आपले उत्पादन बाजारपेठेत कसे विकावे ?

आपले उत्पादन बाजारपेठेत कसे विकावे ?
कुठलीही गोष्ट विकता येणे हे एक कौशल्य आहे. ‘पणन संरचना’ किंवा एकंदर बाजारपेठेचा आढावा, तसेच नेमका कोण व्यक्ति आपला ग्राहक होण्यास पात्र आहे, याचा विचार विक्रेत्यांना करावाच लागतो. यशस्वी विक्रेता केवळ बाजारवृत्त अभ्यासत नाही तर विक्रीसाठी लागणारी कौशल्ये सतत जोखत राहतो. आत्मसात करतो. या संदर्भात मजेशीर तरीही मनन करण्याजोगे विचार कार्ल व्होन क्लॉज्विटस् या प्रशियन लष्कर अधिका-याने मांडले आहेत. क्लॉज्विटस् च्या मते, ‘व्यापार व्यवसाय हा एक त-हेचा संघर्ष असतो.’ मार्केटिंग इज् वॉर असे तो म्हणतो.
पारंपरिक रित्या व्यवसाय आणि व्यापार करताना, ग्राहकाला जणू राजा समजले गेले आहे. आणि राजासमान अशा हया ग्राहकाच्या गरजा पुरविणे हे आदर्श विक्रेत्याचे लक्षण मानले आहे. मग ते दंतमंजन असो, वा कापड, संगणक असो वा कुठलीही इतर विक्रेय वस्तू! ग्राहकांची सोय पाहणे, योग्य त-हेने ग्राहकांची काळजी घेणे हे जसे विक्रेत्याला करावे लागते, त्याचप्रमाणे आजच्या जीवघेण्या स्पर्धेच्या बाजारपेठेत आपल्या स्पर्धकाची बलस्थाने तसेच त्याच्या कमजोरींचा देखील अभ्यास पणन व्यावसायिकांनी (मार्केटिंग व्यावसायिकांनी) केला पाहिजे, असे क्लॉज्विटस् चे सांगणे आहे.

एका बाजूला आपल्या स्पर्धक कंपन्यांची आपण चांगल्या त-हेने बरोबरी केली पाहिजे, तर दुस-या बाजूला आपण हरत-हेच्या ग्राहकांचे समाधान करण्यासाठी अत्युत्कृष्ट सेवा पुरविली पाहिजे. आपल्या स्पर्धक ‘उत्पादन कंपन्यांची’ चाल ओळखता येणे, हे या सर्व प्रक्रियेमधील एक अत्यावश्यक कौशल्य आहे. आहे त्या परिस्थितीमध्ये आपले स्पर्धक काय खेळी खेळतील किंवा कोणती कृती हाती घेतील याची अटकळ बांधता येणे फार महत्त्वाचे. अशा प्रकारे निष्कर्ष काढण्याची खुबी एकदा तुम्हाला प्राप्त झाली की आपसूकच तुमची स्वत:ची कृती आकार घेते. तुमचे निर्णय आपोआप योग्य दिशा पकडतात. ह्या प्रकारे ‘पणन’ किंवा बिझिनेस वाढविता येतो. तसेच आपल्याल विविध पर्याय मार्केटिंगसाठी पाहायाला मिळतात. ते पुढील प्रमाणे –
 
सेल्स आणि मार्केटिंग
विक्री (सेल्स) व विपणन (मार्केटिंग) हे दोन विभाग कोणत्याही कंपनीत अत्यंत महत्वाचे समजले जातात. खर तर हे दोन्ही विभाग एकमेकांशी फारच साधर्म्य असणारे आहेत, परंतु तरी देखील दोन भागात विभागले आहेत. कंपनीमध्ये तयार होणारे उत्पादन अथवा कंपनी द्वारे दिली जाणारी सेवा यासंबंधी विपणन करून त्याची विक्री करण्याचे मुख्य काम या विभागाद्वारे केले जाते
 

विपणन (मार्केटिंग) :-
               एखादे उत्पादन तयार झाले कि त्याला बाजारात मान्यता मिळवून देण्यासाठी प्रत्येक कंपनीला विपनानाच्या विविध योजना राबवाव्या लागतात. यासाठी विपणन प्रमुखाच्या बरोबरीने काही ठरीव लोकांची टीम यासाठी काम करत असते. आपल्या उत्पादनाची वैशिठ्य, त्याचे उपयोग, इतर उत्पादनांशी तुलना यासंदर्भातील सादरीकरण ( बनविले जाते व त्यानुसार आमचे उत्पादन सर्वोत्तम कसे आहे याची खात्री पटवून दिली जाते.  सेवा देणाऱ्या एखाद्या कंपनीला अशाच पद्धतीने विपणन करावे लागते.

विक्री (सेल्स) :-

                         उत्पादन अथवा सेवेचे जेवढ्या चांगल्या प्रकारे विपणन केले जाईल, तेवढा उत्पादनाच्या विक्रीस जास्त प्रतिसाद मिळतो. उत्पादनाची विक्री हि प्रामुख्याने विपणनावर अवलंबून असते (विशेषतः नवीन उत्पादन). बाजारात आपल्या उत्पादनाला असलेली मागणी लक्षात घेऊन आगामी काळात किती उत्पादन करायचे याचे संकेत या विभागाद्वारे दिले जातात.
सर्वप्रथम उत्पादन होते मग त्याचे विपणन होते आणि मग विक्री होते, परंतु एकदा कंपनी नावारूपाला आली कि हे चक्र उलटे फिरायला लागते. प्रथम उत्तम प्रकारे विपणन करावे लागते त्याआधारे विक्री ठरते व होणाऱ्या विक्रीच्या आधारे पुढील उत्पादनाची दिशा ठरत असते.

