प्रक्रियायुक्त पदार्थांसाठी पॅकेजिंग……..!!!!

प्रक्रियायुक्त पदार्थांसाठी पॅकेजिंग……..!!!!
प्रक्रिया केलेले पदार्थ म्हणजे जॅम, जेली, केचप, लोणची, शिजविलेले कडधान्य, मोरंबा, अळिंबी, शिजविलेले मांस, वेफर्स, फरसाण अशा अनेक बाबींचा समावेश होतो. या पदार्थांच्या पॅकेजिंगसाठी त्यातील विविध घटकांच्या वापरानुसार नियोजन करावे लागते.
प्रक्रियायुक्त पदार्थांच्या पॅकेजिंगची निवड करतेवेळी खालील बाबींचा विचार करणे आवश्यक आहे.
१) प्रक्रिया
२) पदार्थातील घटक पदार्थांचे परिणाम
३) काही विशिष्ट वायूंचा परिणाम
४) त्याचा साठवण कालावधी
५) टिकवणक्षमता वाढवण्याचे घटक (टिकाऊ घटक)
६) अन्य समावेशीत घटक (ॲडिटिव्ह)
७) वायू
८) हवाबंद (व्हॅक्युम) पॅकिंग
९) यंत्रसामुग्री
१०) त्या पदार्थाचा ग्राहक किंवा बाजारपेठ

पदार्थ :- दुग्धजन्य पदार्थ, बेकरी उत्पादने, रेडी टू इट उत्पादने.

१) प्रक्रिया :-
पदार्थावर आपण करत असलेली प्रक्रिया व त्याचा पॅकिंगच्या वेळी होणारा परिणाम विचारात घेतला पाहिजे.

 
A) त्यात तेल असेल तर त्या तेलाचे परिणाम.
B) त्यातील मसाल्याचे दूरगामी परिणाम.
C) त्यात असलेल्या इतर पिष्टमय घटकांचे परिणाम.
D) पाण्याचा अंश.
E) त्यातील रासायनिक घटक (सामू).
F) आर्द्रता साचण्याचा काळ.
G) जीवाणूविरहीत वातावरण.
२) घटक पदार्थांचे परिणाम :-
प्रक्रिया केलेले पदार्थ पॅक करताना, त्यातील घटक पदार्थ कसे राहतात किंवा त्यात जे बदल होतात, त्यांचा विचार करणे महत्त्वाचे आहे.  घटकांचे विपरित परिणाम टाळण्यासाठी काही विशिष्ट प्रकारचे पॅकिंग करणे आवश्यक ठरेल. त्याचा साठवण काळ लक्षात घ्यावा. तसेच पदार्थाची बाजारपेठ व अंतिम ग्राहकांचा विचार करावा.

३) काही विशिष्ट वायूंचा परिणाम :-
प्रक्रिया केलेल्या पदार्थातून साधारणपणे काही वायू सोडले जातात. त्याचा साठवण कालावधीवर परिणाम होतो. त्यामुळे पदार्थातील घटकांच्या रासायनिक मूलद्रव्यांचा विचार करावा. त्यानुसार पॅकेजिंग ठरवावे लागते.

४) साठवण कालावधी :-
पदार्थांच्या साठवण कालावधीनुसार पॅकेजिंगचे मटेरियल व यंत्रसामुग्रीचा वापर करावा लागतो. तसेच पदार्थात काही समावेशीत घटकांचा (additives) किंवा गॅसेसचा वापर करावा लागेल. तसेच हवारहित पॅकेजिंगचाही एक एक पर्याय असू शकेल. त्याचप्रमाणे घटक त्यांचे सर्वसाधारण आयुष्य व पुढील टिकवण क्षमतांचा विचार करावा लागेल. साठवण कालावधीचा विचार करताना विषारी घटकांचे प्रमाण लागेल व अंतिम साठवण तारीखचा विचार करावाच लागेल.
 

५) साठवण काळ वाढविणारे घटक :-
साठवण कालावधी वाढवण्यासाठी विशिष्ट प्रिझर्व्हेटिव्ह वापराने लागतात. प्रिझर्व्हेटिव्हचे दूरगामी परिणाम किंवा सरकारी नियम विचारात घ्यावे लागतात. प्रिझर्व्हेटिव्हचा विचार पॅकेजिंग मटेरियल व यंत्रसामुग्री निवडताना करावा लागतो.

