शेतकऱ्यांना उपयुकत ठरतोय ' पशुधन विमा '

शेतकऱ्यांना उपयुकत ठरतोय ‘ पशुधन विमा ‘
स्वयंरोजगारासाठी, शासकीय योजनेअंतर्गत बँकेतर्फे कर्ज काढून दुभत्या गाई, म्हशी खरेदी करतो. व्यवसाय चालू असताना जर गाई,म्हशींमध्ये मृत्यू ओढवला किंवा कायवस्वरूपी व्यंग आले, तर उत्पादनक्षमतेवर विपरीत परिणाम होतो. व्यवसायातील जोखीम टाळण्याच्या दृष्टीने पशुविमा आवश्यक व उपयुक्त असतो.
चावडी चे Affiliate बना,सोशल मिडिया वर मेसेज शेयर करा,अधिकचे उत्पन्न कमवा.अधिक माहितीसाठी या लिंक वर क्लिक करा.
भारतातील जनरल इन्शुरन्स कंपनीअंतर्गत कार्यरत खालील संस्था पशुविमा करतात.

 • युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी.
 • न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी.
 • ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी.

शेतीवर आधारित पूरक व्यावसायासाठी ज्या पाळीव प्राण्यांचे व पक्ष्यांचे संगोपन सर्वसाधारणपणे करण्यात येते, त्या सर्व पशुपक्ष्यासाठी वरील संस्थांव्दारे विम्याचे संरक्षण देण्यात येते व त्यासाठी ठराविक प्रमाणात वार्षिक हप्त्याची रक्कम स्विकारली जाते. त्यास प्रीमियम म्हणतात.
             पशुविमा कंपनीतर्फे पशुची वर्गवारी खालीलप्रमाणे करण्यात येते.

 • दुभत्या गाई, म्हशी, लहान कालवडी, पारड्या
 • पैदासक्षम वळू, रेडे, खच्ची केलेले बैले, रेडे

विदेशी पशुंची व्याख्या करताना ज्यांचे माता-पिता विदेंशी रक्ताचे असतील, ते विदेशात जन्मलेले असो अथवा भारतामध्ये.
संकरित पशुंधच्याबाबतीत व्याख्या अशी की, ज्यांच्या माता-पित्यांपैकी कोणत्याही एका विदेशी व एक भारतीय वंशाचे असतात. पशुविमा काढण्यासाठी विविध कंपन्यातर्फे कोणत्या वर्गवारी नुसार वयोगट ठरविलेले असतात. हे आपल्याला संबधित विमा कंपनीकडून समजते. तसेच पशुधनाच्या स्थानिक बाजारातील किंमती त्यांच्या जातीनुसार, वयानुसार व उतपादनक्षमतेनुसार विभित्र ठिकाणी विषम असतात. तथापि पशुवैद्यांच्या सल्ल्यानुसार पशुविमा काढताना पशुंची आधारभूत किंमत ठरविण्यात येते व या किंमतीनुसार विम्याची वार्षिक हप्त्याची रक्कम (प्रीमियम) ठरविण्यात येते. खरेदी किंमतीच्या मर्यादेच्या आधीन राहून विमा काढण्यात येतो. पशुविमा हप्त्याचे दर हे विमा कंपनी ठरवते. गटविमा योजनेखालील  विशेष सूट १५ टक्के फक्त योजनाबाह्या पशुधनासाठी देण्यात येते. शासकीय योजनेअंतर्गत खरेदी केलेल्या पशुधनाला विशेष सूट दिली जात नाही. पाच वर्षे कालावधीसाठी विमा घेतल्यास २५ टक्के सूट देण्यात येते.

 • पशुधनाचा विमा काढताना सक्षम पशुवैद्यांतर्फे पशुचिकित्सा करण्यात येते. ते निरोगी व पैदासक्षम आहे, याची खात्री करून घेण्यात येते. त्यांची जात, शिंग, रंग ओळख खूण इत्यादी तपशीलासह पशुवैद्यकीय प्रमाणपत्र घेण्यात येते. त्यात गाई, म्हशींचे बाजारभावाप्रमाणे किंमत नमूद करण्यात येते. कंपनीतर्फे बिल्ला कानात मारण्यात येतो. बिल्ल्यावर एका बाजूने क्रमांक असतो व दुसऱ्या बाजुने कंपनीचे नाव दिलेले असते. विमा कंपनीतर्फे नुकसानभरपाई खालील कारणावरून मिळतो.
 • अपघाती मृत्यू. (आग, पूर, वीज, वादळ,भूकंप इत्यादी)
 • पशुंचा विविध आजारांमुळे मृत्यू.
 • सार्वजनिक दंगल किंवा संप इत्यादी.
 • सार्वजनिक दंगल किंवा संप इ.

पाळीव पशुधनामध्ये कायमचे अपंगत्व आल्यामुळे त्यांची उपयुक्तता संपली, तर त्यासाठी नुकसानभरपाई मिळविण्यासाठी विम्याच्या हप्त्यासोबत अतिरिक्त अधिभार आकारण्यात येतो.

 • स्थलांतर विमा :–

पशुधनाचे स्थलांतर ८० कि.मी च्या मर्यादेत असेल, तर अतिरिक्त आकार लावण्यात येत नाही. पशुधनाची वाहतूक व स्थलांतर ८० कि.मी. च्या मर्यादित असेल, तर अतिरिक्त आकार लावण्यात येत नाही. पशुधनाची वाहतू व स्थलांतर ८० कि.मी पेक्षा जास्त अंतरावर होत असेल, तर अतिरिक्त अधिभार १ टक्का आकारण्यात येतो, वाहतुकीच्या कालावधीमध्ये जर पशुधनाला दुखापत होऊन मृत्यू ओढवला तर पशुंच्या मालकाला नुकसानभरपाई मिळू शकते.

 • पशुधनाची नुकसानभरपाई कशी मिळवाल ?

कोणत्याही परिस्थितीमध्ये विमा काढलेल्या गाई, म्हशींच्या मृत्यू झाल्यास नुकसानभरपाई मिळविण्यासाठी खालीलप्रमाणे कार्यवाही करणे आवश्यक आहे.

 • पशुंच्या मृत्यूबद्दलची माहिती तारेने त्वरित पशुविमा कंपनीत कळवा.
 • विमा कंपनीतर्फे नुकसानभरपाई प्राप्त करण्यासाठी खालील प्रपत्रे सादर करा.

अ. कंपनीतर्फे पाठविलेला नुकसानभरपाई मिळविण्यासाठी दिलेला फॉर्म भरून पाठवा.
ब. गाय, म्हैस मृत्यू पावल्याबद्दलचा पशुवैद्यकाने दिलेला दाखला विहित नमुन्यात.
क. मृत, गाय म्हैस यांचा शवविच्छेदन अहवाल (विमा कंपनीच्या फॉर्ममध्ये) सक्षम पशुवैद्यांच्या स्वाक्षरी सह.
ड. पशुधनाच्या कानातील बिल्ला कंपनीकडे परत करावा लागतो.
इ. गाय, म्हैस कायम अपंगत्वासाठी उपचार तपशील सादर करावा लागतो.
 

March 2, 2017

0 responses on "शेतकऱ्यांना उपयुकत ठरतोय ' पशुधन विमा '"

  Leave a Message

  Your email address will not be published.

  All Right Reserved.
  Call Now ButtonCall Now
  Translate »
  error: Content is protected !!