विविध फळांपासून तयार होणाऱ्या पदार्थांचे पॅकेजिंग….!

विविध फळांपासून तयार होणाऱ्या पदार्थांचे पॅकेजिंग….!
भारता मध्ये विविध फळाचे उत्पादन हे मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून येत. ही बहुतांशी फळे  ठराविक काळा मध्येच येत असल्यामुळे ते फळ टिकविण्यासाठी विविध प्रक्रियायुक्त पदार्थ तयार केले  जातात.  त्या पदार्थांची योग्य प्रकारे साठवणूक करून ते पदार्थ अधिक काळ टिकविण्यासाठी त्याला योग्य प्रकारची पॅकेजिंगची आवश्यकता असते. विविध फळावर योग्य प्रक्रिया करून त्या पासून प्रक्रियायुक्त जॅम, जेली, फळांचे रस,  फळांचे गर,  धुऊन व कापून ठेवलेली फळे,  जतन केलेली फळे,  केचप किंवा सॉस,  घट्ट रस यासारखे विविध पदार्थ मोठया प्रमाणात तयार केले जातात व हे पदार्थ अधिक काळ टिकविण्यासाठी त्या पदार्थांच्या पॅकिंगचा दर्जा उत्कृष्ट असावा लागतो. तसेच  त्यांचा साठवण्याचा कालावधी अधिक असावा.
फळांपासून विविध पदार्थ तयार केले जातात. तसेच हे पदार्थ तयार झाल्यानंतर ते पदार्थ विक्रीसाठी पाठविण्यासाठी त्यांचे विविध आकारामध्ये त्यांचे पॅकिंजिंग हे केले जात असते. पुढील प्रमाणे आपणांस पॅकेजिंगचे पदार्थ पाहाण्यास मिळत असतात.
1) जॅम :-
फळापासून मोठ्या प्रमाणात जॅम तयार केला जातो. हा जॅम पॅक करण्यासाठी प्रामुख्याने विविध आकाराच्या काचेच्या बाटल्या, प्लॅस्टिक थर्मोफॉर्म कंटेनर, पत्र्याचे डबे (मेटल कॅन), लॅमिनेटेड पाऊच यांचा वापर केला जातो. या गोष्टींचा वापर केल्यास पॅकेजिंग अधिक चांगले व आकर्षक दिसते. तसेच ते अधिक काळसुध्दा टिकू शकते.

 
2) जेली  :-
हे पॅक करण्यासाठी जॅमप्रमाणेच पॅकेजिंगचा वापर केला जातो. त्या सोबत एलडीपीईचे मोल्डेड कंटेनर किंवा दाबता येणाऱ्या ट्यूबचा उपयोग केला जातो.   अर्थात, पॅकेजिंगचा प्रकार कोणताही असो, त्यावर उत्पादनाच्या नावासोबतच विविध बाबींची माहिती नियमानुसार असणे आवश्‍यक असते.

3) फळांचे रस :-
फळांच्या रसांच्या पॅकेजिंगसाठी काचेच्या बाटल्या, प्लॅस्टिकच्या बाटल्या  (पेट बाटल्या, एलडीपीई बाटल्या व पॉलिप्रोपेलिन बाटल्या) वापरल्या जातात. हल्ली ब्रिक पॅकिंग व कंपोझिट पेपरद्वारा निर्मित कंटेनरचाही वापर होतो.  हे रस कार्बनडाय ऑक्‍साईडच्या संपर्कात असतील तर काचेच्या बाटल्या किंवा पेट बाटल्या वापरणे आवश्‍यक असेल. पूर्वी फळांचे रस धातूच्या कॅनमध्ये उपलब्ध होते. आता प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा वापर वाढत आहे.

4) फळांचे गर :-
विविध फळांच्या गराचाही व्यापार मोठा आहे. यामध्ये आंबा, केळी वगैरे फळांचे गर धातूच्या कॅनमध्ये किंवा काचेच्या हवाबंद बाटल्यामध्ये उपलब्ध आहेत. फळांच्या गरांचे पॅकिंग करताना पुढील गोष्टींचा विचार करणे आवश्‍यक आहे. कालावधीनुसार फळांच्या गरामध्ये विविध प्रक्रिया सुरू होतात.

1) साठवण काळ
2) ऑक्‍सिडायझेशन
3) आंबवण प्रक्रिया (फर्मंटेशन)
4) कुजणे
5) रासायनिक बदल.
या प्रक्रियामुळे गर खराब होतो. या प्रक्रिया थांबविण्यासाठी किंवा त्याचा वेग कमी करण्यासाठी काही विशिष्ट प्रकारचे वायू वापरावे लागतात किंवा हवाबंद पॅकिंग करावे लागतात.
3) धुऊन व कापून ठेवलेली फळे –
हल्लीच्या धावपळीच्या युगामध्ये धुऊन कापून खाण्यासाठी तयार फळांना मागणी वाढत आहे. या प्रकारच्या उत्पादनासाठी खालील बाबींचा विचार करणे योग्य ठरेल.

1) फळांची नैसर्गिक पिकवण प्रक्रिया.
2) कापलेल्या फळांमधून ठिबकणारा रस
3) कापलेली फळे काळे पडण्याची वेळ.
शक्‍यतो या प्रकारच्या उत्पादनाचा साठवण कालावधी हा अत्यंत कमी असतो. परिणामी पॅकेजिंगही अल्पजीवी असतात. त्यासाठी प्रामुख्याने खालील प्रकारचे पॅकेजिंग वापरले जाते.
1) पॉलिस्टराईन फोम्ड्‌ ट्रे
2) थर्मोफॉर्मड ट्रे
3) मोल्डेड ट्रे
या पॅकेजिंगवर क्‍लिंक फिल्मचे आवरण असते. याला कुठल्याही प्रकारचे सिलिंग करता येत नाही. अशा प्रकारचे पॅक उच्च श्रेणीची हॉटेल, सुपर मॉल, विमानामध्ये मिळतात.
4) विविध रसांत किंवा अर्कमध्ये ठेवलेली फळे  :-
यासाठी पॅकिंग म्हणून मुख्यत्वे काचेच्या बाटल्या व टिन बाटलीचा वापर केला जातो. टिकाऊ पॅकेजिंगमध्ये रसातील फळे किमान एक वर्ष टिकू शकतात. या प्रकारचे पॅकिंग प्रामुख्याने निर्यातीसाठी वापरले जाते.

5)   केचप टॉमेटो सॉस तत्सम घटक पदार्थ  :-
                     अशा प्रकारचे रस गरम असतानाच पॅक केले जातात, त्यामुळे त्यांच्या पॅकेजिंग घटकांच्या वापरावर विविध मर्यादा असतात. हे मुख्यत्वे काचेच्या किंवा धातूच्या बाटल्या व विशिष्ट रचनेच्या रिटॉर्ड पाऊचमध्येच पॅक केले जातात.
या प्रकारे पॅक करण्यासाठी लागणारी यंत्रसामग्री भारतात उपलब्ध आहेत. त्याच प्रमाणे हातानेही पॅकिंगचे काम केले जाऊ शकते.
वरील सर्व पॅकिंग करता त्याचा साठवण काळ वाढवण्यासाठी प्रक्रिया तंत्रामध्ये सुधारणा करणे आवश्‍यक आहे.

 
 

January 9, 2017

1 responses on "विविध फळांपासून तयार होणाऱ्या पदार्थांचे पॅकेजिंग....!"

  1. Intresed

Leave a Message

Your email address will not be published.

All Right Reserved.
Call Now ButtonCall Now
Translate »