पॅकेजिंग निर्मितीपासून हवाबंद करण्याची यंत्रे…

पॅकेजिंग निर्मितीपासून हवाबंद करण्याची यंत्रे…
विविध पदार्थांच्या पॅकेजिंगसाठी पॅकेजिंग तयार करणे, भरणे व हवाबंद करणे ही तिन्ही कामे एकत्रित करणाऱ्या यंत्राचा वापर केला जातो. या प्रकारच्या पॅकेजिंगविषयी माहिती घेऊ.  पॅकेजिंग निर्मिती, भरणे व हवाबंद करणे (फॉर्म, फिल, सील) या एकाच यंत्रामध्ये पॅकेजिंगचे योग्य आकाराचे पाऊच तयार करणे, उत्पादन त्यात भरणे व ते हवाबंद करणे अशी पॅकेजिंगची तीनही कामे होतात. यामध्ये खालील प्रकार उपलब्ध आहेत.

१) लवचिक पॅकेज (फ्लेक्‍झिबल पॅकेजिंग)
२) घन पॅकेज (रीजीड पॅकेजिंग)
३) बाटल्या भरणे (पेट बॉटल फिलिंग)
४) हवाबंद पॅकेज (व्हॅक्‍यूम पॅक)
या मध्ये २ ग्रॅमपासून ५ किलोपर्यंत विविध आकार, वजन व मापाचे पाऊच तयार व हवाबंद केले जातात.
 


लागणारे साहित्य :-

१) फ्लेक्‍सिबल पॅकेजिंग :- या प्रकारात फिल्म हा एक प्रमुख कच्चा माल वापरला जातो. यामध्ये फिल्म एका विशिष्ठ पद्धतीने दुमडली जाते. त्याचा योग्य आकार बनतो. पुढे त्यात स्वयंचलित फिलिंग पद्धतीने माल भरला जातो. माल भरण्यासाठी मापन (व्हॉल्युमेट्रीक) पद्धती व गुरुत्वाकर्षण पद्धतीचा वापर केला जातो.
अ) मापन पद्धतीमध्ये द्रव्य पदार्थ व घन पदार्थ या दोहोंसाठी वेगवेगळे प्रकार उपलब्ध आहेत. त्यांचे माप २ ग्रॅम किंवा २ मि.लि. पासून ५ किलो किंवा लिटरपर्यंत उपलब्ध आहेत.
ब) गुरुत्वाकर्षण पद्धतीमध्ये द्रव व घन पदार्थांसाठी वेगवेगळे फिलर असतात. या प्रकारच्या पॅकेजिंगमध्ये वेगवेगळ्या प्रकारे आवश्‍यक वायू वजन केले जाते.
या यंत्राचा पॅकेजिंगचा वेग ताशी ६० ते २५० पॅकेटपर्यंत असू शकतो.

प्रक्रिया कशी होते ?
                          फ्लेझिबल फिल्म पद्धतीमध्ये यंत्रात एका बाजूने फिल्म घातली जाते. त्यावर प्रक्रिया होत योग्य प्रकारे दुमडल्यानंतर एक प्रकारची पिशवी तयार होते. पुढील टप्प्यामध्ये त्या पिशवीत माल भरला जातो. पुढे ती पिशवी हवा बंद केली जाते.
१) पाऊच तयार करणे.
२) पाऊच भरणे.
३) पाऊच शिवणे किंवा चिकटवणे.

