राष्ट्रीय कृषी विमा योजना……!

राष्ट्रीय कृषी विमा योजना……!
सर्वंकष पीक विमा योजनेची पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांपुरते मर्यादित स्वरूप बदलून कर्जदार तसेच बिगर कर्जदार अशा सर्वच शेतकऱ्यांना सहभागी करून घेणारी राष्ट्रीय कृषी विमा योजना ही सुधारित स्वरूपात सन १९९९-२००० च्या रब्बी हंगामापासून राज्यात राबविण्यात येत आहे. यामध्ये विमा सरंक्षित रकमेवरील मर्यादा रद्द होऊन पेरणी केलेल्या संपर्ण क्षेत्राला विमा संरक्षण देण्याची तरतून या राष्ट्रीय विमा योजने करून देण्यात आली आहे. राष्ट्रीय कृषी विमा योजने अंतर्गत गेल्या दोन वर्षात ३० लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांना ८४८ कोटींच पेक्षा जास्त प्रमाणात नुकसानभरपाई अदां करण्यात आलेली आहे.
प्रमुख उद्देश –

 • नैसर्गिक आपत्तीमध्ये तसेच कीड व रोगराईचा प्रादुर्भाव झाल्यास शेतकऱ्यांना सदरील योजनेच्या माध्यामातून आर्थिक मदत देणे.
 • शेतकऱ्यांना शेतामध्ये प्रगत तंत्रज्ञान तसेच योग्य त्या निविष्ठा वापरण्यास प्रोत्साहित करणे.
 • आपत्तीसमयी शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्यामध्ये मदत करणे.

 
योजनेत भाग घेण्यासाठी पात्र शेतकरी –

 • योजनेमये कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना भाग घेता येतो.
 • राष्ट्रीय कृषी विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांकरिता खातेदारांच्या व्यतिरिक्त कुळांसाठी सुध्दा ही योजना खुली ठेवण्यात आलेली आहे.

योजनेची वैशिष्ट्ये –

 • नवीन पिकांचा समावेश करून योजनेची व्याप्ती वाढवलेली आहे. ऊस, मूग, उडीद, कापूस, मका व कांदा पिकांचा समावेश नव्याने करण्यात आलेला आहे.
 • विमा संरक्षित रकमेवरील मर्यादा काढून टाकलेली आहे.
 • विमा संरक्षित रकमेची व्याप्ती वाढून त्यांची सांगड सरासरी उत्पत्र व किमान आधारभूत किमतीशी घालण्यात आलेली आहे. त्यामुळे प्रति हेक्टरी पीक कर्जदाराचे विमा संरक्षित रकमेवरील बंधन आपोआप नाहीसे होते.
 • शेतकऱ्यांना सर्वसाधारण जादा पीक संरक्षित रक्कम (सरासरी) उत्पत्राच्या १५० टक्क्यांपर्यंत विमा उपलब्ध असतो.
 • विविध पिकांचे राजस्व मंडळनिहाय उंबरठा उत्पत्र जोखीमस्तर विचारात घेऊन निश्चित करण्यात येते.
 • अलप व अत्यल्प भूधारकांसाठी पीक विमा हप्ता रकमेत १० टक्के अनुदान आहे.

योजनेत समाविष्ट पीके –

 • तृणधान्य – भात, खरीप व रब्बी, ज्वारी, बाजरी, नाचणी, मका, गहू
 • कडधान्य – तूर, उडीद, मूग, हरभरा
 • गळीतधान्य – भुईमूग, सोयाबीन, सूर्यफूल, तीळ, कारळे, उन्हाळी भुईमूग
 • व्यापारी पिके – ऊस, कापूस, कांदा

पीक विमा  संरक्षित रकमेचे प्रमाण –
योजनेमध्ये विमा संरक्षित रकमेवर कोणत्याही प्रकारची मर्यादा दिलेली नाही. संबंधित शेतकरी त्याच्याकडे असलेल्या जमिनीच्या क्षेत्राच्या आधारे विमा संरक्षण घेऊ शकतो. प्रति हेक्टरी किमान विमा संरक्षण हे सरासरी उत्पन्नाच्या ६० टक्के किंवा ८० टक्के या गुणिले किमान आधारभूत किंमतीवर आधारित असून ३/५ वर्षांचे सरासरी उत्पन्न गुणिले किमान आधारभूत किंमत यांच्यापेक्षा १५० टक्क्यांपर्यँत रकमेवर कमाल विमा संरक्षण घेता येईल. क्षेत्राची व रकमेची मर्यादा नाही. अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या कृषी अधिकऱ्यांशी संपर्क साधवा

January 20, 2017

0 responses on "राष्ट्रीय कृषी विमा योजना......!"

  Leave a Message

  Your email address will not be published.

  All Right Reserved.
  Call Now ButtonCall Now
  Translate »