कागदी व कापडी पिशव्यामुळे मिळाला रोजगार….

कागदी व कापडी पिशव्यामुळे मिळाला रोजगार….
सध्या राज्यात प्लास्टिक बंदीचा निर्णय लागू करण्यात आल्यानंतर प्लास्टिक चा पर्याय म्हणून अनेक पर्याय पुढे  आल्याने महिलांना रोजागाच्या नवीन संधी निर्माण झाल्या आहेत.कॅरीबॅग ला पर्याय म्हणून अनेक प्रकारच्या कागदी व कापडी पिशव्यांच्या मागणीत प्रंचड वाढ झाली आहे.त्यामुळेच अनेक महिलांना रोजगाराची नवीन संधी चालून आली आहे.
अश्याच असंख्य महिलातून लोणावळ्यातील संयोगिता साबळे  या गृहिणी ने  प्लास्टिक बंदीनंतर कागदी व कापडी पिशव्यांच्या उद्योगात उडी घेतली.संयोगिता साबळे या एक अभियंता आहेत.त्यांनी या व्यवसायात आपला चांगला जम बसविला आहे.
प्लास्टिक बंदीनंतर त्यांनी सहज चावडी मध्ये कागदी पिशव्या बनविण्याचे प्रशिक्षण घेतले.त्यांनी खाकी कागद,कापडी पिशव्या बनविण्यास सुरवात केली.त्यांनी स्वतः सोशल मिडीयाच्या माध्यमातून मार्केटिंग चे तंत्र वापरले.
व त्याद्वारे कागदी व कापडी पिशव्यांचे ब्रॅडिंग सुरु केले.त्यांनी वर्तमानपत्राच्या कागदापासून बनवलेल्या पिशव्या,जाड खाकी कागदापासून बनवलेल्या पिशव्या,कापडापासून तयार केलेल्या पिशव्या अश्या पिशव्यांचे उत्पादन ते तयार करतात. त्यांच्याकडे कॅनव्हासची पिशवी,भेटवस्तू देण्यासाठी कागदी पिशवी,कापडांची पिशवी अश्या पिशव्यांना जास्त मागणी आहे.साबळे मॅडम यांनी या व्यासायामध्ये आपला चांगला जम बसविला आहे. बंदीला जरी विरोध असला तरी आम्हाला मात्र बंदीमुळे चांगला रोजगार मिळाला आहे असे त्यांनी सांगितले.
सुरुवातीच्या काळा मध्ये त्यांना थोड्याफार अडचणींचा समाना करावा लागला.तसेच चावडी ने त्यांना मार्केटिंग साठी खूप मदत केली आहे.त्यासाठी चावडी ने Advertise च्या माध्यमातून त्यांची मार्केटिंग केली आहे. सध्या बाजारात त्याच्या पिशव्यांची मागणी वाढत आहे.
हा व्यवसाय सुरु करण्यासाठी किंव्हा अधिक माहितीसाठी संपर्क करा 8830280315.
चावडी चे Affiliate बना,सोशल मिडिया वर मेसेज शेयर करा,अधिकचे उत्पन्न कमवा.अधिक माहितीसाठी या लिंक वर क्लिक करा.

March 17, 2020

0 responses on "कागदी व कापडी पिशव्यामुळे मिळाला रोजगार...."

    Leave a Message

    Your email address will not be published.

    All Right Reserved.
    Call Now ButtonCall Now
    Translate »