• No products in the cart.

Learn from Experience Earn from Experience

  • ‘चावडी बिझनेस ट्रेनिंग इंस्टीट्यूट’ –  स्टार्टअप प्रशिक्षण संस्थामधील एक अग्रगण्य संस्था. चावडी बिझनेस ट्रेनिंग इंस्टीट्यूटने मागील दहा वर्षांमध्ये उदयोग करू इच्छिणाऱ्या हजारो तरुणांना, शेतकऱ्यांना, महिलांना उद्योग उभारणीसाठी प्रत्यक्ष कार्यशाळेद्वारे मार्गदर्शन केले आहे. अगदी लॉकडाउनच्या काळातही न थांबता चावडीने स्वतःला Physical to Digital असे काळानुरूप बदलत प्रशिक्षणाची परंपरा कायम राखली आहे. आज चावडीचे सर्व प्रशिक्षण कार्यक्रम ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध आहेत.

आज आम्ही अनुभव संपन्न व शिक्षित व्यक्तिंना नवीन व्यवसाय संकल्पनेसाठी आमंत्रित करत आहोत. आम्ही चावडीच्या माध्यमातून ‘Learn from Experience Earn from Experience’  हा एक नवीन प्रोजेक्ट आणला आहे. प्रोजेक्टचा मुख्य उद्देश नवीन उद्योजकांना उद्योग करताना येणाऱ्ऱ्या अडचणी, उद्योगाच्या तांत्रिक समस्या, त्यावरील उपाय, उद्योगाची उत्पादन प्रक्रिया, त्यासाठी लागणारी पायाभूत गुंतवणूक अशी सर्व माहिती देणे हा आहे. या प्रोजेक्टच्या माध्यमातून ज्या लोकांकडे एखाद्या व्यवसायाचे एक्स्पर्ट नॉलेज आहे त्यांना चावडीच्या माध्यमातून असंख्य लोकांपर्यंत पोहोचता येऊ शकेल. चावडी तुम्हाला मंच उपलब्ध करून देईल ज्याच्या माध्यमातून तुम्ही तुमचे ज्ञान लोकांपर्यंत घेऊन जाऊ शकता. तुमचा एक्स्पर्टाइज लोकांपर्यंत पोहोचवू शकता.

अमित मखरे
संचालक – चावडी बिझनेस ट्रेनिंग इंस्टीट्यूट

Consultancy Type Price (Rupees) Benefits Technical Details
Video Course
2150 / 2950
40% pure benefit on each Subscription to expert
Duration 90 min to 240 min or more
Information Call Telephonic
1000
40% pure benefit on each Subscription to expert
One time consultancy with 20 min limit
Online One to One Consultancy
5000
40% pure benefit on each Subscription to expert
Webinar through Zoom meeting Time limit 60 min
Physical Consultancy
10000
40% pure benefit on each Subscription to expert
One to One meeting with Expert Time limit 90 min
Webinar on Digital Platform
1250
40% pure benefit on each Subscription to expert
Time limit 90 min

Benefits of this Project :

  1. Brand Connectivity 

Learn from Experience‘ या बिझनेस मॉडेलमध्ये तुम्ही चावडीसोबत जोडले जाऊ शकता. २०११ साली स्थापित झालेल्या या संस्थेची व्याप्ती अगदी संपूर्ण महाराष्ट्रात तर आहेच त्याचप्रमाणे महाराष्ट्राबाहेर देखील आहे. अहमदनगरमधून सुरू झालेल्या या उद्योग चळवळीचा विस्तार महाराष्ट्राशिवाय भारतातील तब्बल ९ ते १० राज्यांमध्ये झाला आहे. एवढ्यावरच न थांबता चावडीने जपान, युगांडा, दुबई, इंग्लंड या देशातील लोकांनाही ऑनलाइन ट्रेनिंगद्वारे उद्योग उभारणीसाठी मार्गदर्शन केले आहे. २०,००० पेक्षा जास्त उद्योजकांना चावडीने उद्योग उभारणीसाठी प्रेरित केले आहे. जर तुम्ही तज्ञ प्रशिक्षक म्हणून चावडीशी जोडले गेलात तर तुम्ही चावडीसोबत असणाऱ्या उद्योजकांसोबत जोडले जाऊ शकता. आपल्याकडे जे ज्ञान आहे त्या ज्ञानाला तुम्ही योग्य व्यक्तिपर्यंत योग्य ब्रॅंडसहित घेऊन जाऊ शकता.

  1. Digital Platform

चावडी या संस्थेची सुरुवात ही मुळात प्रत्यक्ष कार्यशाळा स्वरूपात झाली. प्रत्यक्ष व्यवसाय प्रशिक्षणाद्वारे चावडीने अनेक नव उद्योजकांना प्रेरित करत व्यवसाय उभारणीसाठी मार्गदर्शन केले. प्रतिकूल परिस्थितीमध्ये लॉकडाऊनच्या काळात जेव्हा प्रत्यक्ष कार्यशाळेद्वारे प्रशिक्षण देणे शक्य होत नव्हते तेव्हा चावडीने स्वतःला डिजिटल बनवत प्रशिक्षण देण्याचे कार्य खंडित होऊ दिले नाही. ऑनलाइन प्रशिक्षण देत चावडीने  उद्योजकांना मार्गदर्शन करण्याचे काम केले. आता चावडी संपूर्ण काम डिजिटल स्वरूपात  करत आहे. डिजिटल स्वरूपात काम केल्यामुळे चावडीची व्याप्ती ही दिवसेंदिवस वाढत आहे. वेगवेगळ्या भागातून लोक चावडीसोबत डिजिटली जोडले जात आहेत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे समाजमाध्यमांवरती चावडीचा असणारा फॉलोवर बेस आहे. यू ट्यूब या समाज माध्यमावर चावडीचे १,५९,००० तर फेसबूक या समाज माध्यमावर १,७१,००० फॉलोवर आहेत. आपल्यासारखे तज्ञ प्रशिक्षक जेव्हा चावडीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मशी जोडले जातील त्यावेळी आपल्यासोबत हे सर्व फॉलोवर्स जोडले जातील.

  1. Passive Income

हे बिझनेस मोडेल आपणास ‘Passive Income Generate’ करून देईल. आता आपण हे जाणून घेऊ की नेमके आपल्याला किती अर्थार्जन होऊ शकते.

उदाहरणार्थ १०० रुपये उत्पन्न मिळाले तर त्यातील निव्वळ ४०% नफा आपणास मिळेल आणि उर्वरित ६०% रकमेतून चावडी website uploading cost, editing cost, server charges, Promotion cost, marketing charges इत्यादी खर्च भागवेल.

जर याचा गुणाकार किंवा गुणोत्तर पद्धतीने अभ्यास केला तर हे बिझनेस मॉडेल आपणास पुढील दोन प्रकारचे फायदे देईल- प्रथमता आपले ज्ञान हे मराठी भाषेत पूर्ण जगभरासाठी उपलब्ध होईल आणि आपणास Regular Passive Income देईल.

All Right Reserved.