गिरणी उदयोग…!

          गिरणी उदयोग…!
आपल्या रोजच्या घरगुती वापरात पिठाचे अनन्यसाधारण महत्व आहे.  तसेच भाजी अथवा बटाटे वडे करण्यासाठी डाळीच्या पिठाची आवश्यकता असते. पूर्वी अशा प्रकारचे ज्वारी, गहू, बाजरी, डाळी घरी जात्यावर दळले जात होते, परंतु हे अत्यंत कष्टप्रत काम पूर्वी होते व त्यातूनच गिरण्यांचा शोध लागला. जगातील प्रत्येक घरात पिठाची गरज असते. तसेच प्रत्येक हॉटेल, खाद्यत्र बनविण्याऱ्या संस्था यांना सुध्दामोठया प्रमाणावर पिठांची दररोज आवश्यकता असते.
 
    उदयोग  :–
गिरणी उदयोग हा अनेक ठिकाणी लघुउदयोगाच्या स्वरूपात दरारोज सुरु होत आहे. अनेक ठिकाणी हा उदयोग दोन स्वरूपात केला जातो.  एक म्हणजे लोकांना धान्य दळून देण्याचीसेवा देणे आणि दुसरा प्रकार म्हणजे स्वत:च पीठनिर्मिती करून त्याची विक्री करणे होय. गहू, ज्वारी बाजरी यासारख्या वस्तू दळण्यासाठी वेगळ्या प्रकारची गिरणी असते. तर डाळी दळण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या गिरणी असतात.  तसेच मसाले हळद, तिखट इत्यादी दळण्यासाठी बाजारामध्ये अनेक प्रकारच्या गिरण्या उपलब्ध आहे. या सर्व गिरण्या विजेवर चालणाऱ्या असल्यामुळे त्याला कोणत्याही प्रकारचे कष्ट लागत नाही. त्यामुळे हा उदयोग अनेक बेरोजगार युवक उभारत आहे.
     बाजारपेठ  :–
ज्या ठिकाणी लोकवस्ती असते त्याठिकाणी गिरणी लघुउदयोगाल बाजारपेठ तयार होते. मात्र सध्या अनेक ठिकाणी एक ते दोन गिरण्या असतात. तसेच अनेक गावामध्ये मोठया प्रमाणात लोकसंख्या वाढत असल्यामुळे गिरणीची संख्या कमी पडत आहे.  त्यामुळ हा उदयोग सुरू केला तर लगेच बाजर पेठ तयार होते. गिरणीस विविध ठिकाणी मोठया प्रमाणत मागणी ही दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच हॉटेल, खानवळ, रेस्टारेंट आदि ठिकाणी सुध्दा वेगवेळया पिठाचा सुध्दा पुरवठा आपणांस करता येतो.
प्रकल्प विषयक :-
हा उदयोग सुरु करण्यासाठी साधारण १ ते १.५० लाख रूपये खर्च येतो. उदयोग सुरु करताना ही गंतवणूक कमी जास्त होऊ शकते. तसेच बँक सुध्दा आपली पतपाहून योग्या स्वरूपात कर्ज पुरवठा करते. हा उदयोग उभारल्यास आपणांस चांगले उत्पन्न मिळू शकते.
अधिक माहितीसाठी  :-  7249856424
 

December 21, 2016

0 responses on "गिरणी उदयोग...!"

  Leave a Message

  Your email address will not be published.

  All Right Reserved.
  Call Now ButtonCall Now
  Translate »
  error: Content is protected !!