मशरुम उद्योग….!!!!

मशरुम उद्योग….!!!!
मशरुम शहरातील हॉटेल्समध्ये अत्यंत महागड्या डिशच्या स्वरूपात मिळतो. आधुनिक पध्दतीने मशरूमचे उत्पादन आपल्याला घेता येते. व्यापारी तत्वावर जर मशरुमचे उत्पादन घेतले तर कमीत कमी भांडवलात, कमीत कमी जागेत, चांगल्या नियोजनाने चांगला नफा मिळवता येतो. शहरातील लोकांच्या कडुन, हॉटेल व्यवसायिकांकडुन मशरूमला चांगली मागणी आहे. ग्रामीण भागातून मशरूमला महाग असलेने तशी मागणी कमी असते. मशरुमला ग्रामीण भाषेत आळींबी या नावाने ओळखतात. फारच थोडे लोक यांचे उत्पादन करतात व मागणी मात्र जास्त असलेने व्यवसायात तशी स्पर्धा कमी आहे. उत्पादित मालाला उत्पादन पूर्ण होण्या अगोदरच मागणी बुकींग स्वरूपात असतो. छोट्याशा भांडवलात, कमी जागोत, चांगल्या नियोजनाने नव उद्योजकांना चांगले उत्पन्न मिळवून देणारा व्यवसाय म्हणजे मशरुम उद्योग होय.
 

 
मशरुम उद्योग म्हणजे काय ?  
मशरूम  म्हणजे बुरशी प्रकारातील एक वनस्पती  किंवा बुरशीवर्गीय भाजी आहे. जगभरात सुमारे १७ ते १८ हजार प्रकार आहेत. मात्र खाण्यासाठी बटन मशरूम, ऑइस्टर, मिल्की या तीन प्रकारांना सर्वाधिक मागणी आहे. उर्वरित प्रकाराचे मशरूम औषध तयार करण्यासाठी त्यांचा वापर केला जातो. मशरूमला मराठीत ‘आळिंबी’ असे सुध्दा म्हटले जाते. पावसाळ्यात निसर्गात मशरूम मोठ्या प्रमाणात आढळतो. अनेक गावांमध्ये विशेष करून ग्रामीण भागात कुत्र्याची छत्री,  भूछत्र, तेकोडे, धिंगरी या नावाने  मशरूमची ओळखली झालेली आहे. मशरूम तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल म्हणजे शेतीत ज्याला टाकाऊ पदार्थ म्हणून ओळखले जाते. अशी सोयाबीन व गव्हाची गुळी, शिवाय साखर कारखान्यात शिल्लक राहिलेला उसाचा चोथा याला या उद्योगात सर्वाधिक महत्त्व आहे. २५ दिवसात या कच्च्या मालाचे खत तयार केले जाते. त्यात कोंबडीची विष्ठा, जिप्सम, डिओसी मिसळून त्यानंतर मशरूमचे उत्पादन मिळण्यासाठी ५० दिवसांचा कालावधी लागतो. पुढील १५ ते २० दिवस हे उत्पादन विक्रीस उपलब्ध होते.

 

                                   मशरूमचे प्रकार  

१.  शिंपला मशरूम (धिंगरी मशरूम) :-

 
नैसर्गिक वातावरणात (तापमान २० अंश ते ३० अंश सेल्सिअस व आद्रता ८०-८५टक्के) या मशरूमची लागवड ८-१० महिने करता येते. संपूर्ण भारतात या मशरूमची लागवड करतात. धिंगरी मशरूमची लागवड बटन मशरूमपेक्षा अल्पखर्चिक व किफायतशीर आहे. अत्यंत अल्प जागेत अधिक पैसे खर्च न करता उत्तम उत्पन्न देणारी जात म्हणून शिंपला मशरूमचा उल्लेख केला जातो.धिंगरी मशरूमच्या उत्त्पन्नाकरिता अल्प पाणी लागते. ही अत्यंत महत्वाची बाब आहे. २०० लि. पाणी असतानासुद्धा आपण धिंगरी आळंबीचे उत्पादन आपण घेऊ शकतो.
 