ऑनलाईन मार्केटिंग
आजच्या काळात सर्व वयोगटांतील लोकांचा जास्तीत जास्त वेळ इंटरनेट, मोबाईल, सोशल मिडिया व विविध अॅप्स् यांवरच जातो. अर्थातच, विविध लहानमोठ्या व्यवसायांना त्यांचे संभाव्य ग्राहक मिळविण्यासाठी कंटेंट मार्केटिंग ऑनलाइन जगातच प्रामुख्याने करावे लागते.

कंटेंट मार्केटिंग म्हणजे काय ?
कंटेंट मार्केटिंग म्हणजे आपल्या उत्पादनाशी संबंधित किंवा आपल्या व्यवसायाशी संबंधित महत्त्वपूर्ण माहिती विविध स्वरुपांत विविध मिडियावर उपलब्ध करून देणे. पण ही माहिती प्रत्यक्ष विक्रीसंबंधित नसावी. म्हणजे सतत आपल्या उत्पादनाची जाहिरात नसावी. रोजच्या जीवनात आपल्याला कुठल्याही विषयासंबंधी छोटी मोठी समस्या निर्माण झाल्यास आपण पटकन गुगल उघडतो, आपली समस्या शोध चौकटीत लिहून शोध घेतो. परिणामांमध्ये जे संकेतस्थळ आपल्याला आवश्यक माहिती देईल, ते आपल्याला आवडते. कंटेंट मार्केटिंगमध्ये आपल्याला हेच करायचे आहे. कंटेंट म्हणजे अशी माहिती लोकांना सहज उपलब्ध करून द्यायची, जी उपयुक्त ठरेल. एखादा ब्रँड जेव्हा उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण माहिती देऊ लागतो, तेव्हा लोक त्या ब्रँडशी मनाने जुडतात. आणि अर्थातच, आपल्या उत्पादनाची किंवा सेवांची जाहिरात बघताच किंवा बघण्याआधीही आपल्या उत्पादनांकडे आकर्षित होतात.
 

माध्यमे :-
सोशल मिडिया मार्केटिंग :-
सोशल मिडिया विनामुल्य असल्यामुळे, तांत्रिक दृष्ट्या वापर सहज सोपा असल्याने सर्व वर्गांतील लोक सोशल मिडीयावर माहिती वाचतात, शेयर करतात आणि अर्थातच आपली मते बनवितात. तरीही, सर्वच व्यवसायांसाठी, सर्व सोशल मिडिया वाहिन्या आवश्यक नाहीत. कंटेंट मार्केटिंग नीती ठरविण्यापूर्वी आपले संभाव्य ग्राहक, कुठल्या सोशल साईटवर मुख्यत: सक्रीय आहेत हे बघावे. आणि त्या वाहिनीवरच आपले माहिती प्रसारित करण्याचे, फोलोअर्स मिळविण्याचे लक्ष केंद्रित करावे.

संकेतस्थळ व ब्लॉग :-
जेव्हा ग्राहक समस्या सर्च इंजिनवर शोधतात, त्यावेळी परिणाम मुख्यत: संकेतस्थळे किंवा ब्लॉग्स असतात. उदा: वैद्यकीय समस्या किंवा विविध मोबाईल फोन, संगणक, स्मार्टफोन यांची परीक्षणे. त्यामुळे आपल्या व्यवसायाचा विषय जर सर्च इंजिनवर अधिक शोधला जात असेल, तर आपण लेख, मार्गदर्शनपर ब्लॉग, प्रश्नोतरे या माध्यमांतून कंटेंट मार्केटिंग करू शकतो.
 

ध्वनिचित्रमुद्रणे :-
                  युट्युबवर विडीओ अपलोड करणे अगदी सोपे आहे. वाचण्यापेक्षा विविध विषयांवरची माहिती ऐकणे आणि बघणे, कुणी समजावून सांगणे हे बऱ्याच ग्राहकांना आवडते आणि ते काही विषयांच्या बाबतीत उपयुक्तसुद्धा ठरते, उदा. पाककृती, तांत्रिक समस्या निराकरण (Troubleshooting)

ईमेल मार्केटिंग :-
               आपल्या आवडत्या विषयाची माहिती थेट इनबॉक्समध्ये मिळण्याने शोध करण्याचा वेळ वाचतो. आपण जी ग्राहकोपयोगी माहिती देत असाल ती ईमेलद्वारे संभाव्य ग्राहकांना सबस्क्राइब करायला प्रेरित करा. ग्राहकांच्या समस्यांना ईमेल किंवा थेट चर्चेद्वारे (chat) उत्तरे द्या.
 

Marketing design over white background, vector illustration.

जी मार्केटिंग टीम सर्वात जास्त विक्री करते, तीच बाजारपेठेवर राज्य करते.
हया दृष्टीने पाहाता मार्केटिंग हे एक युध्द आहे. ह्या युध्दामध्ये स्पर्धा हाच शत्रू आहे. आणि हे युध्द जिंकणे हेच उद्दिष्ट आहे.

February 17, 2017

1 responses on "आपले उत्पादन बाजारपेठेत कसे विकावे ?"

Leave a Message

Your email address will not be published.

All Right Reserved.
Call Now ButtonCall Now
Translate »