घरच्या घरी बनवा पशु खाद्य !!

घरच्या घरी बनवा पशु खाद्य !!
गव्हांडा, धान, तनस, कडबा यासारखा चारा युरियाचे उपचार करून पोषक स्वरूपात बदलणे सहज शक्‍य आहे, त्यामुळे जनावरांना अधिक प्रथिनयुक्त व पाचक स्वरूपात सुखा चारा सहज उपलब्ध करून जनावरांच्या आरोग्यासोबत प्रजोत्पादन, दूध उत्पादन, कार्यक्षमता वाढीस लागेल. तसेच, हिरवा चारा निर्मितीपेक्षा 10 ते 15 टक्के कमी खर्चात हा चारा उपलब्ध करून आर्थिकदृष्ट्याही सामान्य शेतकऱ्यांना परवडू शकेल.
समतोल आहारातून जनावरांना आवश्‍यक असणाऱ्या मूलद्रव्यांची गरज पूर्ण होते.
सर्वसामान्यपणे जनावरांच्या खाद्यान्नाचे 1) चारा, 2) खुराक, 3) इतर मूलद्रव्ये/ क्षार या तीन प्रकारांमध्ये वर्गीकरण केले जाते.1) चारा –
चाऱ्यामध्ये सहज पचनीय मूलद्रव्ये कमी, तर 18 टक्केपेक्षा जास्त प्रमाणात तंतुमय घटक (क्रूड फायबर) असतात.
अ. कोरडा चारा –
असा चारा ज्यामध्ये 10 ते 20 टक्के ओलावा असतो. उदा. ज्वारी, मका, बाजरी यांचा वाळलेला कडबा / तूर, उडीद, मूग यांचा भुसा व कुटार; तसेच ज्वारी, मका भात, गहू यांचे कुटार इ.
ब. ओला हिरवा चारा –
या चाऱ्यामध्ये 60 टक्केपेक्षा जास्त ओलावा असतो, तसेच तो पचनास सोपा असतो. उदा. गजराज, गिन्नी, मारवेल, पवाना, इतर गवत; मका, ज्वारी इत्यादीचा हिरवा चारा; स्टायलो, विविध कंदमुळे, अंजन, दशरथ, सुबाभूळ पाला इ.2) खुराक –
खुराकामध्ये 18 टक्केपेक्षा कमी प्रमाणात तंतुमय पदार्थ, तर 60 टक्केपेक्षा जास्त प्रमाणात सहज पचनीय मूलद्रव्ये असतात.
अ. ज्वारी, बाजरी, मका, बरबटी, तूर, मूग, उडीद, गहू, भात इत्यादीच्या दाण्यांचा चुरा.
ब. तीळ, भुईमूग, करडी, कपास, सूर्यफूल इत्यादी तेलबियांची ढेप.
क. बाजारातील तयार खाद्यान्न.
ड. विविध अन्नपदार्थ, कारखान्यातील वाया जाणारे घटक / उपपदार्थ उदा. उसाची मळी, ताक.3) जीवनसत्त्वे, क्षार व इतर मूलद्रव्ये –
चारा व खुराक जनावरांना देण्याबरोबरच काही जीवनसत्त्वे / क्षार थोड्या प्रमाणात दिले गेल्यास त्याअभावी होणारे रोग टाळण्यासाठी बाजारामध्ये विविध जीवनसत्त्वे अ, ब, क इत्यादी, तर विविध क्षार कॅल्शिअम, पोटॅशियम, फॉस्फरस, लोह, जस्त, कोबाल्ट उपलब्ध होतात.
कोरडा चारा व हिरव्या चाऱ्याचा विचार केला असता दोन्हीपासून सर्वच मूलद्रव्ये मिळू शकत नाहीत. ते फक्त शरीराची वाढ, पोटाची भूक व संतुलन राखण्यास मदत करतात. खुराक मात्र जनावराच्या शरीराची वाढ, विकास, तसेच दूध व कामासाठी आवश्‍यक ऊर्जा उपलब्ध करून देतात.सकस मिश्र खाद्य –
एकाच प्रकारच्या चाऱ्यापासून किंवा खुराकापासून शरीरासाठी आवश्‍यक सर्वच मूलद्रव्ये मिळत नाहीत. तसेच, काही प्रकारच्या खाद्यान्नाची प्रत, स्वाद हा जनावरांच्या आवडीप्रमाणे नसेल, तर दोनपेक्षा अधिक खाद्यान्नाचे मिश्रण तयार करून जनावरांना दिल्यास खाद्यान्नाची प्रत, स्वाद तसेच मूलद्रव्याची आवश्‍यकता पूर्ण करता येऊ शकते. याला “सकस मिश्र खाद्य’ म्हणता येईल.
