केळी प्रक्रियेतून वाढवा नफा….

केळी प्रक्रियेतून वाढवा नफा….
केळी फळ कोणत्याही  हंगामात मुबलक प्रमाणात अगदी सहज उपलब्ध असते. केळीतील पोष्टिक घटकांमुळे केळीपासून बनविलेल्या वेफर्स, टॉफी, ज्यूस, पावडर, बिस्कीट अशा पदार्थांना बाजारात चांगली मागणी आहे. त्यामुळे केळी प्रक्रिया उद्योग आपल्याला फायद्याचा ठरू शकतो.

       वेफर्स :-

 

 • स्लायसरने किंवा चाकूने केळीच्या साधारण ०.३ ते ०.५ सें.मी. जाडीच्या चकत्या कराव्यात.
 • या चकत्या ०.१ टक्के पोटॅशियम मेटाबाय सल्फाईडच्या द्रावणात १५ ते २० मिनिटे बुडवून ठेवाव्यात. त्यामुळे चकत्या काळसर न पडता पांढऱ्या शुभ्र राहतात.
 • सर्व चकत्या द्रावणातून काढून उकळत्या पाण्यात २-३ मिनिटे बुडवून काढाव्यात.
 • तयार चकत्या उन्हात किंवा ड्रायरमध्ये ६० अंश सेल्सिअस तापमानात १ तास वाळवाव्यात.
 • तयार चकत्या गरम तेलात तळाव्यात, तळलेल्या चाकत्यांना मीठ     मसाला लावून घ्यावा.
 • वेफर्स थंड झाल्यावर योग्य आकाराच्या प्लॅस्टिक बॅगमध्ये भरून पॅक करावेत.

टॉफी :-

 • १ किलो पिकलेल्या केळी स्वच्छ पाण्याने धुऊन त्यावरील साल काढून टाकावीत.
 • केळीचे बारीक तुकडे करून त्याचा गर बनवावा. तयार झालेला गर गाळून घ्यावा व मंद आचेवर आटवावा.(घेतलेल्या भांड्याच्या १,३ घनता येईपर्यंत आटवणे.)
 • आटवलेल्या मिश्रणात साख्रर ७५० ग्रॅम + १०० ग्रॅम ग्लुकोज + १५० ग्रॅम स्कीम मिल्क पावडर आणि ७० ग्रॅम बटर मिसळून शिजवावे. ( मिश्रणाचे वजन ३ पटीने कमी होईपर्यँत शिजवावे.)
 • तयार झालेले मिश्रण ट्रेमध्ये पसरवून थंड करावे.
 • हे मिश्रण ५८ अंश सेल्सिअस तापमानास ड्रायरमध्ये वाळवावे.
 • तयार टॉफीचे योग्य त्या आकाराचे तुकडे करून बटर पेपरमध्ये पॅक करून हवाबंद काचेच्या बाटलीत ठेवावेत.

 

पावडर :-

 • पूर्ण पिकलेल्या केळीचा गर काढून तो स्प्रे ड्रायरमध्ये वाळवावा.
 • स्प्रे ड्रायरला गर चिकटू नये. याकरिता केळी गरात १० टक्के दुधाची पावडर मिसळावी. त्यामुळे गर लवकर वाळण्यास मदत होते.
 • ही सर्व प्रक्रिया अति स्वच्छतेत निर्जंतुक वातावरणात व्हायला हवी. कारण या तयार झालेल्या पावडरचा उपयोग लहान मुलांच्या आहारासाठी करण्यात येतो.

 
वाचा :- केळीपासून टिकाऊ प्रक्रियायुक्त पदार्थ……!!!
केळीपासून अनेक टिकाऊ पदार्थ व लगेच खाण्याचे पदार्थ व लगेच खाण्याचे पदार्थ तयार होऊ शकतात. विशेषत: ज्या वेळेस केळीला जास्त उत्पादनामुळे रास्त भाव मिळत नाही त्या वेळेस असे पदार्थ बनवून जास्तीत जास्त आर्थिक फायदा मिळविता येतो. त्यामुळे केळीचे विविध पदार्थ बनवून जास्तीत जास्त आर्थिक फायदा मिळविता येतो. त्यामुळेच केळीच विविध पदार्थ तयार करण्यास चांगला वाव आहे.
अधिक वाचा  :-   http://wp.me/p6Y2eu-1gq
 
 

March 9, 2017

0 responses on "केळी प्रक्रियेतून वाढवा नफा...."

  Leave a Message

  Your email address will not be published.

  All Right Reserved.
  Call Now ButtonCall Now
  Translate »