Sale!

Injection Molding Business

5,150.00 4,450.00

Report Abuse
Category:
Share this:

Description

Plastic Products Manufacturing Business 

    मित्रांनो तुम्ही अगदी योग्य उद्योग निवडला आहे इंजेक्शन मोल्डिंग (Injection Molding) उद्योग.   प्लास्टिक मोल्डिंगमध्ये वेगवेगळे प्रकार येतात त्यामधील इंजेक्शन मोल्डिंग (Injection Molding) हा एक प्रकारचा व्यवसाय आहे.इंजेक्शन मोल्डिंग (Injection Molding) उद्योगात  मशीनरीद्वारे आपण घरगुती उत्पादने जसे की बादली , मग , स्टूल , प्लास्टिक खुर्ची, टेबल ,फर्निचर  यांची निर्मिती करू शकतो.  सोबत Home Appliances जसे की फ्रिज ,ए. सी , मिक्सर यासारख्या उत्पादनासाठी लागणारे प्रॉडक्ट तयार करू शकतो..तसेच यापासून वेगवेगळ्या इंडस्ट्रीला लागणारे छोटे-मोठे पार्ट सुद्धा तयार केले जाऊ शकतात. ऑटोमोबाईल सेक्टरला अशा मोल्डिंग पासून तयार केलेल्या प्रोडक्टची  सगळ्यात मोठी बाजारपेठ समजली जाते.कारण गाडीमध्ये वेगवेगळे पार्ट किंवा भाग लागतात ते इंजेक्शन मोल्डिंग पासून बनवले जातात. यासोबतच शेतीसाठी लागणारे साधने जसे की घमेले , फळभाज्यांचे कॅरेट सुद्धा तयार करता येतात.

  साधारण बारा ते पंधरा लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करून हा उद्योग आपण सुरू करू शकतो.

   इंजेक्शन मोल्डिंग (Injection Molding)  या उद्योगासाठी एक ते दिड  गुंठा जागा आवश्यक आहे.

    त्यामुळे महाराष्ट्रातील  तरुणांना इंजेक्शन मोल्डिंग (Injection Molding) हा उद्योग स्वतःच्या भागात सुरू करण्याची मोठी संधी आहे.

  •  इंजेक्शन मोल्डिंग (Injection Molding) या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये तुम्हाला या उद्योगाविषयी बऱ्याच प्रमाणात माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून       तुम्हाला हा उद्योग सुरू करण्यासाठी तुमचा पाया पक्का करताना ह्या कोर्सचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल.
  • इंजेक्शन मोल्डिंग (Injection Molding) कोर्स मध्ये काय काय शिकवले जाते त्याची माहिती तुम्हाला curriculum section  मध्ये दिली आहे कोर्स घेण्यापूर्वी अगदी ती सगळी बघून घ्या.
  • शक्यतो मराठी भाषेमध्ये संपूर्ण कोर्स असून सोप्या आणि सहज भाषेमध्ये यामध्ये माहिती दिलेली आहे.
  • कोर्स हा व्हिडीओ फॉरमॅटमध्ये असून तुम्हाला विषयानुसार वेगवेगळ्या व्हिडिओ curriculum section मध्ये दिसतील.
  • इंजेक्शन मोल्डिंग (Injection Molding) उद्योगाला जागा किती लागते ? शेड कसे बांधावे लागते तसेच मशिनरी कुठून घ्याव्यात साधारण इन्वेस्टमेंट किती लागते याविषयी सुद्धा कोर्समध्ये माहिती देण्यात आली आहे.
  • याप्रमाणेच उद्योग उभा करण्यासाठी नक्की अगोदर काय तयारी करावी लागते ? तुमची मानसिक स्थिती ? कुटुंबाचा सपोर्ट यासारख्या विषयांवर तीसुद्धा मार्गदर्शन करण्यात आले आहे.
  • सोबतच लोन मिळवण्यासाठी नक्की काय करावे लागते ? प्रकल्प अहवाल म्हणजे काय ? सध्या शासकीय योजना कोणत्या सुरू आहेत त्या विषयी माहिती सुद्धा कोर्समध्ये देण्यात आली आहे.

लक्षात घ्या या कोर्ससाठी आपल्या learn from Experience Project चे तज्ञ श्री आशुतोष येलजाळे सर आपणास इंजेक्शन मोल्डिंग (Injection Molding)  विषयी माहिती देतील तसेच बँक लोन योजना , शासकीय योजना किंवा इतर माहिती श्री अमित मखरे सर तुम्हाला माहिती देतील. 

इंजेक्शन मोल्डिंग (Injection Molding)  हा कोर्स नक्की किती वेळ   (Total Duration) असणार आहे ?  यामध्ये किती व्हिडियो (Number Of Units ) आहेत तसेच हा कोर्स घेतल्यावर नक्की किती दिवस तुम्हाला पाहता येईल याविषयी वरती माहिती देण्यात आली आहे ती नक्की पाहून घ्या .

इंजेक्शन मोल्डिंग (Injection Molding) प्रशिक्षण कोण करू शकतो ?

  • ज्या तरूणाला स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे असे  प्रत्येक तरूण इंजेक्शन मोल्डिंग (Injection Molding)  व्यवसाय करू शकतात.  
  • ग्रामीण तसेच शहरी  भागात स्वतःचा उद्योग सुरू करण्याची इच्छा असणारी प्रत्येक व्यक्ती,  
  • कोणतीही संस्था किंवा कंपनी इंजेक्शन मोल्डिंग (Injection Molding) व्यवसाय करू शकते .  
  • महिला बचत गट  इंजेक्शन मोल्डिंग (Injection Molding) व्यवसाय सुरु करू शकते . 

 इंजेक्शन मोल्डिंग (Injection Molding) उद्योग ऑनलाईन प्रशिक्षण केल्यावर तुम्हाला काय फायदा होईल ?

  • तुम्हाला इंजेक्शन मोल्डिंग (Injection Molding) उद्योगाविषयी मनात जेवढ्या शंका असतील त्या संपूर्ण शंकांचे  निरसन होईल .
  • इंजेक्शन मोल्डिंग (Injection Molding)   कोर्समध्ये  दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्हाला स्वतःचा उद्योग कसा सुरु करायचा हे समजू शकेल.

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Sorry no more offers available
All Right Reserved.
Translate »