• No products in the cart.

आता मुद्रा योजने अंतर्गत कृषी व्यवसायिकांना सुध्दा मिळणार कर्ज………

       आता मुद्रा योजने अंतर्गत कृषी व्यवसायिकांना सुध्दा मिळणार कर्ज………

‘ वाढवा तुमचा व्यवसाय मुद्रा लोन समवेत ’ या अंतर्गत, अकृषी क्षेत्रात तसेच छोटया व्यवसायाव्यतिरिक्त आता डेअरी उदयोग, मत्स्यपालन, कुक्कुटपालन, मधमाशीपालन, रेशीम उदयोग इत्यादी करिता मुद्रा लोन उपलब्ध होणार आहे.

          देशातील लघु उद्योगांना सहज कर्ज पुरवठा व्हावा,  या उद्देशाने  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ एप्रिल २०१५ रोजी  २०,००० करोड रुपये भांडवल असलेली ‘मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँन्ड रिफायनान्स एजन्सी’  अर्थात मुद्रा बँक व मुद्रा योजनेचे  उद्घाटन केले.

                या योजने अंतर्गत विविध  बँकेतून लघु उद्योजकांना १० लाखांपर्यंतचं कर्ज सहज उपलब्ध होणार आहे. यासाठी सरकारने एकूण २०  हजार कोटींची तरतूद केली असून या बँकेच्या माध्यमातून लघु उद्योग तसेच अकृषी उदयोगांना कर्ज देण्यासाठी ही योजना सुरु करण्यात येत आहे.

        पंतप्रधान मोदी यांनी देशाची अर्थ व्यवस्था अधिक मजबूत बनविण्यासाठी सध्या विविध पावले उचली आहे. आता मुद्रा योजने अंतर्गत कृषी व्यवसायासाठी  कर्ज मिळणार आहे. या योजनेचा उद्देश प्रामुख्याने देशात नवीन उदयोग तयार झाल्यास देशात मोठया प्रमाणात रोजगार निर्मिती होईल.

        या योजने मध्ये शिशू लोन ५०,००० हजारा पर्यंत, किशोर लोन ५०,००० ते ५ लाखांपर्यंत  तर तरूण लोन ५ लाखांपासून ते १० लाखापर्यंत  कर्ज मिळणार  आहे. या योजनेचा लाभ भारतामधील कोणताही नागरिक घेऊ शकतो. त्या व्यक्तीचा स्वत:चा किंवा कृषी मधील भागीदारी व्यवसायिक असल्याचा पुरावा कागदपत्रे सादर करून तो व्यक्ती योजनेचा लाभ घेऊ शकतो.

13680839_1008014779317776_4817820143548848472_n

 • मुद्रा बँक योजना

मुद्रा बँकेद्वारे छोट्या कारखानदारांना आणि दुकानदारांना कर्ज मिळते. आता अकृषी क्षेत्रातील मत्स्यपालन, कुक्कुटपालन, मधमाशीपाल इत्यादी सह विविध उदयोगांना  लोन उपलब्ध होणार आहे. त्याच बरोबर भाजीवाले, सलून, फेरीवाले, चहाचे दुकानदार यांनाही लोन दिले जाणार आहे.

       मुद्रा बँक हि रिझव्‍‌र्ह बँकेच्या नियंत्रणाखाली काम करते. मुद्रा ही संस्था मुख्यत: लघु उद्योगांना तसेच शेतीविषयक विविध उदयोगांना कर्ज पुरवठा करते.  या योजनेत व्याजाचा दर कमी असतो. कर्ज मंजूर झाले की त्यानंतर कर्जदाराला “मुद्रा कार्ड” दिले जाते. जे की क्रेडीट कार्ड सारखे असेल आणि जेवढे कर्ज मंजूर झाले आहे.  जशी त्याला गरज असेल. तेव्हा तो व्यक्ती आपल्या कार्ड मधून रक्कम  काढू शकतो.

 • मुद्रा बँकेतून कर्ज घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे

१.    शैक्षणिक कागदपत्रे.

२.    दोन फोटो.

३.    उदयोगा संबधी सार्टिफिकेट

४.    उदयोगाची माहिती असणारी कागदपत्रे.

