कागदी पाकिटे उद्योग

कागदी पाकिटे उद्योग

प्रकल्पाची ओळख :

       कर्ज काढून मोठ्या व्यवसायाची स्वप्ने पहात बसण्यापेक्षा आपली कामे करण्याची क्षमता व वेळ वाया न घालवता अस्तित्वात असलेल्या सुविधा, मनुष्यबळ व बाजारातील मागणी यांचा विचार करून पेलवेल असा व्यवसाय निवडावा. ‘कागद रुपांतर’ (पेपर कनव्हशन) म्हणजे कागदापासून वस्तू बनविणे. हा एक घरच्या घरी व महिलांना, महिलांच्या बचत गटांना करता येतो. प्रारंभी हा व्यवसाय छोट्या प्रमणात घरगुती स्वरुपात सुरु करावा. या व्यवसायास बाजारपेठ भरपूर आहे. हा माल नाशवंत नाही, शिवाय घरातील सर्वाना रोजगार मिळतो.
चावडी चे Affiliate बना,सोशल मिडिया वर मेसेज शेयर करा,अधिकचे उत्पन्न कमवा.अधिक माहितीसाठी या लिंक वर क्लिक करा.

१. उत्पादनप्रक्रिया / कार्यप्रक्रिया :

कागदाच्या दुकानातून कागद खरेदी करावा किंवा रद्दीच्या दुकानातून इंग्लिश-मराठी मासिके खरेदी करावीत. बाजारात खळ आयती मिळते. मासिकामधील टाचण्या कागद फाटणार नाही अशा पद्धतीने काढून टाकाव्यात. ठराविक आकाराची पाकिटे व फोल्डच्या पिशव्या बनवाव्यात. ५०-१०० चे गठ्ठे कागदानेच पॅक करून ठेवावेत.
कागदी पाकिटे बनवण्यासाठी मोटारवर चालणारे पेपर पेस्टिंग यंत्रही वापरता येते. या यंत्रमार्फत वेगवेगळ्या प्रकारची व आकाराची पाकिटे जलदगतीने व मोठ्या प्रमाणावर तयार करता येतात.
 

.२. प्रकल्पक्षमता :

हा प्रकल्प मध्यम स्वरूपाचा असून या प्रकल्पात वार्षिक १५,००,००० पाकिटे इतके उत्पादन घेणे उत्पादन अपेक्षित आहे.
 

३. बाजारपेठ / संभाव्य ग्राहकवर्ग :

किरकोळ स्टेशनरी विक्रेते, जनरल स्टोअर्स सुपर मार्केट्स, प्रेझेंटेशन आर्टिकलचे व्यापारी व शासननिर्मिती बचत गटातील विक्री केंद्रे, शासकीय निमशासकीय, कार्यालये, कंपन्या, बँका यांच्याशी संपर्क साधून ऑर्डर मिळवण्याचा प्रयत्न करावा. मिळालेले ग्राहक कायम टिकवण्याचा  दृष्टीने नियमित व वेळेवर मालाचा पुरवठा करावा.
आपल्या मालाचा उत्तम दर्जा व वाजवी दर ठेवावा. या व्यवसायातील उद्योजकांना रोजगाराची हमी म्हणून शासनाने काही आरक्षण दिलेले आहे. महाराष्ट्र शासनाला कागदाच्या ज्या काही वस्तू लागतात त्या सर्व शासन खादी ग्रामोद्योग मंडळामार्फत खरेदी करते.
खादी ग्रामोद्योग मंडळ त्यांच्या लाभार्थी उद्योजकांना ही ऑर्डर विभागून देते. त्यातून बाजारपेठ मिळवण्यास मदत होते. तसेच त्याची काही प्रदर्शने भरविली जातात. आपल्या मालाचा विक्री स्टॅाल लावून विक्री करावी. त्यामुळे माल विकला जाऊन प्रसिद्धी मिळते. बाजारपेठ मिळवण्यास मदत होते.
महिलांना तयार केलेला माल विक्री होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासननिर्मित बचत गटांची विक्री केंद्रे सुरु केलेली आहेत. तसेच महिलांसाठी आर्थिक विकास महामंडळ व खादी ग्रामोद्योग मंडळ यांच्याकडे विक्रीच्या काही योजना आहेत. त्यांची काही प्रदर्शने भरतात, त्यात आपल्या मालाचा स्टॉल लावून विक्री करावी. यात विक्रीबरोबरच प्रसिद्धीही मिळते. व्यवसायाची वाढ होण्यास मदत होते.
या व्यवसायाकरिता खरेदी केलेल्या मशिनरीचा पुरेपूर वापर होण्याच्या दृष्टीने आपल्याला कागदाच्या इतरही वस्तू बनवता येतील उदा. कागदी पिशव्या, कागदी डिश, फाईल्स, फाईल कव्हर्स, पोर्टफोलिओ, मिठाई बॉक्स, रजिस्टर्स इ. वस्तू आपणास बनवता येतील.
 

४. उपलब्ध जागा :

६०० चौ. फूट आच्छादित जागा/इमारत .
 

