कापडी खेळणी बनविणे

 कापडी खेळणी बनविणे

प्रकल्पाची ओळख:

कापडी खेळणी (SOFT TOYS) हा साधा सोपा व कमी गुंतवणुकीचा असा व्यवसाय आहे. वेगवेगळ्या आकाराच्या व रंगाच्या खेळण्यांना बाजारपेठेत मोठया प्रमाणावर मागणी आहे. विशेषत: वेगवेगळ्या प्राण्यांच्या आकाराच्या खेळण्यांना प्रचंड मागणी आहे. जोकर, अस्वलाच्या आकारातील खेळणी मुलांमधे विशेष प्रिय आहेत.
 

प्रकल्पाचा आराखडा:

१. उत्पादनप्रक्रिया/कार्यप्रक्रिया:

कापडी खेळणी बनविणे हा उद्योग महिलांसाठी योग्य असा उद्योग आहे. कारण हा व्यवसाय कमी गुंतवणूक करुन सुरु करता येतो. यामध्ये कापणे, शिवणे, चिकटवणे व जोडणे अशा प्रकारच्या प्रक्रियांचा समावेश होतो. कापडी खेळणी बनविणे एकदम सोपे व कमी गुंतवणूकीचे काम आहे. आपल्याला हव्या त्या प्राण्याच्या आकाराचे कापड कापुन घ्यावे व एका बाजूने ते शिवून घ्यावे. एक बाजू मोकळी ठेवावी व त्या बाजूने कापूस किंवा स्पंज भरावा व कापड शिवावे. नंतर बटन, रिबन व डोळे चिकटवावेत. आशाप्रकारे हे बाजारात पाठविण्यास योग्य असे खेळणे तयार होते.
चावडी चे Affiliate बना,सोशल मिडिया वर मेसेज शेयर करा,अधिकचे उत्पन्न कमवा.अधिक माहितीसाठी या लिंक वर क्लिक करा.

२. प्रकल्पक्षमता:

हा प्रकल्प लघु स्वरूपाचा असून, या प्रकल्पातून प्रतिवार्षी १८००० कापडी खेळण्यांचे उत्पादन अपेक्षित आहे.
 

३. बाजारपेठ / संभाव्य ग्राहकवर्ग:       

संपूर्ण जगातील खेळणी बनविणाऱ्या कंपन्यांचे लक्ष भारतीय बाजारपेठेकडे आहे. कारण भारतीय बाजारपेठ ही खेळण्यांच्या अंतरराष्ट्रीय बाजारपेठेसाठी प्रसिद्ध आहे. दिवसेंदिवस वेगवेगळ्या कारणांनी कापडी खेळण्यांची मागणी वाढतच चालली आहे. सध्या बाजारपेठेत अस्वल, जोकर व विविध प्राण्यांच्या आकारातील खेळणी उपलब्ध आहेत. ही खेळणी रु. ३० पासून ते २००० रु. पर्यंत उपलब्ध आहेत. त्यांच्या कापडाच्या व बनावटीच्या दर्जावर कींमत ठरते. भारतातील काही कंपन्या आपला माल परदेशात पाठवितात. तरी सुद्धा खेळण्यांसाठी स्थानिक भारतीय बाजारपेठेला अतिशय महत्त्व आहे.
 

४. उपलब्ध  जागा:

४०० चौ. फुट आच्छादित/इमारत.
 

५. उपयुक्तके/मुलभुत सुविधा:

सिंगल फेजचे वीज कनेक्शन.
 

६. मनुष्यबळ/कर्मचारीवर्ग आवश्यकता:

उद्योजक स्वत: उत्पादनप्रक्रियेत सहभागी होणार असून, त्याच्यासह १ कुशल आणि १ अकुशल कामगार असे एकुण ३ कर्मचारी काम करणार आहेत, असे गृहीत धरले आहे.
 

७. भांडवलाचा तपशील :

७.१ स्थिर भांडवल : (१ महिन्यासाठी ):

अ. क्र.तपशील नगदर (रु.)एकूण किंमत
( रु. )
१.
 
