केळीच्या खुंटापासून फायबर तयार करणे.

 केळीच्या खुंटापासून फायबर तयार करणे.

प्रकल्पाची ओळख :

भारतात केळीच्या खुंटापासून फायबर बनविणे हा नवीन उपक्रम आहे. काही यंत्रमाग संस्थांनी केलेल्या संशोधनावरून लक्षात येते की, केळीच्या खुंटापासून बनविलेले फायबर हे विविध प्रकारे उपयुक्त ठरू शकते. केळीच्या खुंटापासून बनविलेले फायबर फिलीपाईन्समध्ये वापरले गेले आहे. व त्याच्या उपयुक्ततेमुळे त्याला ‘मनिला हेम्प’ हे नाव पडले. तसेच याला ‘अबाका’ म्हणूनही संबोधले जाते. ते ‘अबाका’(MUSA SAPIENTUM) या जातीच्या केळीच्या खुंटापासून बनविले जाते.
चावडी चे Affiliate बना,सोशल मिडिया वर मेसेज शेयर करा,अधिकचे उत्पन्न कमवा.अधिक माहितीसाठी या लिंक वर क्लिक करा.

प्रकल्पाचा आराखडा

१. उत्पादनप्रक्रिया / कार्यप्रक्रिया :

केळीच्या खुंटापासून फायबर दोन प्रकारे बनविले जाते.
१) बँकनिस पद्धत       २) लोईनिट पद्धत

१) बँकनिस पद्धत :

या पद्धतीमध्ये फायबर केळीच्या वाया गेलेल्या खुंटापासून तयार केला जातो. फायबर हा खुंटाच्या आतील बाजूला आढळतो आणि ५ ते ८ से. मी. रुंद रिबिन्स आणि २-४ च्या आकारात ओढून काढला जातो. या प्रक्रियेला टक्सिंईंग म्हणतात.
 

२) लोईनिट पद्धत :

या पद्धतीमध्ये एक एक करून टक्सिज (Tuxies) काढल्या जातात. वरील दोन्ही पद्धतीमध्ये टक्सिज २३ ते २७ किलोच्या बंडल्समध्ये बांधल्या जातात आणि सुरीने एकसारखे केले जातात. टक्सिज सुरीच्या पात्याखाली ओढल्या जातात, नंतर जोरात दाबले जाते ज्यामुळे फायबर सुटे होण्यास मदत होते. नंतर हे फायबर स्वच्छ हवेत सुकवले जातात आणि त्याचे ग्रेडिंग केले जाते आणि बंडल्स बनविले जातात.
 

२. प्रकल्पक्षमता :

हा प्रकल्प मध्यम स्वरूपाचा असून या प्रकल्पात वार्षिक ३६० मे. टन इतके फायबरचे उत्पादन अपेक्षित आहे.
 

३. बाजारपेठ / संभाव्य ग्राहकवर्ग :

दक्षिण भारतात हे फायबर जास्त प्रमाणात वापरले जाते. या फायबरचा वापर नोटा बनविण्यासाठी होतो. ‘पॅालिहाऊस’च्या आच्छादनसाठी याच प्रकारच्या फायबरचा वापर केला जातो. तसेच जहाजांवर जे मोठे दोरखंड असतात ते याच प्रकारच्या फायबरपासून बनविलेले असतात. सन २००४ मध्ये संपूर्ण जगातील केळीचे उत्पादन ७० मिलियन टन होते. फिलीपाईन्स आणि जपानमध्ये यांत्रामागापासून बनविण्यात येणाऱ्या वस्तूंसाठी या प्रकारच्या फायबरचा उपयोग होतो. फिलीपाईन्समध्ये यापासून तयार कपडे बनवून जपान, सिंगापूर, तैवानमध्ये निर्यात केले जातात..
 

व्यवसायास वाव :

       कापड उद्योगात अशा प्रकारच्या फायबरला जास्त मागणी आहे. संपूर्ण जगाच्या केळी उत्पादनापैकी ११% केळी उत्पादन भारतात होते. त्यामुळे भारतात या व्यवसायास चांगला वाव आहे.
 

४. उपलब्ध जागा :

१००० चौ. फूट आच्छादित व मोकळी जागा
 

५. उपयुक्तके / मुलभूत सुविधा :

थ्री फेजचे कनेक्शन व पाणीपुरवठा गरजेनुसार.
 

६. मनुष्यबळ / कर्मचारीवर्ग आवश्यकता :

उद्योजक स्वत: उत्पादनप्रक्रियेत सहभागी होणार असून, त्याच्यासह २ कुशल, २  अकुशल कामगार असे एकूण ५ लोक काम करणार आहेत, असे गृहीत धरले आहे.
 

