• No products in the cart.

उद्योगाची पूर्वतयारी

Preparation Before Starting a Business

“कल्पना सत्यात उतरविण्यासाठी स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा”

उद्योगाची पूर्वतयारी

           उद्योगाचे क्षेत्र असो वा इतर कोणतेही क्षेत्र असो मेहनत, जिद्द, आत्मविश्वास व धेयनिष्ठा या गोष्टींना पर्याय नसतो. उद्योजकाने व्यवसायाचे ध्येय साध्य करण्यासाठी अपार मेहनत घेणे, ध्येयावर विश्वास ठेवून प्रयत्नवादी असणे व ध्येय साध्य होईपर्यंत प्रयत्न न थांबविणे हे यशस्वी उद्योजकाचे लक्षण आहे.

           उद्योग, उद्योजकता व उद्योजकतेचे मूल्यांकन या संकल्पना जाणून घेतल्यानंतर उद्योग करण्यासाठी ज्या पूर्वतयारीची आवश्यक आहे ती जाणून घेणे अनिवार्य ठरते. उद्योग व नोकरी या दोन्हीमधील महत्वाचा फरक म्हणजे उद्योगामध्ये स्वीकारली जाणारी जोखीम ही नोकरीमध्ये नसते. परंतु उद्योगातील ही जोखीम व्यवस्थापित करता आली तर उद्योगात येणाऱ्या अडचणी देखील सहज सोडवता येतात. म्हणूनच उद्योगाची पूर्वतयारी करणे गरजेचे आहे.

 खाली दिलेले मुद्दे उद्योगाच्या पूर्वतयारीसाठी आवश्यक ठरतात-

  • उद्योगाचे स्वरूप व संधी-

       जो उद्योग सुरू करायचा आहे त्या उद्योगाविषयी संपूर्ण माहिती उद्योजकाला असायलाच हवी. उद्योग सुरू करण्याआधी उद्योगाविषयी अगदी सूक्ष्म घटकापासून ते अगदी मोठ्या घटकापर्यंत सर्व तपशील उद्योजकाला माहिती असतात. जसे की कच्चा माल कोणता लागणार आहे, कच्चा माल कोठून मागवावा लागणार आहे या गोष्टीपासून ते तयार झालेला पक्का माल कोणत्या बाजारपेठेत, कोणत्या मार्केटिंग टेक्निकद्वारे विक्री होणार आहे अशी सर्व माहिती उद्योजकाला असते. या व्यतिरीक आपल्या उद्योगाचा  ग्राहक वर्ग, त्या ग्राहकांच्या असणाऱ्या गरजा व मागण्याकडे लक्ष देणे हा पूर्वतयारीचा महत्वाचा भाग आहे.  

  • उद्योगासाठीचे आर्थिक नियोजन-

      उद्योग सुरू करण्यासाठी ज्या महत्वाच्या घटकाची गरज असते ते म्हणजे भांडवल. भांडवल दोन प्रकारचे असते. १. खेळते भांडवल व २. स्थिर भांडवल. या दोन्ही भांडवलाचे सुयोग्य आर्थिक नियोजन करणे उद्योगाच्या पूर्वतयारीतील आवश्यक तयारी आहे.

  • उद्योगासाठी आवश्यक मार्गदर्शन व प्रशिक्षण-

उद्योग सुरू करण्यासाठी उद्योगाबद्दल सर्व माहिती असणे तर गरजेचे आहेच. या व्यतिरिक्त जर उद्योग सुरू करण्यासाठीचे मार्गदर्शन व प्रशिक्षण उद्योजकाने घेतले असेल तर तो उद्योगाच्या वाटचालीतील एक महत्वाचा घटक ठरतो.

  • आवश्यक संसाधने –

उद्योगासाठी आवश्यक असणारी सर्व संसाधने जसे आर्थिक संसाधने व कुशल मनुष्यबळ हे घटक, त्याची उपलब्धता यांविषयीची पूर्वतयारी उद्योग करताना आवश्यक ठरते.

  • विपणन आराखडा-

      उद्योगाची पूर्वतयारी करताना उत्पादित केलेला तयार माल उद्योजक कोणत्या बाजारपेठेत, कोणत्या व्यवसाय पद्धतीनुसार व विपणनाच्या  कोणत्या तंत्राद्वारे विक्री करणार आहेत याचा आराखडा तयार करणे हा उद्योगाच्या पूर्वतयारीचा महत्वाचा टप्पा आहे.

Preparation Before Starting a Business

     “व्यावसायिक ज्ञानाचा पाया भक्कम करा आणि स्वतःचा विकास घडवा.”

Stay Updated…
Other Blogs
Follow Us On Facebook And Instagram
For More Information Please Call Us On 7272971971

March 27, 2021

0 responses on "उद्योगाची पूर्वतयारी"

Leave a Message

All Right Reserved.