Sale!

Mushroom Processing Online Training Program

5,450.00 4,450.00

Report Abuse
Category:
Share this:

Description

            मशरूम व्यावसायिक शेती शेतकऱ्यांसाठी एक पूरक उद्योग म्हणून पुढे येत आहे. अद्ययावत तंत्रज्ञान आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा यांचा चांगला अभ्यास करून हा व्यवसाय केल्यास चांगली संधी उपलब्ध आहे .तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास गुणवत्तापूर्ण उत्पादन घेऊन भारतीय बाजारपेठेतील संधीचे व्यावसायिक फायद्यात रूपांतर करता येईल.

            शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी आणि शेतातील निविष्ठांचा सुयोग्य वापर करून उत्पादकता वाढावी यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न होताना दिसत आहेत. परिणामतः योग्य त्या ठिकाणी अनुदान देणे आणि मशरूमचा पोषण आहार योजनेमध्ये समावेश करणे असे प्रयत्न शासकीय स्तरावरुन  होत आहेत.

  • ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये तुम्हाला या उद्योगातील  उत्पादन प्रक्रिये विषयी माहिती देण्यात आली आहे.  तुम्हाला हा उद्योग सुरू करण्यासाठी तुमचा पाया पक्का करताना ह्या कोर्सचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल.
  • मशरूम  उत्पादन उद्योग  कोर्समध्ये काय शिकवले जाते त्याची माहिती तुम्हाला Curriculum Section  मध्ये दिली आहे कोर्स घेण्यापूर्वी ती सगळी बघून घ्या.
  • शक्यतो मराठी भाषेमध्ये संपूर्ण कोर्स असून सोप्या आणि सहज भाषेमध्ये माहिती दिलेली आहे.
  • कोर्स हा व्हिडीओ फॉरमॅटमध्ये असून तुम्हाला विषयानुसार वेगवेगळ्या व्हिडिओ Curriculum Section मध्ये दिसतील.
  • मशरूम  उत्पादन उद्योगाला जागा किती लागते? शेड कसे बांधावे लागते तसेच मशिनरी कुठून घ्याव्यात, साधारण इन्वेस्टमेंट किती लागते या विषयी कोर्समध्ये माहिती देण्यात आली आहे.
  • याप्रमाणेच उद्योग उभा करण्यासाठी नक्की अगोदर काय तयारी करावी लागते ? तुमची मानसिक स्थिती? कुटुंबाचा सपोर्ट या सारख्या विषयांवर  मार्गदर्शन करण्यात आले आहे.
  • सोबतच लोन मिळवण्यासाठी नक्की काय करावे लागते? प्रकल्प अहवाल म्हणजे काय? सध्या शासकीय योजना कोणत्या सुरू आहेत त्या विषयी माहिती सुद्धा कोर्समध्ये देण्यात आली आहे.
  • मशिनरी कुठे मिळतील यासाठी काही संपर्क क्रमांक सोबत देण्यात आले आहेत.
  • जर तुम्हाला काही अडचण आली व्हिडीओ पाहताना काही प्रश्न निर्माण झाले तर ते प्रत्येक वेळी लिहून ठेवा आणि नंतर आमच्या counselor ( तज्ञ सल्लागार ) टीमशी चर्चा करून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी सहजरित्या मिळवा.

लक्षात घ्या counselor ( तज्ञ सल्लागार ) टीमशी तुम्हाला तीनदा चर्चा करता येईल त्यामुळे सगळे प्रश्न वेळोवेळी लिहून ठेवल्या नंतर फोनवर बोलते वेळी तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांचे निरसन करून घेता येईल.                                     

मशरूम  उत्पादन उद्योग  कोण करू शकतो ?                                             

  • मशरूम  उत्पादन उद्योग  शेतकरी करू शकतात.
  • ज्या तरूणाला स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे असे प्रत्येक तरूण हा व्यवसाय करू शकतात.
  • ग्रामीण भागात स्वतःचा उद्योग सुरू करण्याची  इच्छा असणारी प्रत्येक व्यक्ती,  कोणतीही संस्था किंवा कंपनी हा व्यवसाय करू शकतात.
  • महिला बचत गट किंवा शेतकरी गट किंवा फार्मर प्रोड्यूसर कंपनी हा व्यवसाय सुरु करू शकतात .

 मशरूम  उत्पादन  ऑनलाईन प्रशिक्षण केल्यावर तुम्हाला  काय फायदा होईल ?

  • तुम्हाला मशरूम  उत्पादन  उद्योगाविषयी मनात जेवढ्या शंका असतील त्या संपूर्ण शंकांचे  निरसन होईल.
  • मशरूम  उत्पादन उद्योग  कोर्समध्ये  दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्हाला स्वतःचा उद्योग कसा सुरु करायचा हे समजू शकेल.

 

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Sorry no more offers available
All Right Reserved.
Translate »