         मुद्रा योजनेसाठी देशात मुद्रा बॅंकेची स्थापना केली आहे. या सोबत मुद्रा कार्डची योजना सुरु झाली आहे. देशामधील सर्वात मोठी असलेली भारतीय स्टेट बँक अर्तंगत मुद्रा लोन सुध्दा दिले जात आहे.

 • या उदयोगासाठी मिळणार आता मुद्रा लोन –

१.    डेअरी उदयोग

२.    मत्स्यपालन

३.    कुक्कुटपालन

४.    मधमाशीपालन

५.    रेशीम उदयोग

६.    शेळीपालन

७.    दाळ मिल

लोनची वैशिष्ट्ये –

 • या लोनकरिता (No Dues Certificate) अनिवार्य नाही, कारण लोन क्रेडिट ब्युरोच्या रिपोर्टवर आधारित असेल.
 • रूपये १० लाखांपर्यंतच्या लोनवर योग्य व्याजदर मिळवा, कोणत्याही कोलॅटरल (जमानात) अनिवार्य नाही.
 • केवळ काढल्या गेलेल्या पैशांवरच व्याजदर दया.
 • लोन सोप्या हप्यात योग्य कालावधीतच चुकते करा.
 • मुद्रा कार्डने कोणत्याही एटीएममधून पैसे काढण्याची मुभा
 • मुद्रा कार्डने पी.ओ.एस. / ई कॉमर्स माध्यमातून खरेदी करण्याची सुविधा.

         या योजनेचा लाभ घेण्यासाठी Chawadi Training & Business Consultancy ने  विविध उदयोगासाठी मार्गदर्शन केंद्र सुरु केले आहे.

अधिक माहितीसाठी

चावडी,

बिझनेस कन्सल्टन्सी अँन्ड ट्रेनिंग इन्स्टीट्युट

अहमदनगर

मोबाईल – 7249856424

November 4, 2020

12 responses on "आता मुद्रा योजने अंतर्गत कृषी व्यवसायिकांना सुध्दा मिळणार कर्ज………"

 1. sir
  I have started seed processing plant at aurangabad. But now we have requirment of working capital. So please anyboudy guide me for mudra loan.
  Please suggest me on. 8390994742
  Thanks
  Ramhari Narwade

 2. How to start water plant

 3. Thanks for the information please Gide me

 4. विजय दाभाडेNovember 24, 2017 at 9:13 pm

  मी कुक्कुट पालन करतो मला मुद्रा लोन मिळवता येईल का? मला तुमची माहिती आवडली खूप छान आहे

 5. Medical Agency holesale Sathi Mudralanay loan Ashe ka?

 6. sanjay wagh kuruduwadi tal madha dis solapurJanuary 13, 2018 at 8:13 pm

  Mala shelipalan sathi loan pahiji mahitee milavi

 7. Sir
  I was start Krishi seva Kendra
  So please inform me
  How can apply loan

 8. Comment
  सर मला गांडूळ खत निर्मिती प्रकल्प करायचा आहे,मुद्रा योजनेतून करता येईल काय?

 9. सागर आंधळेMay 5, 2018 at 12:27 pm

  मला पौल्ट्री फार्म करायचे आहे मला कुठली बँक कर्ज देइल आणि त्यासाठी मला कोणकोणते कागदपत्रे द्यावा लागतील योग्य माहिती द्या

 10. दिलीप हरयाणMay 9, 2018 at 11:54 am

  मला कुकुटपालन व्यवसाय करायचा आहे मुद्रा लोन मिळेल का मी गोव्हमेन्ट कोर्स केलेला आहे प्रमाणपत्र आहे स्वतःची जागा आहे कृपया सहकार्य करावे

 11. मृणाल हरयाणMay 9, 2018 at 11:59 am

  मी ब्युटी पार्लर चा कोर्स केला आहे मला मुद्रा लोन मिळेल का गव्हमेंट कोर्स केला आहे प्रमाणपत्र आहे अनुभव आहे कृपया मला माहिती देऊन सहकार्य करावे

Leave a Message

Contact Details

Contact No: +917272971971
Comany Name : Chawadi Training and Consultancy Pvt. Ltd.
Adress: First Floor, Radha House Building, Tapovan Rd, Nirmal Nagar, near Laxmi nagar kaman, Savedi, Tal. Nagar, Dist- Ahilyanagar 414003, maharashtra ,India
top
All Right Reserved.