या प्रकारामध्ये द्रवपदार्थ (उदा. फळांचे रस, सुगंधित रस तेल, औषधे, रसायन, लोणची) किंवा घन पदार्थ (कडधान्य, मीठ, औषधे इ.) अनेक पदार्थ भरता येतात. हा सध्या प्रचलित असलेले पॅकेजिंग असून, लहान व्यावसायिकांपासून मोठ्या व्यावसायिकांपर्यंत त्याचा वापर होताना दिसतो. कोणत्याही सुपर मार्केटमध्ये नजर फिरवल्यास, 90 टक्के फ्लेक्‍झिबल पॅकेजिंगमध्ये असलेले पदार्थ उपलब्ध असल्याचे दिसतील.
थर्मोफॉर्म रिजिड पॅकेजिंग :-
                   या पद्धतीच्या पॅकेजिंग यंत्रामध्ये एका बाजूने थर्मोफॉर्मीम फिल्म घातली जाते. या फिल्मवर आच्छादन (कोटिंग) म्हणून लवचिक अशी फिल्म घातली जाते. या दोन्हीच्या मिश्रणातून प्रथम पोकळी असलेला विशिष्ठ आकार तयार केला जातो. त्याला “कॅव्हिटी’ असे म्हणतात. या कॅव्हिटीमध्ये माल भरला जातो. पुढे त्यावर आच्छादन घालून हवाबंद केला जातो.
                    या प्रकारात पॅक होणारी उत्पादने  :-


१.  दही, जाम, श्रीखंड, तूप, तेल, मध, आमरस, फळांतील गर, वड्या, मासे, लोणची, यंत्राचे सुटे भाग, मसाले वगैरे या प्रकारे पॅक केले जातात. एकंदरीत बाजाराचा 20 टक्के हिस्सा यात मोडतो.
२.  अळिंबीची उत्पादने साधारणपणे या प्रकारच्या पॅकिंगमध्ये बाजारात आणली जातात.
३.  पेट बॉटल फिलिंग – या प्रकारच्या पॅकिंगमध्ये पेट बॉटलचे प्रीफॉर्म वापरले जातात. हवेच्या दाबाने त्यांचे रूपांतर बाटलीच्या विविध आकारांत केले जाते. त्यात वरील पद्धतीनुसार पदार्थ भरले जातात. त्यावर झाकण लावून बंद केले जाते. हे पॅकिंग फक्त द्रवरूप पदार्थासाठीच वापरले जाते.

उपयुक्तता :-
१.  पॅकिंगचा हा प्रकार घन किंवा ताठ, कणखर असल्याने आतील पदार्थ दुमडले किंवा दबले जात नाहीत.
२.  या प्रकारचे पॅकिंगही अत्यंत लहान प्रमाणात करता येते. पदार्थानुसार वेगवेगळ्या प्लॅस्टिकची फिल्म वापरली जाते.
३.  या प्रकारामध्ये विशिष्ट निर्जंतुकीकरणाची किंवा वाफेची धुरी देण्याची सोय असू शकते.
फिलिंग स्टेशन  :-
१.  मापन पद्धतीचे (व्हॉल्युमेट्रिक)  :-
यामध्ये यांत्रिक ताकदीच्या जोरावर पॅकिंगमध्ये माल भरला जातो. यामध्ये गरजेनुसार पॅकिंगचा वेग कमीअधिक करता येऊ शकतो. हा प्रकार थोडासा महाग आहे. सध्या प्रचलित वितरण पद्धतीमध्ये एक योग्य प्रकार आहे.
२.  गुरुत्वाकर्षण पद्धतीचे (ग्रॅव्हिमेट्रीक)  :-
विशिष्ट मापाचे पॅकिंग करण्यासाठी त्यात त्या-त्या वजनाच्या आकाराचे साचे बनवले जातात. त्यानुसार ते पाऊच किंवा थर्मोफॉर्म केलेले पॅक तयार होऊन, त्यात माल भरला जातो. पदार्थ भरण्यासाठी गुरुत्वाकर्षण शक्तीचा वापर केला जातो.

February 25, 2017

1 responses on "पॅकेजिंग निर्मितीपासून हवाबंद करण्याची यंत्रे..."

  1. विकास पेचDecember 11, 2017 at 6:24 amReply

    HI sir
    फळे व भजीपाल
    पर्क्रिय उदयोग ची माहीती पहिजे

Leave a Message

Your email address will not be published.

All Right Reserved.
Call Now ButtonCall Now
Translate »
error: Content is protected !!