२.  बटन मशरूम :-
 

 
                               बटन मशरूमची लागवड मोठ्या प्रमाणात हिमाचल प्रदेश, आसाम, पंजाब या प्रदेशात केली जाते. बटन मशरूमची लागवड कंपोस्ट खतांवर होते. दीर्घ मुदतीची पध्दत (२६-२८ दिवस) किंवा कमी मुदतीच्या पध्दतीने (१६ ते १८ दिवस) कंपोस्ट तयार केले जाते. ते पिशव्यांमध्ये भरून त्यांचे निर्जंतुकीकरण केले जाते. कंपोस्टच्या वजनाच्या ५ टक्के ते १० टक्के या प्रमाणात बी पेरले जाते. १२-१५ दिवसाने बुरशीची वाढ झाल्यावर दीड इंच जाडीचा कंपोस्ट खात, माती, वाळू यांच्या निर्जंतुक मिश्रणाचा थर द्यावा लागतो व  उत्पादनाकरिता तापमान १२ अंश सेल्सिअस लागते.
 
 बाजारपेठ :-
तयार मशरुमचा दर बाजारात सातशे ते एक हजार किलोप्रमाणे आहे. हॉटेल, उपहारगृह, तारांकित हॉटेलस्, मॉलस्, सुपर मार्केट आदी सह विविध दुकानामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असते. तसेच आपण मशरूमची विविध आकरात आकर्षक पॅकिंग करून आपण मालाची विक्री करू शकतो. कारण उत्पादन कमी व मागण जास्त असल्याने मशरुमला मोठ्     या प्रमाणात सर्वत्र मागणी असते. व या उद्योगास कोणत्याही प्रकारची जाहिरात करावी लागत नाही.
 

 
प्रकल्प विषयक :-  
हा व्यवसाय आपल्याला लघु स्वरूपात करायाचा असेल तर १५ ते ३० हजारा रूपये खर्च येते. तसेच हा उद्योग मोठ्या प्रमाणात केला, तर अदांजे  २ ते ३ लाख रूपये खर्च येते. उद्योग सुरु झाल्यावर खर्च कमी अधिक प्रमाणात होतो. या उद्योगास बँक आपली पत पाहून पाहून कर्ज पुरवठा करतो. मशरुम उद्योगस मोठ्या प्रमाणात विविध अनुदान उपलब्ध असून आपल्याला त्याचा लाभ घेता येतो. हा उद्योग सुरु केल्यास आपणांस चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळू शकते.
 

मार्गदर्शन :- 
मशरूम उद्योगा विषयक मार्गदर्शन व प्रशिक्षण कार्यक्रम चावडी तर्फे आयोजित केले आहे.  या कार्यक्रमात मशरूमचे उत्पादन कसे घ्यावे, प्रकार, लागवड, संधी, मागणी, बाजारपेठे आदि सह.विविध माहिती दिली जाणार आहे. तसेच भांडवल उभारणी, शासकीय योजना व बँक कर्ज, अनुदान विषयक माहिती चावडी तर्फे दिली जाणार आहेत. या प्रशिक्षणामध्ये विविध यशस्वी उद्योजकांना भेटण्याची संधी व त्यांनी हा उद्योग कसा उभारला यांची माहिती आपल्याला मिळणार आहे.

अधिक माहितीसाठी  खाली दिलेल्या ग्रीन बटनावर क्लिक करा किंवा थेट कॉल करा .

 
 
 
 

February 16, 2017

1 responses on "मशरुम उद्योग....!!!!"

  1. Nice planig business

Leave a Message

Your email address will not be published.

All Right Reserved.
Call Now ButtonCall Now
Translate »