पपई पासून तयार करा चेरी…

              पपई चेरी (टुटीफ्रुटी) हा पदार्थ प्रामुख्याने जेवणानंतर खाण्यात येणारा मुखवास व पानमसाल्यात वापरला जातो. तसेच बेकरी व्यवसायामध्ये विविध पदार्थामध्ये यांचा वापर हा अधिक प्रमाणात केला जातो. पपईमध्ये अ, ब आणि ड ही जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे यांची मागणी ही दररोज वाढत आहे. मात्र त्यांची निर्मिती ही कमी प्रमाणात होत आहे, कारण हा उदयोग कशा पध्दतीने केला जातो. यांची माहिती अनेक लोकांना नसून त्यामुळे येणाऱ्या भविष्यकाळात हा उदयोग  अनेक बेरोजगार तरून आणि विविध महिला बचत गटांसाठी एक चांगला लघुउदयोग होऊ शकतो.

चावडी चे Affiliate बना,सोशल मिडिया वर मेसेज शेयर करा,अधिकचे उत्पन्न कमवा.अधिक माहितीसाठी या लिंक वर क्लिक करा.

चेरी

          पपई हे बहुगुणी आणि पचनशक्ती वाढविणारे फळ मानले जाते. पपईचा गर आणि बिया औषधी असतात. पपई चवदार आहे, त्याचबरोबर आरोग्यासाठी ही लाभदायक आहे. पपईने भूक आणि शक्ती वाढते. त्यामुळे पपई पासून बनविण्यात येणाऱ्या अनेक पदार्थांना मागणी असते. चेरी तयार करण्यासाठी पूर्णवाढ झालेल्या कच्चा पपईपासून साखरेचा वापरू करून चेरी (टुटीफ्रुटी) बनविली जाते. टुटीफ्रुटीचा  वापर बेकारीचे पदार्थ, मिठाई, आईस्क्रीम, श्रीखंड, कस्टर्ड, पानाचे विडे यात प्रामुख्याने वापर केला जातो.

उदयोग

                 पपई चेरीचा (टुटीफ्रुटी) उदयोग हा कमी भांडवलात करता येणाऱ्या उदयोग आहे. या उदयोगासाठी  पिकलेली अथवा कच्ची पपई ही लागते. यासाठी साधारण ५०० ते १००० चौ.फूट मोकळी जागा अथवा घर लागू शकते.  साधारण २ ते ३ कर्मचारी वर्गामध्ये हा उदयोग उभारता येऊ शकतो. पपई चेरी जरी जास्त प्रमाणत तयार केली तर ती जास्त दिवस टिकून राहू शकते. त्यामुळे या उदयोगात कोणताही तोटा होऊ शकत नाही.

बाजारपेठ

              सध्या अनेक ठिकाणी बेकरी, मिठाई, आईस्क्रीम पार्लर, डेअरी उदयोगांची अनेक दुकाने सर्वत्र पाहवयास मिळतात. तेथे तयार होणाऱ्या अनेक पदार्थानमध्ये पपई चेरीचा (टुटीफ्रुटी) वापर अधिक प्रमाणात होतो. त्यामुळे याला बाजारपेठ विविध ठिकाणी उपलब्ध आहे. यांची चव ही गोड असल्याने ते पदार्थ सर्वत्र लोकप्रिय आहे. महाराष्ट्र, झारखंड, व बिहारमध्ये अशा प्रकारचे उदयोग हे मोठया प्रमाणात दिसून येतात.

प्रकल्प विषयक

                  चेरी उदयोग उभारणीसाठी मशिनरीसही साधारण १,५० ते २ लाख रूपयापर्यत खर्च येतो. मात्र हा खर्च उदयोग उभारण्याच्या वेळी कमी जास्त प्रमाणात होऊ शकतो. हा उदयोग उभारणीसाठी आपणांस बँक आपली पत पाहून कर्ज पुरवठा करते.

या प्रकल्पाच्या अधिक माहितीसाठी 7249856424

10 thoughts on “पपई पासून तयार करा चेरी…

  1. पपई चेरी बनविण्याबद्दल परीपुर्ण माहीती द्या.

  2. पपई पासून चेरी तयार करणे उध्योग सुरु करायचा आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Customer Care