७. भांडवलाचा तपशील :

७.१ स्थिर भांडवल : (१ महिन्यासाठी ):

अ. क्र.तपशील नगदर (रु.)एकूण किंमत
( रु. )
१.
 
 
 
 
 
 
 
२.
३.
यंत्रसामग्री व साहित्य :
१. कटिंग व स्टीलिंग उपकरणे
२. रोल क्रशर व फायबर सेपरेटर
३. उघडे मोठे पिंप
४. गरम वाफेचे ड्राईग चेंबर
५. गरम वाफेचे जनरेटर
६. वजनकाटा
७. इतर साधने व हत्यारे
फर्निचर
पूर्व – उत्पादन खर्च
 
 
१,२०,०००
२,००,०००
१,५०,०००
२,१०,०००
६०,०००
१२,०००


 
१,२०,०००
२,००,०००
१,५०,०००
२,१०,०००
६०,०००
१२,०००
६,०००
२०,०००
२०,०००
 
          एकूण  ८,०८,०००

 

७.२ खेळते भांडवल ( १ महिन्यासाठी ):

अ) प्रमुख बाबी :

१) कच्चा माल व साहित्य :

अ. क्र.तपशीलप्रमाणदर ( रु. )एकूण किंमत
(रु.)
.
२.
केळीचे खुंट
पॅकिंगचे साहित्य
५० मे. टन
१२०० रु. / मे. टन
६०,०००
४,०००
 एकूण   ६४,०००

 

२) मनुष्यबळ / कर्मचारीवर्गावरील खर्च 

अ. क्र.  कर्मचारी संख्या प्रत्येकी दरमहा
वेतन ( रु. )
एकूण किंमत
( रु. )
१.
२.
३.
कुशल
अकुशल
भत्ते व इतर सवलती
( एकूण वेतनाच्या २० %)

८,०००
६,०००
१६,०००
१२,०००
५,६००
एकूण  ३३,६००

 

ब) एकूण खेळते भांडवल : (१ महिन्यासाठी ):

अ. क्र.तपशील नगदरएकूण किंमत
१.
२.
३.
४.
 
 
५.
६.
७.
८.
 
 कच्चा माल व साहित्य
कर्मचारीवर्गावरील खर्च
देखभाल – दुरुस्ती
मुलभूत सुविधा :
१. वीज
२. पाणी
प्रशासकीय खर्च
जाहिरात
जागा भाडे
इतर खर्च
  
५५०

  
८ रु./युनिट

 
६४,०००
३३,६००
२,०००

४,४००
१,५००
३,०००
२,०००
३,०००
२,५००
 
          एकूण  १,१६,०००

 

८. भांडवलाची उभारणी :

अ. क्र.तपशील रक्कम (रु.)अ. क्र.तपशील रक्कम (रु.)
१.
२.
स्थिर भांडवल
खेळते भांडवल
८,०८,०००
१,१६,०००
१.
 
२.
स्वत:चे भागभांडवल
(२५%)
अपेक्षित बॅंक कर्ज
(७५%)
 
२,३१,०००
 
६,९३,०००
 एकूण भांडवल ९,२४,०००           एकूण ९,२४,०००

 

९. नफा – तोटा पत्रक ( वार्षिक ) :

अ) एकूण उत्पन्न :

अ. क्र.उत्पन्नाच्या बाबी वार्षिक उत्पन्नाचा तपशील एकूण उत्पन्न (रु.)
१.
 
 
फायबर विक्री
५०००० दर / मे. टन दराने दरमहा ३० मे.
टन = २,४०,०००
 
 
२,४०,००० रु. x १२ महिने
 
 
 
२८,८०,०००
 
 
         एकूण  २८,८०,०००

 

ब) एकूण खर्च रुपये (वार्षिक) :

अ. क्र. तपशीलखर्च (रु.)
१.
२.
 
 
३.
४.
 
 
 
खेळते भांडवल
घसारा :
१) यंत्रसामग्री व साहित्य (२०%)
२) फर्निचर ( १५ % )
उधारी (२%)
बँक कर्जावरील व्याज
१३,९२,०००
 
१,५३,६००
३,०००
५७,६००
८१,४२०
 
                एकूण                   १६,८७,६२०   

 
८. निव्वळ उत्पन्न रुपये :     =     स्थूल उत्पन्न – एकूण खर्च – मुद्दल हप्ता     = निव्वळ उत्पन्न रुपये
=     २८,८०,००० – १६,८७,६२० – २,०८,२००     = ९,८४,१८० रु.
९. ना नफा ना तोटा बिन्दू :
=  = ६३  %
 
 
 

January 11, 2018

0 responses on " केळीच्या खुंटापासून फायबर तयार करणे."

    Leave a Message

    Your email address will not be published.

    All Right Reserved.
    Call Now ButtonCall Now
    Translate »