५. उपयुक्तके / मुलभूत सुविधा :

सिंगल/थ्री फेजचे वीज कनेक्शन. पाणी गरजेपुरते..
 

६. मनुष्यबळ / कर्मचारीवर्ग आवश्यकता :

उद्योजक स्वत: उत्पादनप्रक्रियेत सहभागी होणार असून, त्याच्यासह १ कुशल, १ अकुशल कामगार असे एकूण २ लोक काम करणार ँआहेत, असे गृहीत धरले आहे.
 

७. भांडवलाचा तपशील :

७.१ स्थिर भांडवल : (१ महिन्यासाठी ):

अ. क्र.तपशील नगदरएकूण किंमत
१.
 
 
 
 
 
 
२.
३.
यंत्रसामग्री व साहित्य :
१. मोटारवर चालणारे पेपर कटिंग यंत्र
२. पेपर पेस्टिंग यंत्र
३. पाकिटे डाय पंचिंग मशिन
४. वेगवेगळ्या आकाराचे डाय सेट
५. इतर विविध उपकरणे
६. वर्किंग टेबल
फर्निचर
पूर्व – उत्पादन खर्च
 १० 
८०,०००
१५,०००
७५,०००
५००
३,०००
१०००

 
८०,०००
१५,०००
७५,०००
५०००
३०००
२०००
१०,०००
५,०००
 
          एकूण  १,९४,०००

 

७.२ खेळते भांडवल ( १ महिन्यासाठी ):

अ) प्रमुख बाबी :

१) कच्चा माल व साहित्य :

अ. क्र.तपशीलप्रमाणदर ( रु. )एकूण किंमत
(रु.)
.
२.
३.
कागद
खळ
पॅकिंगचे सामान
३२ रिम
१५० कि. ग्रॅ.
६०० रु. / रिम
६ रु. / कि. ग्रॅ.
१९,२००
९००
९००
 एकूण   २१,०००

 

२) मनुष्यबळ / कर्मचारीवर्गावरील खर्च :

अ. क्र.      कर्मचारी संख्या प्रत्येकी दरमहा
वेतन ( रु. )
एकूण किंमत
( रु. )
१.
२.
३.
कुशल
अकुशल
भत्ते व इतर सवलती
( एकूण वेतनाच्या २० %)

८,०००
६,०००
८,०००
६,०००
२,८००
एकूण  १६,८००

 

ब) एकूण खेळते भांडवल (१ महिन्यासाठी) :

.क्र.तपशीलनगदरएकूण किंमत
.कच्चा माल व साहित्य२१,०००
.कर्मचारीवर्गावरील खर्च१६,८००
.देखभाल-दुरुस्ती६००
.मुलभूत सुविधा :
१.वीज
२.पाणी
 
२५० युनिट
 
८ रू. / युनिट
 
२,०००
३००
.प्रशासकीय खर्च१,५००
.जाहिरात१,०००
.जागा भाडे२,०००
.इतर खर्च२,०००
 एकूण   ४७.२००

 

८. भांडवलाची उभारणी :

.क्र.तपशीलरक्कम (रू).क्र.तपशीलरक्कम (रू)
.
.
स्थिर भांडवल
खेळते भांडवल
१,९४,०००
४७,२००
.
 
.
स्वताचे भागभांडवल
(२५ %)
अपेक्षित बँक कर्ज
(७५ %)
 
 
६०,३००
 
१,८०,९००
 एकूण,४१,२०० एकूण,४१,२००

 

९.नफा-तोटा पत्रक (वार्षिक) :

अ) एकूण उत्पन्न :

.क्र.उत्पन्नाच्या बाबीवार्षिक उत्पन्नाचा तपशीलएकूण उत्पन्न
.कागदी कापडाची विक्री
०.६० रू./ दराने दरमहा १,२५,००० नग =७५,०००
 
दरमहा ७५,००० रू.    १२ महिने
 
९,००,०००
 एकूण ९,००,०००

 

ब) एकुण खर्च रुपये (वार्षिक):

अ. क्र.तपशीलखर्च (रु.)
१.
२.
 
 
३.
४.
खेळते भांडवल
घसारा:
१) यंत्रसामग्री व साहित्य (२०%)
२) फर्निचर (१५%)
विमा
बँक कर्जावरील व्याज
५,६६,४००
 
३६,०००
१,५००
६,०००
२१,०००
एकुण६,३०,९००

 
क) निव्वळ उत्पन्न रूपये = स्थूल उत्पन्न – एकून खर्च – मुद्दल हप्ता
= ९,००,००० – ६,३०,९०० – ६४,५००
= २,०४,६०० रु.
१०. ना नफा – ना तोटा बिन्दू:
निश्चित खर्च x १००             ६,३०,९०० x १००
———————————  =  ————————————– = ७६%
निश्चित खर्च + नफा             ६,३०,९०० + २,०४,६००
 
 

January 11, 2018

0 responses on " कागदी पाकिटे उद्योग"

  Leave a Message

  Your email address will not be published.

  All Right Reserved.
  Call Now ButtonCall Now
  Translate »
  error: Content is protected !!