Description
मसाला मार्केटिंग
मित्रांनो तुम्ही अगदी योग्य कोर्स निवडला आहे .
मार्केटिंग म्हणजे ग्राहकांना काय हवे आहे ते समजून घेणे आणि व्यवसाय वाढविण्यासाठी त्याचे विश्लेषण करणे आणि नियोजित संधीची उपलब्धता वाढवणे होय. मार्केटिंग महत्वाचे आहे कारण हे आपल्याला आपली उत्पादने किंवा सेवा विकण्यात महत्वाचे स्रोत आहे . कोणत्याही व्यवसायाची मुख्य गोष्ट म्हणजे व्यवसाय वाढ होय. मार्केटिंग हे त्या अंतिम ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी एक आवश्यक माध्यम आहे. मार्केटिंग हेच उत्पादने किंवा सेवा विक्रीला कारणीभूत ठरते.मसाला मार्केट हा कोर्स मसाला उत्पादन पश्चात मसाला विपणन किंवा मार्केटिंग करण्यासाठी कोणत्या महत्त्वपूर्ण योजनांचा अवलंब करावा यासाठी बनवण्यात आला आहे. मसाला मार्केटिंग कोर्समध्ये वेगवेगळ्या ट्रिक्स अँड टेक्निक्सचा वापर करून मसाला व्यवसाय वाढ कशा प्रकारे केली जाते याची माहिती देण्यात आली आहे.
- मसाला मार्केटिंग ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये तुम्हाला मसाला मार्केटिंग विषयी बऱ्याच प्रमाणात माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून तुम्हाला मसाल्याची मार्केटिंग करतांना ह्या कोर्सचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल.
- मसाला मार्केटिंग कोर्समध्ये काय काय शिकवले जाते त्याची माहिती तुम्हाला curriculum section मध्ये दिली आहे कोर्स घेण्यापूर्वी अगदी ती सगळी बघून घ्या.
- शक्यतो मराठी भाषेमध्ये संपूर्ण कोर्स असून सोप्या आणि सहज भाषेमध्ये यामध्ये माहिती दिलेली आहे.
- कोर्स हा व्हिडीओ फॉरमॅटमध्ये असून तुम्हाला विषयानुसार वेगवेगळ्या व्हिडिओ curriculum section मध्ये दिसतील.
- मसाल्याची मार्केटिंग करतांना नक्की अगोदर काय तयारी करावी लागते ? तुमची मानसिक स्थिती ? कुटुंबाचा सपोर्ट यासारख्या विषयांवर तीसुद्धा मार्गदर्शन करण्यात आले आहे.
- मसाला मार्केटिंग हा कोर्स नक्की किती वेळ ( Total Duration ) असणार आहे ? यामध्ये किती व्हिडियो ( Number Of Units ) आहेत तसेच हा कोर्स घेतल्यावर नक्की किती दिवस तुम्हाला पाहता येईल याविषयी वरती माहिती देण्यात आली आहे ती नक्की पाहून घ्या .
मसाला मार्केटिंग व्यवसाय प्रशिक्षण कोण करू शकतो ?
- ज्या तरूणाला किंवा महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे असे प्रत्येक तरूण किंवा महिला मसाला मार्केटिंग व्यवसाय करू शकतात.
- ग्रामीण तसेच शहरी भागात स्वतःचा उद्योग सुरू करण्याची इच्छा असणारी प्रत्येक व्यक्ती, कोणतीही संस्था किंवा कंपनी मसाला मार्केटिंग व्यवसाय करू शकते .
- महिला बचत गट मसाला मार्केटिंग व्यवसाय सुरु करू शकते .
मसाला मार्केटिंग ऑनलाईन प्रशिक्षण केल्यावर तुम्हाला काय फायदा होईल?
- तुम्हाला मसाला मार्केटिंग विषयी मनात जेवढ्या शंका असतील त्या संपूर्ण शंकांचे निरसन होईल .
- मसाला मार्केटिंग कोर्समध्ये दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्हाला स्वतःच्या मसाल्याची मार्केटिंग कशी करायची हे समजू शकेल.
माहितीसाठी या उद्योगाविषयी सर्वसाधारण माहिती देणारा आपला युट्युब वरील व्हिडिओ .
Reviews
There are no reviews yet.