
Poha / murmure manufacturing Business
पोहे निर्मिती उद्योग
भारतात पोह्याचा उपयोग सकाळच्या नास्त्यासाठी मोठया प्रमाणावर केला जातो. तसेच अचानक पाहुणे आल्यास चविष्ठा पोहे बनवून पाहुण्यांचे स्वागत सुध्द केले जाते. त्यामुळे पोह्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे.
भातापासून पोहे / मुरमुरे तयार करतात. भेळ, भंडग, चिवडा, या खाद्यापदार्थांमध्ये मुरमुरे वापरतात. जेथे भात पिकतो तेथे हा उदयोग केला जाते. तसेच तिथून कच्चा माल आयात करून आपण आपल्या भागात हा उदयोग आपल्याला घरगुती स्वरूपात सुध्दा करता येतो.
महाराष्ट्रात सध्या मोठ्या प्रमाणात गुजरात येथून पोहा येतो.त्यापेक्षा आपण जर आपल्या लोकल भागात हा व्यवसाय सुरु केला तर नक्कीच बाजारपेठ मिळू शकेल.
पोहे निर्मिती उद्योग उदयोग :-
तांदूळ हे पोहे व मुरमुरे उदयोगासाठी लागणारा प्रमुख कच्चा माल आहे. तांदूळापासून पोहे तयार करणे ही अंत्यत सोपी पध्दत आहे. मुरमुरे करताना प्रथम भात घेऊन १० ते १५ मिनिटे गरम पाण्यामध्ये उकडावे लागतात. ते हलर यंत्रावर भरडून घ्यावे लागतात. त्यानंतर त्यांचा तांदूळ तयार होतो. हे तांदूळ वाळू नसलेल्या कढईत गरम करून ते सुपावर घेऊन त्यामध्ये एक चमचा मीठ द्रावण शिंपडावे. त्यांनतर वाळू असलेल्या कढाईत ते टाकून मुरमुरे तयार होतात. या पध्दतीत थोडाफार बदल करून पोहे सुध्दा बनविले जातात.
बाजारपेठ :-
पोह्याला सर्वत्र मागणी प्रचंड स्वरूपात असल्याची दिसून येते. पोहे आपल्या स्थानिक किराणा दुकानात विक्रीसाठी आपण ठेवू शकतो. तसेच मोठया स्वरूपात हॉटेल, खानावळ आदी ठिकाणी सुध्दा आपण ऑर्डर घेतल्या जाऊ शकतात. परिसरातील किरकोळ दुकान, फरसाण दुकान, भेळवाले, बेकरी, हॉटेल, मिठाईची दुकाने इत्यादी ठिकाणी आपण पोहे व मुरमुरे ठोक पध्दतीने आपल्याला विकता येतात. त्यामुळे या उदयोगास सहज पध्दतीने बाजारपेठ उपलब्ध होते.
प्रकल्पविषयी :-
हा उदयोग उभारणीसाठी साधारण ४ ते ५ लाख रूपये खर्च येतो. आपल्या क्षमतेनुसार खर्च कमी जास्त होईल. उदयोग सुरू झाल्यावर कच्चा माल यासाठी अधिक चे पैसे लागतील. बॅक सुध्द पत पाहून आपणांस कर्ज पुरवठा करते. हा उदयोग सुरु केल्यास आपण एक चांगले उद्योजक होऊ शकता.
या उद्योगाविषयी संपूर्ण माहिती देणारे प्रशिक्षण चावडी तर्फे आयोजित केले आहे.प्रवेशाची अंतिम तारीख १० जुलै असून सर्वांनी त्या अगोदर आपला प्रवेश निश्चित करा.
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या ग्रीन बटन वर क्लिक करून कॉल करा.
5 responses on "Poha or murmure manufacturing Business"
Leave a Message
You must be logged in to post a comment.
Important details, please update new ideas
Interested
Give a new business idea please
Nice iam interested
I’m interested about this business