय करू शकतात.
- महिला बचत गट किंवा शेतकरी गट किंवा फार्मर प्रोड्यूसर कंपनी हा व्यवसाय सुरु करू शकतात .
पोहा निर्मिती उद्योग ऑनलाईन प्रशिक्षण केल्यावर तुम्हाला काय फायदा होईल ?
- तुम्हाला पोहा निर्मिती उद्योगाविषयी मनात जेवढ्या शंका असतील त्या संपूर्ण शंकांचे निरसन होईल.
- पोहा निर्मिती कोर्समध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्हाला स्वतःचा उद्योग कसा सुरु करायचा हे समजू शकेल.
माहितीसाठी या उद्योगाविषयी सर्वसाधारण माहिती देणारा आपला युट्युब वरील व्हिडिओ .
View Course Introduction Video on Youtube
Reviews
There are no reviews yet.