उदा.
1. कामाच्या बैलासाठी तसेच दुधाळ जनावरांना देण्यासाठी तयार करावयाचा सकस खुराक पुढील मूळ पदार्थांच्या मिश्रणातून तयार केला जातो.
अ. गव्हाचा कोंडा 40 भाग
ब. तूर चुणी 20 भाग
क. भुईमूग किंवा इतर तेलबियांची ढेप 20 भाग
ड. सरकी ढेप 20 भाग
अशारीतीने तयार केलेला खुराक 12 तास पाण्यात भिजवून जनावरांना द्यावा.2. शेळ्या- मेंढ्यांसाठी अलप तयार करताना, पुढील मूळ पदार्थांच्या मिश्रणातून सकसता वाढवता येते.
अ. भुईमुगाची ढेप 25 भाग
ब. गव्हाचा कोंडा 33 भाग
क. मका, बाजरी, ज्वारी भरडलेली 40 भाग
ड. खनिज पदार्थांचे मिश्रण 1 भाग
ई. मीठ 1 भागघरगुती सकस पशू आहार तयार करण्याच्या प्रमुख पद्धती –कडबा / चारा देताना जर तो कुटार यंत्रामधून बारीक कुट्टी स्वरूपात दिल्यास उपयोगिता वाढविली जाते; परंतु त्याचबरोबर त्यामध्ये मिठाच्या पाण्याचे तसेच युरियाचे द्रावण ठराविक प्रमाणात (दोन टक्‍क्‍यांपर्यंत) शिंपडून मिसळल्यास पाचकता तसेच स्वाद वाढविता येतो.
निकृष्ट चाऱ्याची प्रत वाढविण्याच्या सर्वोत्तम पद्धती –
हिरवा चारा हा सर्व पशूंसाठी अत्यंत स्वादिष्ट व पौष्टिक आहार आहे. याचबरोबरीने भाताचा भुसा, गव्हांडा यांचा पशुखाद्य म्हणून वापर करता येतो. यामध्ये साधारणपणे कमी प्रथिने व पचनास कठीण अशा रेशवर्गीय मूलद्रव्यांचे प्रमाण अधिक असते. उत्कृष्ट हिरव्या चाऱ्याअभावी अशा चाऱ्याचा उपयोग करावा. निकृष्ट दर्जाच्या चाऱ्याची प्रत / पौष्टिकता कशी वाढवावी यासंदर्भात राष्ट्रीय डेअरी संशोधन संस्था, कर्नाल तसेच देशातील इतर संस्थांमध्ये झालेल्या विविध प्रयोगांत गूळ, मीठ, युरियाच्या उपयोगातून विविध रासायनिक व भौतिक प्रक्रिया करून गव्हांडा, तनस यांची पौष्टिकता वाढविणे शक्‍य असल्याचे सिद्ध झाले आहे. गुळाचे द्रावण तसेच मिठाचे द्रावण शिंपडून चाऱ्याची मूल्यता वाढविता येते; तसेच शिफारशीत मात्रेमध्ये युरिया वापरल्यास निकृष्ट चाऱ्याची प्रत वाढविता येऊ शकते.
गव्हांड्यामध्ये मोठ्या प्रमाणात लिग्नीन असते, तसेच कमी प्रमाणात प्रथिने, पाण्याचे प्रमाण कमी, भुकटीचे प्रमाण जास्त, चवदारपणा कमी व ऑक्‍झालिक आम्लांचे मोठे प्रमाण असते. यामुळे जनावरे गव्हांडा आवडीने खात नाहीत. यासाठी यावर प्रक्रिया करून त्याचे खाद्यमूल्य वाढविता येते.
चावडी चे Affiliate बना,सोशल मिडिया वर मेसेज शेयर करा,अधिकचे उत्पन्न कमवा.अधिक माहितीसाठी या लिंक वर क्लिक करा.
May 24, 2017

0 responses on "घरच्या घरी बनवा पशु खाद्य !!"

  Leave a Message

  Your email address will not be published.

  All Right Reserved.
  Call Now ButtonCall Now
  Translate »
  error: Content is protected !!