 
 
 
२.
३.
यंत्रसामग्री व साहित्य :
१. शिलाईयंत्र
२. राउंड ब्लेड कटिंग मशिन
३. कात्री, टेप, सुया इ. साहित्य
४. रॅक
५. वर्किंग टेबल
फर्निचर
पूर्व – उत्पादन खर्च
 

 
१७,०००
६,०००

२,०००
१,५००
 
३४,०००
६,०००
१,५००
४,०००
१,५००
५,०००
४,०००
          एकूण  ५६,०००

 

७.२ खेळते भांडवल ( १ महिन्यासाठी ) :

अ) प्रमुख बाबी :

१) कच्चा माल व साहित्य :

अ. क्र.तपशीलप्रमाणदर ( रु. )एकूण किंमत
(रु.)
.
२.
३.
४.
फर व इतर प्रकारचे कापड
भरण्यासाठी कापूस किंवा स्पंज डोळे,
रिबन, दोरे इ.
पँकिंगचे सामान
 
६०० मीटर

५० रु मीटर

३०,०००
२,५००
१,५००
१,०००  
 एकूण   ३५,०००

 
२) मनुष्यबळ / कर्मचारीवर्गावरील खर्च :
 

अ. क्र.      कर्मचारी संख्या प्रत्येकी दरमहा
वेतन ( रु. )
एकूण किंमत
( रु. )
१.
२.
३.
कुशल
अकुशल
भत्ते व इतर सवलती
( एकूण वेतनाच्या २० %)


८,०००
६,०००
८,०००
६,०००
२,८००
एकूण  १६,८००  

 
ब) एकूण खेळते भांडवल : (१ महिन्यासाठी ):
 

अ. क्र.तपशील नगदरएकूण किंमत
१.
२.
३.
४.
 
 
५.
६.
७.
८.
९.
 कच्चा माल व साहित्य
कर्मचारीवर्गावरील खर्च
देखभाल – दुरुस्ती
मुलभूत सुविधा :
१. वीज
२. पाणी
वाहतूक
प्रशासकीय खर्च
जाहिरात
जागा भाडे
इतर खर्च 
३००
 
७ रु./युनिट

३५,०००
१६,८००
१,२००
 
२,१००
४००
१,५००
२,०००
१,०००
२,५००
१,५००
          एकूण  ६४,०००

 

८. भांडवलाची उभारणी :

अ. क्र.तपशील रक्कम (रु.)अ. क्र.तपशील रक्कम (रु.)
१.
२.
स्थिर भांडवल
खेळते भांडवल
५६,०००
६४,०००
१.
 
२.
स्वत:चे भागभांडवल
(२५%)
अपेक्षित बॅंक कर्ज
(७५%)
 
३०,०००
 
 
९०,०००
 एकूण भांडवल १,२०,०००           एकूण १,२०,०००

 

९. नफा – तोटा पत्रक ( वार्षिक ) :

अ) एकूण उत्पन्न :

 

अ. क्र.उत्पन्नाच्या बाबी वार्षिक उत्पन्नाचा तपशील एकूण उत्पन्न (रु.)
१.कापडी खेळण्यांची विक्री दरमहा
१५०० नग = ९०,००० रु.
 
९०,००० x १२ महिने
 
१०,८०,०००
         एकूण  १०,८०,०००

 

ब) एकूण खर्च रुपये (वार्षिक) :

अ.क्रतपशीलखर्च (रू)
१.
२.
 
 
 
खेळते भांडवल
घसारा :
१) यंत्रसामग्री व साहित्य (२०%)
२) फर्निचर (१५%)
७,६८,०००
 
९,०००
७५०
३.   उधारी (विक्रीवर २%)२१,६००
४.बँककर्जावरील व्याज९,०००
 एकूण८,०८,३५०

 
क) निव्वळ उत्पन्न रुपये =  स्थूल उत्पन्न – एकूण खर्च – मुद्दल हफ्ता
=  १०,८०,००० – ०८,०८,३५० – ६२,०००   = २,०९,६५० रू.
१०. ना नफा – ना तोटा बिंदू :

= ७९%
निश्चित खर्च + नफा
०८,०८,३५० + ०२,०९,६५०
=

       निश्चित खर्च   १००                               ०८,०८,३५०    १००
 
 

January 11, 2018

0 responses on " कापडी खेळणी बनविणे"

  Leave a Message

  Your email address will not be published.

  All Right Reserved.
  Call Now ButtonCall Now
  Translate »
  error: Content is protected !!