६) अन्य समावेशीत घटक (ॲडिटिव्ह) :-
प्रिझर्व्हेटिव्ह प्रमाणे ॲडिटिव्ह घटकांचाही वापर प्रक्रियायुक्त पदार्थामध्ये करावा लागतो. या घटकाचे रासायनिक गुणधर्म व सामू यांचा परिणाम पॅकेजिंगच्या घटकांवर होत असतो.
७) वायू :-
विविध वायूंच्या वापरामुळे पदार्थांचा ताजेपणा व कुरकुरीतपणा जपता येतो. तसेच पदार्थातून बाहेर पडणाऱ्या वायूंचा प्रभाव रोखता येतो. ह्याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे कुरकुरे हे उत्पादन होय. यासाठी विशिष्ट प्रकारची यंत्रसामुग्री वापरणे बंधनकारक राहील. त्याचप्रमाणे पॅकेजिंग घटकांचे आरेखन करावे लागते.

८) हवाबंद (व्हॅक्यूम) पॅकिंग  :-
या प्रकारच्या पॅकिंगमुळे आतील हवा किंवा बाहेरील हवा एकमेकांत मिसळत नाही. त्यामुळे बाह्य घटकांचा परिणाम होत नाही. तसेच जीवाणूंची वाढ रोखता येते.   सर्वसाधारणपणे कॅनिंगमध्ये हवाबंद पॅकिंगचा अवलंब होतो. तसेच प्लॅस्टिकमध्येही विविध फिल्मच्या एकत्रिकरणातून पॅकेजिंग तयार करता येते.

 
९) यंत्रसामुग्री :-
पॅकेजिंगसाठी विविध यंत्रसामुग्रीचा परिचय आपण मागे करून घेतला आहे.

A) तयार पदार्थांचे पॅकेजिंगसाठी यंत्रसामुग्री निवडताना आपल्याकडील सर्व तयार खाद्यपदार्थांचे पॅकिंग शक्य होईल, याचा विचार करावा.
B) ग्राहकांच्या मागणीसार
C) आवश्यक साठवण कालावधी.
D) त्यातील सोयींचा विचार करावा.
E) यंत्रसामुग्री ठेवण्याची जागा स्वच्छ व कायदेशीर बाबींचा विचार करून मगच ठरवावी.
F) विशिष्ट पॅकिंग यंत्रे.
१०) ग्राहक/ बाजारपेठ :-
आपण तयार पदार्थ पॅकिंगवेळी आपल्या बाजारपेठेचा अंदाज असणे आवश्यक असते. आपल्या गिऱ्हाईकाची मागणी व आवश्यक बाबींचा विचार करावा. तसेच मालाच्या सुरक्षितता पाहावी.

पदार्थानुसार पॅकेजिंग :-
१) दुग्धजन्य पदार्थ :-
दुग्धजन्य पदार्थ ह्यात चीज, पनीर, श्रीखंड, दही तत्सम पदार्थ येतात. हे पॅकिंग करताना ग्राहक, यंत्रसामुग्री ह्या दोन बाबींचा विचार करावा.
१) वजन, २) हाताळणी, ३) साठवण, ४) वाहतूक ह्यानुसार पॅकेजिंग डिझाईन करता येते. त्याचप्रमाणे कायदेशीर बाबी व साठवण काळ ह्याचे नियम लागू राहतील. प्लॅस्टिक कंटेनर, प्लॅस्टिक फिल्म, ॲल्युमिनिअम फिल्मचा वापर केला जातो.

२) बेकरी उत्पादने :-
यांच्या पॅकेजिंगसाठी माणसाकरवी हाताळणी व यंत्राद्वारे पॅकिंग असे दोन्ही प्रकार उपलब्ध आहेत. ह्यात एफएफसी यंत्राचा वापर करता येतो.   पॅकेजिंग घटकामध्ये सर्वसाधारणपणे प्लॅस्टिक फिल्मचा वापर जास्त होतो. पदार्थातील रासायनिक घटक व फॅटीॲसिडचा दूरगामी परिणाम विचारात घ्यावा लागेल.

३) रिटोर्ट पाऊच :-
तयार पदार्थामध्ये रिटॉर्ट पाऊचचा वापर अधिक होतो. हे सर्वसाधारणपणे हॉट फिल गटात मोडतात.

February 11, 2017

0 responses on "प्रक्रियायुक्त पदार्थांसाठी पॅकेजिंग........!!!!"

  Leave a Message

  Your email address will not be published.

  All Right Reserved.
  Call Now ButtonCall Now
  Translate »
  error: Content is protected !!