तेलाची पॅकिंग करताय, मग हे लक्षात ठेवा…!!!

तेलाची पॅकिंग करताय, मग हे लक्षात ठेवा…!!!
तेलाचे पॅकिंग हे त्यांच्या घनता आणि रेन्सिडिटी पातळीमुळे अन्य द्रव पदार्थांपेक्षा वेगळे ठरते. तेलाच्या पॅकेजिंगसाठी पाउच पासून टॅंकरपर्यंत विविध प्रकार उपलब्ध आहेत.
सध्या बाजारामध्ये तेल विविध प्रकारच्या पॅकिंगमध्ये उपलब्ध आहे.
१) लवचिक (फ्लेक्‍झिबल) पाउच – १० ग्रॅमपासून.
२) प्लॅस्टिक बाटल्या – १० ग्रॅमपासून.
३) काचेच्या बाटल्या.
४) एक ते दहा किलोपर्यंतचे प्लॅस्टिक जेरी कॅन.
५) मेटल कॅन.
६) २०० लिटर ड्रम बॅरल.
खाद्यतेल पॅकिंग करतेवेळी खालील बाबींचा विचार करणे आवश्‍यक.
१) खाद्य तेलाची टिकवण क्षमता, २) रेन्सिडिटी पातळी, ३) जीवाणूंची वाढ, ४) घनता (व्हिस्कॉसिटी), ५) वजनानुसार पॅकिंग – १०० ग्रॅम, २०० ग्रॅम, ५०० ग्रॅम, १ किलो वगैरे.
१) फ्लेक्‍झिबल पाउच – हे फॉर्म फिल सील प्रकारच्या यंत्राद्वारे पॅक करता येतात. त्याचप्रमाणे हाताने पॅकिंग करता येतात. मात्र, पॅकिंगवेळी व सील करतेवेळी तेलाचा थेंब सील करायच्या भागात आल्यास पाउच सील होऊ शकत नाही. त्यासाठी खास काळजी घ्यावी लागते. पाउच आरेखन करताना त्याच्या ताण सहन करण्याची क्षमता चांगली असणे आवश्‍यक आहे. त्यासाठी चांगल्या गुणवत्तेच्या प्लॅस्टिकचा विचार जरूर करावा.
२) प्लॅस्टिकच्या बाटल्या – मुख्यत्वेकरून पीईटी बॉटलमध्ये तेल पॅक केले जाते. हे हाताने तसेच स्वयंचलित फॉर्म फिल सीलच्या यंत्राद्वारे भरता येतात. बाजारात एचडीपीईच्या बाटल्या उपलब्ध आहेत. बाटल्यांच्या झाकणांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. जर झाकणांतून तेल झिरपले, तर हे पॅकिंग नुकसानीत जाऊ शकते. बाजारात १० ग्रॅमपासून ते १ किलोपर्यंत बाटल्या उपलब्ध आहेत. तेलाच्या प्रकारानुसार बाटल्या तयार केल्या जातात.
३) काचेच्या बाटल्या, चिनी मातीच्या बाटल्या व बुधले – हे तेलाच्या पॅकिंगसाठी वापरले जाणारे पारंपरिक पॅकिंग आहेत. काचेत व काचेच्या किंवा चिनी मातीच्या बाटल्यांमध्ये तेलाची साठवण अधिक चांगल्या प्रकारे होते. मात्र, त्या नाजूक असल्याने वाहतुकीमध्ये अडचणी येतात. त्यांचे झाकण हासुद्धा तितकाच महत्त्वाचा घटक आहे.


) प्लॅस्टिकचे जेरी कॅन – भारतात एक किलोपासून २५ किलोपर्यंत एचडीपीईचे जेरी कॅन वापरले जातात. त्यांची भरणी हस्तचलित यंत्र किंवा स्वयंचलित यंत्राद्वारे करता येते. त्यांची क्षमता ही त्यांच्या जाडीवर अवलंबून असते. उदा. किती किलो पॅक करणार आहोत, त्यानुसार जेरी कॅनची जाडी व डिझाईन अवलंबून असते. अधिक तेलाचे उत्पादन असेल तर जेरी कॅनचे डिझाईन वेगळे करून घेणे फायद्याचे ठरते. त्यातून आपल्या उत्पादनाच्या ब्रॅंडिंगला चालना मिळू शकते.
) मेटल कॅन – धातूचे कॅन हाही परंपरागत पॅकींगचा प्रकार आहे. सध्या ते ५० ग्रॅमपासून ते १५ किलोपर्यंतच्या गटात उपलब्ध आहेत. यांच्या झाकणात न उघडताही तेल काढण्याची सोय करता येते. मेटल पॅकिंगची बॅरिअर प्रॉपर्टी सर्वांत अधिक असते. त्याचप्रमाणे हे हाताळणी करिता योग्य असे पॅकिंग आहे.

) पिंप (२०० लिटर क्षमतेचे बॅरल ) – हे पॅकिंग अधिक प्रमाणातील १०० लिटर किंवा २०० लिटर अशा तेल उत्पादनाच्या विक्रिसाठी उत्तम आहे. त्यामुळे हाताळणी व वाहतूक सोपी होते. २०० लिटरच्या पॅकिंगमध्ये नेहमी दोन झाकणे असतात. त्यापेक्षा अधिक क्षमतेने वाहतुकीसाठी प्रामुख्याने ऑइल टॅंकरही उपलब्ध आहेत.
) ब्रीक पॅक – कागद व एकापेक्षा अधिक थरांच्या फिल्ममध्ये प्रामुख्याने तेल पॅक करता येते. (उदा. टेट्रा पॅक हा एक ब्रॅन्ड त्यापैकीच.)  तेलाच्या पॅकिंगसाठी लागणारी यंत्रसामग्री परदेशासह भारतातही उपलब्ध आहेत. पॅकेजिंग मटेरियलचे विविध प्रकार आता भारतात उपलब्ध झाले आहेत.
उत्पादन अधिक असल्यास पॅकिंगचे वैशिष्ट्यपूर्ण आरेखन नक्कीच करून घ्यावे. त्याचा विक्री वेळी व ब्रॅंड निर्मितीमध्ये फायदा होतो.

March 4, 2017

0 responses on "तेलाची पॅकिंग करताय, मग हे लक्षात ठेवा...!!!"

    Leave a Message

    Your email address will not be published.

    All Right Reserved.
    Call Now ButtonCall Now
    Translate »